jayant patil news : एचएचआरपी नंबर प्लेटमधून महाराष्ट्र लुटण्याचे काम: आ. जयंत पाटील: वाहनांची सुरक्षा आणि ओळख सुनिश्चित करण्यासाठी महाराष्ट्र राज्याने एचएसआरपी नंबर प्लेट वापरणे अनिवार्य केले आहे. मात्र त्यातही महाराष्ट्राला लुटण्याचा कार्यक्रम सुरू आहे. इतर राज्याच्या तुलनेने तिपटीने अधिक रक्कम वसूल केली जात आहे. महाराष्ट्रातील नागरिकांना लुटण्याचे कंत्राट कोणी दिले आहे? याची त्वरित चौकशी व्हावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
jayant patil news : एचएचआरपी नंबर प्लेटमधून महाराष्ट्र लुटण्याचे काम: आ. जयंत पाटील
त्यांनी याबाबत मुख्यमंत्र्यांना पत्र दिले आहे. त्यात म्हटले आहे की, महाराष्ट्र शासनाने एचएसआरपी नंबरप्लेटसाठी रॉरमेत्रा सेफ्टी, रीअर मेझॉन इंडिया व एफटीए एचएसआरपी सोल्यूशन्स प्रा. लि. या खासगी कंपन्यांना सहाशे कोटी रुपयांचे कंत्राट दिले आहे. मात्र या कंपन्या नंबरप्लेटसाठी इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील नागरिकांकडून तिप्पट रक्कम वसूल करत आहेत.
विशेष म्हणजे गुजरात, गोवा, आंध्र प्रदेश, राजस्थान, केरळ या राज्यांमध्येही याच कंपन्यांना नंबरप्लेटचे काम मिळाले आहे. पण त्या राज्यांमध्ये महाराष्ट्रापेक्षा कमी दर आहेत. गुजरातमध्ये दुचाकीसाठी 160 रुपये आहेत तर महाराष्ट्रात 450, गोव्यात चारचाकीसाठी 203 रुपये आहेत तर महाराष्ट्रात 745 अशी बरीच तफावत दिसत आहे.
ही कोट्यवधींची लूट परिवहन विभागाच्या साक्षीनेच सुरु आहे. या तीन खाजगी कंपन्यांना नक्की कोणाच्या पुढाकाराने महाराष्ट्रातील नागरिकांना लुटण्याचे कंत्राट दिले याची चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी. तसेच सदरची अवाजवी लूट रोखण्यासाठी सदरची कंत्राटे रद्द करून सामान्यांना परवडतील असे दर ठेवून नंबर प्लेट बसविण्यासाठी मुदतवाढ देण्यात यावी.
तसेच यापूर्वी ज्या वाहनधारकांनी ऑनलाईन पध्दतीने रक्कम भरुन एचएसआरपी नंबर प्लेट बसून घेतली आहे, त्यांना जे दर नियमित होतील, त्यातून जास्तीची रक्कम त्यांच्या खात्यात वर्ग करण्यात यावी, अशी मागणी आ. जयंत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.



