jayant patil news : राजारामबापू पाटील साखर कारखान्याच्या तोडणी व वाहतूक कराराचा शुभारंभ : राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याच्या चारही युनिटच्या गळीत हंगाम सन 2025-26 च्या तोडणी व वाहतूक कराराचा शुभारंभ साखराळे येथे मोठ्या उत्साहात करण्यात आला. कारखान्याचे उपाध्यक्ष विजयराव पाटील,माजी जि.प. अध्यक्ष व संचालक देवराज पाटील,शेती समितीचे अध्यक्ष विठ्ठल पाटील,सत्यविजय बँकेचे अध्यक्ष बाळासाहेब पवार,कार्यकारी संचालक आर.डी.माहुली प्रामुख्याने उपस्थित होते. प्रारंभी लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले.
jayant patil news : राजारामबापू पाटील साखर कारखान्याच्या तोडणी व वाहतूक कराराचा शुभारंभ
उपाध्यक्ष विजयराव पाटील म्हणाले, माजी मंत्री आ.जयंतराव पाटील,कारखान्याचे अध्यक्ष प्रतिकदादा पाटील यांच्या मार्गदर्शना खाली येणारा गळीत हंगाम निश्चित यशस्वी करू. ऊस तोडणी व वाहतूकदारांचे काही प्रश्न असल्यास ते सोडविले जातील. आपण जास्तीत-जास्त ऊस पुरवठा करावा.
शेती समितीचे अध्यक्ष विठ्ठल पाटील म्हणाले,गेला गळीत हंगाम थोडासा उशीरा चालू झाला आणि 100 दिवसात संपला. यावर्षी कारखाना वेळेत चालू करून 120 दिवसापेक्षा जास्त दिवस चालविण्याचा प्रयत्न राहील. सर्व घटकांनी सहकार्य करावे.
कार्यकारी संचालक आर.डी.माहुली म्हणाले,सध्या साखर उद्योगासमोर अनेक संकटे उभा आहेत. गेल्या 6 वर्षापासून साखर विक्रीचा दर वाढलेला नाही. केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला जात आहे. ऊस उत्पादक शेतकर्यांची उसबिले,तसेच तोडणी वाहतुकीची बिले दिली आहेत.
यावेळी रामभाऊ माळी,महादेव माळी, अर्जुन कचरे, कुमार पाटील,शहाजी पाटील, सोनाजी सदगर यांनी मनोगत व्यक्त केले. तसेच रमेश जाधव,विनोद पाटील,संग्राम पाटील,गुणवंत पाटील,संभाजी कामेरीकर, संदीप डांगे,सुभाष मस्कर,दीपक जगताप, वृषभनाथ पाटील यांच्यासह अनेक प्रातिनिधिक करार करण्यात आले.
jayant-patil-news-rajarambapu-patil-sugar-factory-demolition-and-transportation-contract-inaugurated
बांधकाम समितीचे अध्यक्ष कार्तिक पाटील,ऊस विकास समितीचे अध्यक्ष अमरसिंह साळुंखे,संचालक प्रताप पाटील, शैलेश पाटील,दादासो मोरे,बबन थोटे,दिपक पाटील,रामराव पाटील,रमेश हाके,हणमंत माळी,राजकुमार कांबळे,वैभव वसंतराव रकटे,मुख्य शेती अधिकारी प्रशांत पाटील, कामगार नेते शंकरराव भोसले,कामगार युनियनचे अध्यक्ष राजेंद्र चव्हाण,सचिव डी.एम.पाटील,मुख्य लेखापाल संतोष खटावकर यांच्यासह शेती विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
प्रारंभी मुख्य शेती अधिकारी प्रशांत पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. ऊस विकास समितीचे अध्यक्ष अमरसिंह साळुंखे यांनी आभार मानले.

Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.