rajkiyalive

jayant patil news : राजारामबापू कुस्ती केंद्राचा मल्ल तेजस पाटीलला महाराष्ट्र केसरी स्पर्धेत रौप्य पदक

jayant patil news : राजारामबापू कुस्ती केंद्राचा मल्ल तेजस पाटीलला महाराष्ट्र केसरी स्पर्धेत रौप्य पदक : राजारामबापू पाटील कुस्ती केंद्राचा मल्ल तेजस बबनराव पाटील (सुरूल) याने अहिल्यानगर येथे नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत 65 किलो वजन गटात माती विभागात रौप्य पदक पटकाविले आहे.

jayant patil news : राजारामबापू कुस्ती केंद्राचा मल्ल तेजस पाटीलला महाराष्ट्र केसरी स्पर्धेत रौप्य पदक

माजी मंत्री आ.जयंतराव पाटील यांनी पै.तेजसचा सत्कार करून त्याचे अभिनंदन केले, त्यास शुभेच्छा दिल्या. राजारामबापू साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रतिकदादा पाटील,उपाध्यक्ष विजयराव पाटील,कार्यकारी संचालक आर.डी.माहुली यांच्यासह संचालक व अधिकार्‍यांनी पै.तेजसचे अभिनंदन केले.

याप्रसंगी बोरगावचे माजी सरपंच पै.विनायक पाटील,कुस्ती प्रशिक्षक पै.कुंडलिक गायकवाड,पै.नितीन सलगर प्रामुख्याने उपस्थित होते. पै.तेजस हा राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याच्या राजारामबापू कुस्ती केंद्राचा मानधनधारक मल्ल आहे.

jayant-patil-news-rajarambapu-wrestling-center-wrestler-tejas-patil-wins-silver-medal-in-maharashtra-kesari-championship

तो राजारामबापू कुस्ती केंद्रात काही वर्षापासून कुस्तीचा सराव करीत असून त्यास कुस्ती प्रशिक्षक पै.कुंडलिक गायकवाड,पै.नितीन सलगर यांचे मार्गदर्शन मिळत आहे. पै.तेजस हा कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयात शास्त्र शाखेत तिसर्‍या वर्गात शिकत आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज