dineshkumar aitawade 9850652056
jayant patil news : संभाजी पवार गट जयंत पाटील गटात : मिरज तालुका पश्चिम भागातील वजनदार नेते आणि संभाजी पवारांचे विश्वासू महावीर चव्हाण यांनी गुरूवारी जयंत पाटील गटात प्रवेश केला. सर्वोदय सहकारी साखर कारखान्याचे व्हा. चेअरमन असलेल्या महावीर चव्हाण यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाने भाजपला मोठा धक्का बसला आहे. सांगली बाजार समितीचे वैभव पाटील आणि उपसरपंच प्रमोद ढोले यांनी यासाठी विशेष प्रयत्न केले.
jayant patil news : संभाजी पवार गट जयंत पाटील गटात
गेल्या 25 ते 30 वर्षापासून संभाजी पवारांचे एकनिष्ठ शिलेदार म्हणून मिरज पश्चिम भागाबरोबरच जिल्ह्यात ओळखले जाणारे महावीर चव्हाण यांनी समडोळीच्या राजकारणात नोकडी सोडून उडी घेतली होती. संभाजी पवारांच्या पहिल्या म्हणजेच 1986 च्या पोटनिवडणुकीपासून त्यांच्या सोबत होते. समडोळीचे सरपंच, सर्वोदय कारखान्याचे संचालक, व्हा. चेअरमन, भाजपचे तालुका अध्यक्ष असा त्यांचा प्रवास राहिला आहे.
1986, 1990, 1995 आणि 1999 च्या विधानसभा निवडणुकीत संभाजी पवारांच्या खांद्याला खांदा लावून महावीर चव्हाणांनी काम केले होते. कारंदवाडी येथील सर्वोदय सहकारी साखर कारखान्याचे ते संस्थापक संचालक आहेत. 2009 च्या विधानसभा निवडणुकीत मतदार संघांची पुनर्रचना झाली आणि समडोळीचा समावेश इस्लामपूर मतदार संघात झाला. त्यावेळी पश्चिम भागातील कवठेपिरानचे नाना गुरव, कसबे डिग्रजचे बाळासाहेब मासुले, आष्ट्याचे अशोक वग्याणी यांनी जयंत पाटील गटात प्रवेश केला होता. परंतु महावीर चव्हाण यांनी संभाजी पवारांची साथ सोडली नव्हती.
संभाजी पवारांनंतर त्यांनी पृथ्वीराज पवारांना साथ दिली. पृथ्वीराज पवारांचाही त्यांच्यावर मोठा विश्वास होता.
परंतु बदल्यता राजकारणात जयंत पाटील यांच्याशिवाय मतदार संघाला पर्याय नाही हे ओळखून त्यांनी जयंत पाटील गटात प्रवेश केला आहे. सांगली बाजार समितीचे माजी सभापती वैभव पाटील आणि समडोळीचे उपसरपंच प्रमोद ढोले यांनी यासाठी विशेष प्रयत्न केले.

Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.



