jayant patil news : कासेगाव येथे रविवारी रंगणार ‘जयंत केसरी बैलगाडी शर्यती’चा थरार : माजी मंत्री आ.जयंतराव पाटील यांचे मार्गदर्शन व युवा उद्योजक अतुल लाहिगडे यांच्या संकल्पनेतून कासेगाव (ता.वाळवा) येथे आज रविवारी दि.१६ मार्च रोजी ‘जयंत केसरी बैलगाडी शर्यती’च्या तिसऱ्या पर्वाचा थरार रंगणार आहे. येथील आशियाई महामार्गावरील हॉटेल ९६ कुळी शेजारी या ऐतिहासिक खुल्या मैदानाच्या बैलगाडी शर्यती साठी खास मैदान तयार करण्यात आले आहे.
jayant patil news : कासेगाव येथे रविवारी रंगणार ‘जयंत केसरी बैलगाडी शर्यती’चा थरार
या मैदानात राज्यातील एका भव्य बैलगाडी शर्यतीचा थरार पाहण्याचा आनंद बैलगाडी शर्यतीप्रेमी घेणार आहेत. स्व.शरद लाहिगडे (अण्णा)फाउंडेशन,महाराष्ट्र राज्य व कासेगाव बैलगाडी संघटना या शर्यतीचे आयोजन करीत आहे. ही माहिती युवा उद्योजक,ग्राम पंचायत सदस्य अतुल लाहिगडे यांनी दिली.
या स्पर्धेतील प्रथम विजेत्यास स्व.शरद लाहिगडे (अण्णा) फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्याकडून रोख रुपये ५ लाख १६ हजार २६५ व कायम शिल्ड बक्षीस दिले जाणार आहे. दुसऱ्या विजेत्यास माजी नगरसेवक खंडेराव जाधव,एपिक यार्न प्रा.लि.चे डायरेक्टर आयुष अगरवाल,प्रशांत प्रताप पाटील (इस्लामपूर),सचिन बेडक्याल (इचल करंजी) यांच्याकडून रोख रक्कम रुपये ३ लाख ६ हजार २६५ व कायम शिल्ड,तिसऱ्या विजेत्यास त्रिमूर्ती गणेश मंडळ लाहिगडे- देशमुख गल्ली,जयवंत पवार (शेठजी) रेठरे हरणाक्ष,अँड.किरण मोरे सांगली यांच्याकडून रोख रुपये २ लाख ६ हजार २६५ व कायम शिल्ड,
चौथ्या विजेत्यास माजी जिल्हा परिषद अध्यक्ष देवराज पाटील दादा यांच्या कडून रोख रुपये १ लाख ६ हजार २६५ व कायम शिल्ड,पाचव्या विजेत्यास उद्योजक राहुल देवकर कासेगाव,इंजिनिअर दिलीप मोरे साखराळे,अमोल ठोंबरे यांच्याकडून रोख रु.६२ हजार २६५ व कायम शिल्ड,सहाव्या विजेत्यास अनिल आडके कासेगाव यांच्या कडून रोख रु.२६ हजार २६५,सातव्या विजेत्यास शाहीद चौधरी यांच्याकडून रोख रु.२६ हजार २६५ व कायम शिल्ड बक्षिस दिले जाणार आहे.
अभिनय राजाराम उबाळे इस्लामपूर यांच्याकडून सर्व कायम शिल्ड दिली जाणार आहेत. तसेच गाडी चालक, मालक यांना आकर्षक बक्षिस ठेवली असून महिला प्रेक्षकांच्यासाठी लकी ड्रॉ पध्दतीने पैठणी बक्षिस ठेवण्यात आली आहेत.
प्रेक्षकांच्यासाठी गॅलरीची बैठक व्यवस्था केली असून महिलांची स्वतंत्र बैठक व्यवस्था केलेली आहे. ही स्पर्धा सकाळी ९ ते रात्री उशिरापर्यंत चालणार असल्याने अद्यावत प्रकाश व्यवस्था केलेली आहे.प्रत्येक बैलगाडी साठी नोंदणी फी रुपये ३ हजार असून ऑन लाईन पध्दतीने नोंदणी करावी लागणार आहे. ऑन लाईन नोंदी व पेमेंटसाठी कोड देण्यात आला आहे.
स्पर्धेचा शुभारंभ रविवारी सकाळी ९ वाजता माजी जि.प.अध्यक्ष देवराज पाटील यांच्या हस्ते,विराज उद्योग समूहाचे अध्यक्ष विराज नाईक,यशवंत सहकारी ग्लुकोजचे अध्यक्ष रणधीर नाईक,माजी नगरसेवक खंडेराव जाधव यांच्या उपस्थितीत केला जाणार आहे. तर माजी मंत्री आ.जयंतराव पाटील यांच्या हस्ते,माजी आमदार मानसिंगभाऊ नाईक यांच्या उपस्थितीत विजेत्यांना बक्षीस वितरण केले जाणार आहे. या स्पर्धेस अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
विकास लाहिगडे,मकरंद माने,विक्रम गावडे, विकास पाटील(भैय्या),सोमनाथ लाहिगडे, अक्षय लाहिगडे,संभाजी निवास पाटील,अमोल ठोंबरे,सोन्या साकुर्डीकर, सुशांत माने, जितेंद्र पाटील,बजरंग माळी, शरद शिणगारे, अनिकेत कुंभार,कन्हैया बोडरे,पोपट माने, सागर पाटील,विजय काकडे,अभिषेक दंडवते सागर कांबळे, अभिनव उबाळे,योगेश मोठे,माळशिद शेंडगे,मोन्या मुल्ला,विनोद लाहिगडे, गजराज देशमुख,सुरज देशमुख,साहिल शेख, दिग्विजय बडेकर,अमित देशमुख यांच्यासह फाउंडेशनचे कार्यकर्ते नियोजन करीत आहेत.
प्रतिकदादा पाटील यांची भेट व जय्यत तयारीचे कौतुक।।
राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रतिकदादा पाटील यांनी मैदानास भेट देऊन शर्यतीच्या तयारीची पाहणी केली. यावेळी त्यांनी शर्यतीच्या जय्यत तयारीचे कौतुक केले. याप्रसंगी माजी
जि.प.अध्यक्ष देवराज पाटील,स्पर्धेचे मुख्य संयोजक अतुल लाहिगडे व कार्यकर्ते उपस्थित होते.

Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.



