jayant patil news : स्व. मारूती मानेंसारखे कवठेपिरान माझ्याच पाठिशी राहिली : आ. जयंत पाटील : ही केवळ विधानसभेची निवडणूक नसून विचारांची लढाई आहे. हे राज्य आपण कोणाच्या हातात देणार? याचा निर्णय आपणास घ्यायचा आहे. बहुजन समाजाचे हित आणि महाराष्ट्र धर्म जपण्यासाठी महाविकास आघाडीस ताकद द्या,असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष,इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आ.जयंतराव पाटील यांनी कवठेपिरान येथील जाहीर सभेत बोलताना केला. कुस्तीची मोठी परंपरा असणारे आपले गाव आहे.
jayant patil news : स्व. मारूती मानेंसारखे कवठेपिरान माझ्याच पाठिशी राहिली : आ. जयंत पाटील
एखादा पैलवान मोठ्या पैलवानाबरोबर जोड का धरतो? तर नाव होते, चार पैसे वाढवून मिळतात. मात्र आपला निकाल काय लागणार आहे, हे त्याला माहित असते, अशी टिपण्णीही त्यांनी केली. यावेळी आ.पाटील यांनी हिंदकेसरी स्व.मारुती माने (भाऊ) यांच्या आठवणींना उजाळा दिला.
युवा उद्योजक सचिन पाटील, श्रीबाळ वडगावे, माजी सभापती दत्ताजीराव पाटील, रंगराव पाटील, अशोक साळुंखे, प्रतापराव गुरव, रोहित साळुंखे, अनिकेत वडगावे, अवधूत पाटील, धरणग्रस्तांचे कार्यकर्ते शंकरराव सावंत, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष विजयराव पाटील, नेर्ल्याचे सरपंच संजय पाटील, आनंदराव नलवडे, धनपाल खोत, माजी महापौर मैमुद्दीन बागवान, पै.राहुल पवार, हरिदास पाटील, आयुब बारगीर, शकील मुजावर, युवक तालुकाध्यक्ष संग्राम पाटील, राजकेदार आटूगडे प्रामुख्याने उपस्थित होते.
आ.पाटील म्हणाले, सत्ता येते आणि जाते, मात्र लढणार्या माणसांची नोंद इतिहास घेत असतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या लढाऊ बाण्याची आपणास परंपरा आहे. राष्ट्रीय नेते पवारसाहेब दिल्लीश्वरांच्या विरोधात लढत आहेत. आपणासही लढावे लागेल. स्व.भाऊंनी मला पहिल्या 2009 च्या निवडणुकीत मोठी साथ दिली. गावनेही कायम प्रेम दिले आहे. तुतारी वाजविणारा माणूस हे चिन्ह घराघरापर्यंत पोचवा.
आपण पूर्वी आपले सरकार असताना पेठ-सांगली रस्ता केला होता. मात्र अलीकडे 10 वर्षात राज्यात व देशात भाजपाचे सरकार असतानाही रस्ता झाला नाही. रस्ता करण्यासाठी मी स्वतः ना.नितीन गडकरी साहेबांकडे मागणी करून पाठपुरावा केला आहे. सचिन पाटील म्हणाले, साहेबांनी गेल्या 5 वर्षात सव्वा सहा कोटी रुपयांचा निधी देवून गावातील अनेक विकासकामे मार्गी लावली आहेत. ते राज्याचे भावी मुख्यमंत्री आहेत. त्यांना आपल्या गावातून चांगले मताधिक्य देऊया. रोहित साळुंखे म्हणाले, आ.जयंतराव पाटील यांच्यासारख्या निष्ठावंत नेत्याच्या पाठीशी ताकदीने उभा राहूया. भाजपा अच्छे दिनचे स्वप्न दाखवीत सत्तेवर आला. मात्र त्यांनी 10 वर्षात काय केले?
अनिकेत वडगावे म्हणाले, आ.जयंतराव पाटील आपल्या सुख-दुःखात समरस झालेले नेते आहेत. ते चारित्र्यवान, उच्चशिक्षित आणि निष्कलंक आहेत, त्यांना साथ देऊया.पै.विनोद वडगावे यांनी स्वागत व प्रास्ताविक भाषणात आ.पाटील यांना मताधिक्य देण्याचे आवाहन केले. प्रतापराव गुरव यांनी आभार मानले. अवधूत पाटील यांनी सूत्रसंचालन केले. ग्रामपंचायत सदस्य सतिश पाटील, संजय काबळे, राजेंद्र तामगावे, प्रकाश सावर्डे, बबन येवले, संग्राम जाखलेकर, सर्वोदय पतसंस्थेचे अध्यक्ष रावसाहेब मडके, दादासाहेब मडके, दस्तगीर मुजावर, अकिल मुजावर, शामराव पाटील, बाळासाहेब खिचडे, युवक राष्ट्रवादी अध्यक्ष संदीप पाटील, तानाजी पाटील, कपिल किर्ते, बाबुराव पाटील, डॉ.जयपाल तामगावे, महादेव पाटील, रमेश पाटील, सुरेश सरडे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.



