rajkiyalive

jayant patil news : अजित पवारांना चूक कळून उपयोग काय, ते महायुतीतून बाहेर पडणे अशक्य: आ. जयंत पाटील

जनप्रवास । प्रतिनिधी
jayant patil news : अजित पवारांना चूक कळून उपयोग काय, ते महायुतीतून बाहेर पडणे अशक्य: आ. जयंत पाटील : विधानसभा निवडणुका काही दिवसात जाहीर होतील. यापूर्वीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांना घरात फूट पडल्याची चूक कळाली. पण त्यांना महायुतीमधून बाहेर पडणे शक्य नाही. कारण त्यांच्यावर अजून कारवाईची टांगती तलवार कायमच असल्याचे मत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.

jayant patil news : अजित पवारांना चूक कळून उपयोग काय, ते महायुतीतून बाहेर पडणे अशक्य: आ. जयंत पाटील

आ. जयंत पाटील शनिवारी सांगलीत एका कार्यक्रमासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घरात फूट पडली ही चूकच झाली, असे मत व्यक्त केले होते. यावर आ. जयंत पाटील यांना विचारले असता ते म्हणाले, अजित पवार यांनी चूक झाल्याबाबत आपले मत व्यक्त केले आहे. पण त्यांच्यावर कारवाईची टांगती तलवार कायम आहे. त्यामुळे ते महायुतीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेऊ शकत नाहीत. निवडणुकीच्या तोंडावर आहेत. त्या पार्श्वभूमीवर ते कोणतीही वेगळी भूमीका येणार नाहीत, असे मत आ. जयंत पाटील यांनी व्यक्त केले.

निवडणुकीपूर्वी सीबीआय, ईडीच्या धाकाने भाजप राजकारण करत होते, पण हे राजकरण आता टिकणार नाही. आणि ते देखील करणार नाहीत. अशा यंत्रणांचा कशाासाठी वापर होतो, हे जनतेला कळाले आहे. विधानसभेपूर्वी पुन्हा या यंत्रणांची भिती दाखवली तर भाजपला याचा फटका बसेल. विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या घटकांबरोबर जागा वाटपाच्या चर्चा सुरू आहेत. पण अंतिम धोरण अद्याप ठरले नाही. या संदर्भात वरिष्ठ नेते एकत्र येऊन चर्चा करतील, असे मत आ. जयंत पाटील यांनी व्यक्त केले.

ते पुढे म्हणाले, सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या घरी पंतप्रधान नरेंद्र मोदी आरतीला जातात, यातून न्यायव्यवस्थेबद्दल साशंकता व्यक्त होत आहे. न्यायव्यवस्थेचे कोणतेही संकेत पाळले जात नसल्याचे दिसत आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कोणत्याही पुराव्याशिवाय इतके महिने तुरुंगात टाकले जात असेल तर न्यायाची अपेक्षा कशी करायची, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. ङ्गहीट अ‍ॅण्ड रनङ्ख प्रकरणात बावनकुळे यांच्या मुलाचा समावेश आहे की नाही, याची मला माहिती नाही. मात्र, या प्रकरणातील सीसीटीव्ही फूटेज गायब होणे, ही बाब गंभीर आहे, असे मत आ. जयंत पाटील यांनी व्यक्त केले.

लाडकी बहिणमुळे विकासकामांच्या निधीला कात्री…

राज्य शासनाने निवडणुकीच्या तोंडावर लाडकी बहिण योजना सुरू केली आहे. ही योजना निवडणुकीसाठीच असल्याचे सर्वांना कळाले आहे. पण सरकारची ङ्गअति तिथे मातीङ्ख होईल. या योजनेचा फायदा होणार नाही. या योजनेमुळे राज्याला आणखी आर्थिक संकटात टाकले जात आहे. विकासकामांसाठी दिल्या जाणार्‍या निधीला कात्री लावली आहे. भविष्यात एक रुपयासुद्धा विकासकामांना मिळणार नाहीत, असे मत आ. जयंत पाटील यांनी व्यक्त केले.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज