jayant patil news : राजारामबापू सह. बँकेच्या अध्यक्षपदी विजयराव यादव, उपाध्यक्षपदी माणिकराव पाटील: माजी मंत्री आ.जयंतराव पाटील यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली देशातील अग्रगण्य बँक म्हणून वाटचाल करणार्या पेठ ता.वाळवा येथील राजारामबापू सह. बँकेच्या अध्यक्षपदी विजयराव विठ्ठलराव यादव यांची तर उपाध्यक्षपदी माणिकराव शामराव पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. उपनिबंधक संभाजी पाटील हे निवडणूक निर्णय अधिकारी होते. त्यांनी नूतन अध्यक्ष- उपाध्यक्षांचा सत्कार केला.
jayant patil news : राजारामबापू सह. बँकेच्या अध्यक्षपदी विजयराव यादव, उपाध्यक्षपदी माणिकराव पाटील
मावळते अध्यक्ष प्रा.शामराव पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष विजयराव पाटील यांनी सत्कार केला. आ.जयंतराव पाटील, राजारामबापू सह. साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रतिक पाटील यांनी नूतन अध्यक्ष- उपाध्यक्षांना शुभेच्छा दिल्या. नूतन अध्यक्ष- उपाध्यक्ष यांनी संचालक मंडळ व प्रमुख पदाधिकार्यांच्या समवेत कारखाना कार्यस्थळावर लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
राजारामबापू सह. बँकेच्या सभागृहात बँकेच्या संचालक मंडळाची बैठक झाली. या बैठकीत जेष्ठ संचालक डॉ.प्रकाश पाटील यांनी अध्यक्षपदासाठी विजयराव यादव यांचे नांव सुचविले, त्यास संचालक धनाजी पाटील यांनी अनुमोदन दिले. संचालक सुभाषराव सुर्यवंशी यांनी उपाध्यक्ष पदासाठी माणिक पाटील यांचे नांव सुचविले,त्यास संचालक आनंदराव लकेसर यांनी अनुमोदन दिले. यावेळी दोन्ही निवडी बिनविरोध जाहीर करण्यात आल्या.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब पाटील, तालुकाध्यक्ष विजयराव पाटील, जिल्हाध्यक्ष देवराज पाटील, प्राचार्य आर.डी.सावंत, नेर्लेचे सरपंच संजय पाटील, महिला राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षा सुस्मिता जाधव, प्रदेश सदस्या कमल पाटील यांच्यासह बँकेचे संचालक, तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित होते.
सर्वांनी नूतन-उपाध्यक्ष यांना शुभेच्छा दिल्या.
विजयराव यादव व माणिकराव पाटील यांनी माजी मंत्री आ.जयंतराव पाटील यांनी बँकेचे अध्यक्ष-उपाध्यक्ष म्हणून संधी दिल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. लोकनेते राजारामबापू पाटील यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवत सर्व सामान्य माणसाला आर्थिक ताकद देत संस्थेच्या प्रगतीमध्ये निश्चित योगदान करू,असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
jayant-patil-news-rajarambapu-co-vijayrao-yadav-as-chairman-of-the-bank-manikrao-patil-as-vice-chairman
यावेळी मावळते अध्यक्ष प्रा.शामराव पाटील यांनी नूतन अध्यक्ष-उपाध्यक्ष यांना शुभेच्छा दिल्या. बँकेचे व्यवस्थापकीय संचालक प्रदीप बाबर यांनी स्वागत व प्रास्ताविक भाषणात बँकेच्या वाटचालीचा वाढवा मांडला. संचालक व नेर्लेचे सरपंच संजय पाटील यांनी आभार मानले.

Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.