rajkiyalive

jayant patil news : साहेब तुम्ही राज्य सांभाळा, आम्ही इस्लामपूरचा गड सांभाळतो

मिरज पश्चिम भागातील कार्यकर्त्यांचा निर्धार, जयंत पाटलांना विक्रमी मतांनी निवडून देण्याचा संकल्प

jayant patil news : साहेब तुम्ही राज्य सांभाळा, आम्ही इस्लामपूरचा गड सांभाळतो : जयंत पाटील साहेब तुमच्यावर राज्याची जबाबदारी आहे. तुम्हाला राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आणायची आहे, त्यामुळे तुम्ही इस्लामपूर मतदार संघांची काळजी करू नको, इस्लामपूरचा गड सांभाळायला कार्यकर्ते तत्पर आहेत, असे प्रतिपादन डिग्रज सर्कलमधील आठ गावातील कार्यकर्त्यांनी केला. डिग्रज सर्कलमधील कसबे डिग्रज, मौजे डिग्रज, कवठेपिराण, दुधागाव, सावळवाडी, माळवाडी, तुंग आणि समडोळी या गावातील कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा कवठेपिरान येथे आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी ही भावना मांडली.

jayant patil news : साहेब तुम्ही राज्य सांभाळा, आम्ही इस्लामपूरचा गड सांभाळतो

कवठेपिराण येथील उद्योजक सचिन पाटील आणि सतीश पाटील यांच्या पुढाकाराने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी जयंत पाटील स्वत उपस्थित होते. राजारामबापू कारखान्याचे चेअरमन प्रतिक पाटील, संजयबापू पाटील, विजयबापू पाटील, वैभव पाटील, प्रमोद ढोले, विलास आवटी, बाळासाहेब मासुले, भास्कर पाटील, विलास आवटी यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. जयंत पाटील म्हणाले, आपले नाते निवडणुकीपुरते नसून गेल्या कित्येक वर्षापासून आपले ऋणानुबंध आहेत. आपण या परिसराच्या विकासाला चालना दिली असून आपणही मला सातत्याने ताकद दिली आहे. राज्यातील जनतेचा महाविकास आघाडीस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून राज्यात आपले सरकार येऊ शकते. त्यानंतर आपण सांगाल,ते काम मार्गी लावू

आ.पाटील म्हणाले,काही लोक निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आपल्याकडे यायला लागले आहेत.

पैशाच्या जोरावर हे करू,ते करू अशी आश्वासने देत आहेत. मात्र त्यांचे प्रेम हे पुतणा-मावशीचे आहे. आपण विचलित होऊ नका,त्यांचा डाव ओळखा. काही माणसं तुमच्या मताचा लिलाव करू शकतात,त्यांच्यापासून सावध रहा. लाडक्या बहिणीला 1500 रुपये दिले म्हणून सांगतात, मग तिच्या सुरक्षिततेचे काय? राज्यात महागाई आणि भ्रष्टाचाराने कळस गाठला आहे. शेतीमालास भाव नाही. सामान्य माणूस या सरकार पासून त्रस्त झाला आहे. हे राज्य सरकार घालविण्याची राज्यातील जनतेची मानसिकता आहे.

विजयबापू पाटील म्हणाले,आ.जयंतराव पाटील राज्याच्या राजकारणात महत्वाची जबाबदारी पार पाडत असून आपण त्यांना ताकद देऊया.यावेळी प्रा.बाळासाहेब मासुले, सुस्मिता जाधव,संग्राम जाधव,देवराज देशमुख यांचीही भाषणे झाले.

प्रारंभी युवा नेते सचिन पाटील यांनी स्वागत, तर अवधूत पाटील यांनी प्रास्ताविक केले. याप्रसंगी रावसाहेब पाटील, श्रीबाळ वडगावे, राजेंद्र पाटील, बबन येवले, प्रकाश सावर्डे, सतीश पाटील, तानाजी पाटील, संग्राम जाखलेकर, रोहित साळुंखे, माणिक पाटील, शंकरराव सावंत, मदन करंडे, विकास कदम, राहुल माणगावे, संभाजी गावडे, तानाजी कोळी, भगवान कोळी, किरण पाटील, विजय आडमुठे, बाळासाहेब केरीपाळे, रावसाहेब मडके, प्रशांत जाधव, अमजद फकीर, बजरंग सूर्यवंशी, महाबल मुंडे, रमेश निर्वाने यांच्यासह विविध संस्थाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. माणिक पाटील यांनी आभार मानले.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज