सर्वजण माझा विजय जीवाची बाजी लावून विजय खेचून आणतील
इस्लामपूर ः प्रतिनिधी
jayant patil news : नवा महाराष्ट्र घडविण्यासाठी राज्यातील सरकार उखडून फेकूया ः आ.जयंत पाटील : आपणास हे राज्यसरकार उखडून फेकायचे आहे आणि राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आणून नवा महाराष्ट्र घडवायचा आहे. माझा आपणा सर्वांवर प्रचंड विश्वास आहे. आपण जीवाची बाजी लावून मोठा विजय खेचून आणाल. असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, माजी मंत्री आ.जयंतराव पाटील यांनी इस्लामपूर येथील महाविकास आघाडीच्या विराट सभेत बोलताना व्यक्त केला. तत्पूर्वी शहरातून भव्य रॅली काढण्यात आली. यानंतर आ.पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
jayant patil news : नवा महाराष्ट्र घडविण्यासाठी राज्यातील सरकार उखडून फेकूया ः आ.जयंत पाटील
येथील गांधी चौकातील विराट सभेस माजी मंत्री शिवाजीराव नाईक, प्रा.लक्ष्मण ढोबळे, आ.मानसिंग नाईक, आ.अरुण लाड, विट्याचे माजी नगराध्यक्ष वैभव पाटील, राज्य साखर संघाचे अध्यक्ष पी.आर.पाटील, दिलीपतात्या पाटील, माणिकराव पाटील, प्रतिक पाटील, राजवर्धन पाटील, डीपीआयचे संस्थापक प्रा.सुकुमार पाटील, यशवंत गोसावी, प्रा.शामराव पाटील, नेताजीराव पाटील, काँग्रेसचे बाळासाहेब पाटील, राजेंद्र शिंदे, अँड.आर.आर.पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष देवराज पाटील, अविनाश पाटील, विजयराव पाटील, वैभव शिंदे, अँड.चिमण डांगे, शहाजी पाटील, खंडेराव जाधव, अँड.धैर्यशिल पाटील यांच्यासह राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना पक्षाचे नेते प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी भाजपाचे नेते, सर्वोदयचे माजी उपाध्यक्ष महावीर चव्हाण, चर्मकार समाजाचे नेते आदिनाथ चौधरी, माजी नगरसेविका सुमन चौधरी यांनी पक्षप्रवेश केला.
आ.पाटील म्हणाले, तुमच्या ताकदीवर मी संपूर्ण राज्यात फिरतोय.
आपण आपले गाव, आपला बूथ सांभाळा. तुतारी वाजविणारा माणूस हे चिन्ह तळागाळापर्यंत पोचवा. या निवडणुकीत तुम्हास सर्व प्रकार पहायला मिळतील. विरोधक नाव व चिन्ह साधर्म्य असणारे उमेदवार उभा करतील. राज्यातून, देशातून नेते इथे येऊन आरोप करतील. अफवा पसरविल्या जातील आणि शेवटच्या चार दिवसात मतासाठी वाटेल ती किंमत मोजतील. तुम्ही विचलित होऊ नका. विरोधकांना काय बोलायचे ते बोलू द्या. मी फारसे बोलणार नाही. 100 पैकी 70 मते आपली असतील, तर त्यांच्यावर कशाला बोला. सत्तेत जाऊन बसणे सोपे होते. मात्र आपण वाळव्याचा स्वाभिमान कायम ठेवला. ब्रिटिशासारख्या बलाढ्य शत्रूच्या विरोधात लढण्याची आपली परंपरा आहे. भीती दाखविणार्याच्या पुढे हा तालुका कदापी झुकणारा नाही. माझा इथं पर्यंतचा प्रवास लहान मोठे कार्यकर्ते आणि जनतेच्या जीवावर झाला आहे. याची मला पूर्ण जाणीव आहे.
आपण निष्ठावंत कार्यकर्त्याप्रमाणे बाहेरच्या पक्षातून आलेल्या नेत्यांनाही उमेदवारी दिली आहे.
राजकारणात संख्येला महत्व असते. राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार चांगल्या संख्येने निवडून येतील. दिलीप पाटील म्हणाले, अजित पवार यांच्यासारखी रक्ताची माणसं पवार साहेबांना सोडून गेली. मात्र जयंतराव पाटील या निष्ठावंत सेनापतीने पवारसाहेबांना भक्कम साथ दिली. आ.जयंतराव पाटील यांनी अखंड तालुका घडविला असून त्यांच्याशी कोणी प्रतारणा करू शकत नाही. आपल्या प्रत्येक घासात बापू आणि जयंतराव आहेत. जे विरोधी बोलतात, त्यांच्या शेतात लव्हाळा उगवत होता. मग इतका विकास कोणामुळे झाला? यशवंत गोसावी म्हणाले, राज्यात इतर मतदारसंघात पाणी, वीज, शिक्षण, साखर कारखाना, विकासकामांवर निवडणूका लढविल्या जात आहेत. आ.जयंतराव पाटील यांनी गेल्या 35 वर्षात ही विकासकामे करून माणूस घडविला आहे.
हा मतदार राज्याच्या मुख्यमंत्रीपदास मतदान करणार आहे.
कोणीतरी कॉलेजचे नाव बदलले. मात्र हे कॉलेज कोणामुळे उभा राहिले, हे जनता विसरणार नाही. माजी मंत्री प्रा.लक्ष्मण ढोबळे म्हणाले, जयंतराव पाटील म्हणजे राज्यातील एक संयमी, कर्तृत्ववान व निष्कलंक नेते आहेत. ते उद्याचे राज्याचे नेतृत्व करणार आहेत. डीपीआयचे संस्थापक प्रा.सुकुमार कांबळे म्हणाले, जयंतराव पाटील हे राज्याचे मुख्यमंत्री होणार आहेत. त्यांना रेकॉर्ड ब्रेक मताधिक्याने विजयी करा. काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब पाटील म्हणाले, आपल्यात काही मतभेद असतील तर ते चर्चेने सोडवू. आता रुसवे-फुगवे बाजूला ठेवून सर्वांनी कामाला लागावे. माजी नगराध्यक्ष अँड.चिमण डांगे म्हणाले, कोणीतरी म्हणते आमदारांनी 35 वर्षात काय केले? तालुक्याचे राहू द्या, तुमचा विकास कोणामुळे झाला? तुमच्या कॉलेजच्या परवानगीसाठी नाशिक, दिल्लीस कोण आले. ज्यांनी नगराध्यक्ष म्हणून शहराच्या वैभवात भर घालणारे एकही काम केले नाही, त्यांना साहेबांवर बोलण्याचा अधिकार नाही.
वैभव शिंदे यांनी आष्टा शहरातून आम्ही 10 हजारावर मताधिक्य देऊ अशी ग्वाही दिली.
यावेळी शहराध्यक्ष शहाजी पाटील, माजी नगराध्यक्ष पै.भगवान पाटील, महिला जिल्हाध्यक्षा सुस्मिता जाधव, सुनिता देशमाने, खंडेराव जाधव, अँड.धैर्यशिल पाटील, अरुण कांबळे, काँग्रेसचे अँड.आर.आर.पाटील, यांनी आ.पाटील यांना लाखांवर मताधिक्याने विजयी करण्याचा निर्धार बोलून दाखविला. विनायक पाटील, बाळासाहेब पाटील, रविंद्र बर्डे, सुधाकर वायदंडे, शंकर महापुरे, संजय बजाज, राहुल पवार, मैनुद्दीन बागवान, दादासाहेब पाटील, विश्वनाथ डांगे, सुभाषराव सुर्यवंशी, भास्कर पाटील, रोझा किणीकर, पुष्पलता खरात यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. तालुकाध्यक्ष विजयराव पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. नेर्ल्याचे सरपंच संजय पाटील यांनी आभार मानले. संदीप तांबवेकर यांनी सूत्रसंचालन केले.
कार्यकर्त्यांचा अलोट गर्दीचा उत्साह
सकाळी पंचायत समितीपासून अलोट गर्दीच्या सहभागाने रॅलीस सुरुवात झाली. फुलांनी सजविलेल्या उघड्या जीपमध्ये आ.पाटील, त्यांचे सुपुत्र प्रतिक पाटील, राजवर्धन पाटील यांनी उभा राहून लोकांना अभिवादन केले. जागोजागी महिलांनी त्यांचे औक्षण केले, युवकांनी पुष्पवृष्टी केली. झरी नाका, आझाद चौक, गणेश मंडई, कापुसखेड नाका, यल्लामा चौकातून गांधी चौकात रॅली आली. येथे रॅलीचे सभेत रूपांतर झाले.
मुसळधार पाऊस आणि कडाक्याचे ऊन
गेल्या आठवड्यात इस्लामपूर येथे शिवस्वराज्य यात्रेची सांगता सभा झाली. या सभेपुर्वी मुसळधार पाऊस पडला. मात्र लोक हालले नाहीत. जोरदार सभा झाली. आज दिवसभर कडक ऊन असताना लोक रॅली आणि जाहीर सभेस मोठ्या संख्येने आणि उत्साहाने सहभागी झाले होते. यामध्ये महिला व युवकांची संख्या लक्षणीय होती. लोकांनी नेत्यावर कसे प्रेम असते हे दाखवून दिले

Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.



