एआय तंत्रज्ञानावर आधारित ऊस शेती पाहून राजारामबापूचे शेतकरी भारावले : राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखाना कार्यक्षेत्रातील प्रगतशील व तरुण शेतकर्यांनी बारामती येथील कृषी प्रदर्शनात एआय तंत्रज्ञानावर आधारित ऊस शेती पाहून त्यांच्यामध्ये नवा उत्साह संचारला आहे.. राजारामबापू साखर कारखान्याचे युवा अध्यक्ष प्रतिकदादा पाटील यांच्या मार्गदर्शना खाली कारखाना कार्यक्षेत्रातील 50 प्रगतशील व तरुण शेतकर्यांच्या या अभ्यास दौर्याची व्यवस्था करण्यात आली होती..
एआय तंत्रज्ञानावर आधारित ऊस शेती पाहून राजारामबापूचे शेतकरी भारावले
ऊसाचे एकरी उत्पादन वाढविण्यासाठी अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर कसा केला जाऊ शकतो,हे आम्ही पाहिले आहे. याचा आमच्या शेतात अधिक उत्पादन घेण्यासाठी निश्चितपणे उपयोग होईल,अशी प्रतिक्रिया तरुण शेतकर्यांनी दिली.
माजी मंत्री आ.जयंतराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राजारामबापू साखर कारखान्याने साखर उद्योगातील शिखर संस्था असणार्या व्हीएसआयच्या सहकार्याने कारखाना कार्यक्षेत्रात ’लक्ष्य एकरी 100 टनाचे’हा उपक्रम राबविला आहे. त्यामुळे कारखाना कार्यक्षेत्रातील हजारो शेतकरी एकरी 100 टनाच्यावर पोचले आहेत. आता याच्याही पलिकडचे अद्यावत तंत्रज्ञान आपल्या शेतकर्यांनी विशेषतः आपल्या शेतात विक्रमी उत्पादन घेण्यासाठी प्रयत्न शील तरुण शेतकर्यांनी पहावे,ते आत्मसात करून आपल्या शेतात त्याचा वापर करावा, या हेतूने प्रतिकदादा पाटील यांच्या संकल्पने तून 50 तरुण शेतकर्यांच्या अभ्यास दौर्याची व्यवस्था करण्यात आली होती.
या कृषी प्रदर्शनात फुल शेती व भाजी पाल्यांचे प्रात्यक्षिक प्लॉट, विविध कंपन्यांची कीटकनाशके,बुरशीनाशके,ठिबक सिंचन, सच्छिद्र पाईप,ड्रोन तंत्रज्ञान,ऊस तोडणी मशीन,पशुपालन आदी शेती क्षेत्रास गतिमान करणारे तंत्रज्ञान शेतकर्यांनी पाहिले आहे. या शेतकर्यांनी हा अभ्यास दौरा आयोजित केल्याबद्दल समाधान व्यक्त करीत साखर कारखाना व कारखान्याचे अध्यक्ष प्रतिकदादा पाटील यांना धन्यवाद दिले.
फोटो ओळी- राजारामनगर येथे अभ्यास दौर्यावर रवाना होताना राजारामबापू साखर कारखान्याचे प्रगतशील व तरुण शेतकरी.

Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.



