jayant patil news : वाळवा तालुक्या तील १४ गावात ‘शिवजयंती व्याख्यानमाला २५’ : युवा नेते प्रतिकदादा पाटील यांच्या संकल्पनेतून छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रेरणादायी इतिहास आपल्या तालुक्यातील युवा पिढीपर्यंत नेण्यासाठी वाळवा तालुक्या तील १४ गावात गुरुवार दि.२० ते रविवार दि.२३ फेब्रुवारी दरम्यान ‘शिवजयंती व्याख्यानमाला २५’ हा प्रबोधनात्मक उपक्रम राबविला जात आहे.
jayant patil news : वाळवा तालुक्या तील १४ गावात ‘शिवजयंती व्याख्यानमाला २५’
प्रसिद्ध शिव व्याख्याते निलेश चव्हाण (छत्रपती संभाजी नगर) आणि निलेश जगताप (जेजुरी) यांचे १४ गावात ‘छत्रपती शिवरायांचे स्वराज्य आणि आजचा महाराष्ट्र’या विषयावर व्याख्यान होणार आहे. वाळवा तालुका युवक राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष या उपक्रमाचे संयोजन करीत आहे. ही माहिती तालुकाध्यक्ष संग्राम जाधव यांनी दिली.
माजी मंत्री आ.जयंतराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हा उपक्रम राबवित आहोत. गांव व वेळवार तपशील- दि.२० फेब्रुवारी सायंकाळी ७.३० वा. पेठ- निलेश चव्हाण, रात्री ८.०० वा.आष्टा- निलेश जगताप,दि.२१ फेब्रुवारी-सायंकाळी ६.०० बागणी,रात्री ८.००-कसबे डिग्रज,निलेश जगताप,सायंकाळी ६.३० वा.नेर्ले,रात्री ८.०० वा.कामेरी-निलेश चव्हाण,दि.२२ फेब्रुवारी- सायंकाळी ६.०० वा.बावची, रात्री ८.०० वा.वाळवा,निलेश जगताप,सायंकाळी ६.०० वा.रेठरे हरणाक्ष,रात्री ८.०० वा. बोरगाव- निलेश चव्हाण, दि.२३ फेब्रुवारी- सायंकाळी ६.०० वा.ऐतवडे खुर्द,रात्री ८.०० वा.येलूर- निलेश जगताप, सायंकाळी ६.०० वा.रेठरे धरण-निलेश चव्हाण.
युवक राष्ट्रवादीचे तालुका कार्याध्यक्ष देवराज देशमुख,इस्लामपूर शहराध्यक्ष दिग्विजय पाटील,उपाध्यक्ष अभिजीत कुर्लेकर,सरचिटणीस अभिजित रासकर, आष्टा शहराध्यक्ष शिवाजी चोरमुले,सोशल मिडियाचे विशाल माने,कपिल कदम, अभिमन्यु क्षीरसागर,विद्यार्थी संघटनेचे राजकेदार अटुगडे,रोहन देसाई आदी पदाधिकारी व कार्यकर्ते या उपक्रमाचे संयोजन करीत आहेत.

Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.



