jayant patil news : कुसुमताई पाटील आरोग्य केंद्राच्या वतीने महाआरोग्य शिबिराचे आयोजन : लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या 41 पुण्यतिथीनिमित्त कासेगाव एज्युकेशन सोसायटी संचालित श्रीमती कुसुमताई राजारामबापू पाटील आरोग्य केंद्राच्या (ओपीडी) वतीने सोमवार दि.20 पासून 4 दिवसांचे महाआरोग्य शिबिराचे आयोजन केले आहे. या महाशिबिरात इस्लामपूर शहरासह परिसरातील 19 गावातील गरजू रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी, उपचार व औषधोपचार केला जाणार आहे. कापुसखेड नाका येथील इन्स्टिट्यूट ऑफ नरसिंग एज्युकेशन येथे सकाळी 10 ते दुपारी 3 या वेळेत ही शिबिरे होणार आहेत.
jayant patil news : कुसुमताई पाटील आरोग्य केंद्राच्या वतीने महाआरोग्य शिबिराचे आयोजन
सोमवार दि.20 जानेवारी रोजी इस्लामपूर शहरातील प्रभाग क्रमांक 1,2,3 व 4 तसेच बहे, हुबालवाडी, खरातवाडी, नरसिंहपूर, शिरटे गावातील रुग्णांची तपासणी व उपचार केले जाणार आहेत. मंगळवार दि.21 रोजी प्रभाग क्रं.5, 6 व 7 तसेच कि.म.गड, लवंडमाची, बेरडमाची, कोळे व येडेमच्छिंद्र तर बुधवार दि.22 रोजी 8,9 व 10 तसेच रेठरेहरणाक्ष, भवानीनगर, बिचुद, दुधारी आणि गुरुवार दि.23 रोजी 11,12 13 व 14 तसेच बोरगाव, फारणेवाडी, साटपेवाडी, गौंडवाडी व साखराळे येथील रुग्णांची तपासणी केली जाणार आहे.
शिबिरात ह्रदयरोग, कँसर, नाक,कान,घसा, नेत्ररोग, आस्था, मेडिसीन, सर्जरी, मोफत डोळ्यांचे नंबर तपासणी केली जाणार आहे. मोफत रक्त, लघवी, रक्तातील साखर तपासणी करून जरुरीप्रमाणे ईसीजी घेतला जाणार आहे. 50 दिवसांच्या जंत गोळ्या दिल्या जाणार आहेत. पुढील सर्वरोग तपासणी व उपचार व शस्त्रक्रिया शासकीय योजनेअंतर्गत किंवा सवलतीच्या दरात कराड येथील कृष्णा हॉस्पिटल येथे केले जाणार आहेत.

Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.



