JAYANT PATIL : आ. जयंत पाटील समर्थकांचा मोठा गट अजितदादांच्या गळाला : मनपा क्षेत्रात खळबळ राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील समर्थक माजी महापौर व माजी नगरसेवकांनी बुधवारी राष्ट्रवादीचे नेते, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची भेट घेतली. यामुळे मनपाच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. दरम्यान, ही भेट राजकीय नसल्याचा खुलासा माजी महापौरांनी केला आहे.
JAYANT PATIL : आ. जयंत पाटील समर्थकांचा मोठा गट अजितदादांच्या गळाला : मनपा क्षेत्रात खळबळ
जनप्रवास । सांगली:
मात्र राष्ट्रवादी शहर जिल्हाध्यक्ष (अजितदादा गट) पद्माकर जगदाळे यांच्या नेतृत्वाखाली या टीमने उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
सहा महिन्यापूर्वी राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली होती. अजितदादा पवार यांनी राष्ट्रवादीच्या काही खासदार व आमदारांसह शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला होता. त्या पाठिंब्याच्या जोरावर अजितदादा उपमुख्यमंत्री झाले, तर राष्ट्रवादीतील काहीजणांना मंत्रीपदाची लॉटरी लागली. त्यावेळीपासून राज्यात अजितदादा व शरद पवार असे दोन गट निर्माण झाले आहेत.
दोन्ही नेत्यांकडून पक्षवाढीसाठी प्रयत्न सुरू आहेत.
त्याचे पडसाद महापालिका क्षेत्रात देखील उमटले होते. माजी महापौर दिग्विजय सूर्यवंशी, इद्रिस नायकवडी, माजी नगरसेवक पद्माकर जगदाळे, जमील बागवान यांच्यासह अनेकांनी अजितदादा पवार गटामध्ये प्रवेश केला. त्यानंतर महापालिका क्षेत्रात अजितदादा गटाची ताकद वाढविण्याचे काम सुरू झाले आहे. आ. जयंत पाटील समर्थक देखील अजितदादांच्या संपर्कात गेल्या पंधरा दिवसांपासून होते. त्यांनी अखेर बुधवारी मुंबईत अजितदादांची भेट घेतली. राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी ही भेट घेतली.
जगदाळे यांनी अनेक माजी नगरसेवकांना अजितदादा पवार यांच्याबरोबर चर्चा घडवून आणली.
यावेळी आ. जयंत पाटील गटाचे माजी महापौर मैनुद्दीन बागवान, विष्णू माने, भाजपचे सुरेश आवटी, आनंदा देवमाने आदी उपस्थित होते. त्यांच्यात सुमारे वीस मिनिटे चर्चा झाली. या बैठकीत जगदाळे यांनी अनेक माजी नगरसेवकांना अजितदादा पवार यांच्याबरोबर चर्चा घडवून आणली. हे नगरसेवक लवकरच अजितदादांच्या गटात जाहीर प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे. त्यांनी अजित पवार गटांमध्ये काम करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आ. जयंत पाटील यांना मोठा धक्का बसला आहे.
हेही वाचा
सामना भाजप-काँग्रेसचा, लक्ष्य जयंतरावांच्या भूमिकेकडे
जयंत पाटील यांच्यापुढे प्रत्येकवेळी नवा उमेदवार
खुजगावचे धरण आज असते तर…..राजारामबापुंची आठवण
जयंत पाटलांना घेरण्यासाठी महाडिकांची तयारी
राज्यात चर्चा केवळ जयंत पाटलांचीच…
वारसा असूनही… न झालेले आमदार...
अजितदादांवर विश्वास वाढू लागला: पद्माकर जगदाळे
राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यावर माजी पदाधिकार्यांचा विश्वास वाढू लागला आहे. अनेकजण त्यांच्या नेतृत्वाखाली महापालिका क्षेत्रात काम करणार आहेत. बुधवारी माजी पदाधिकार्यांनी अजितदादांची भेट घेतली. राजकीय चर्चा झाली. अजितदादांवर काम करण्याची ग्वाही देखील दिली. शिवाय मनपा क्षेत्राच्या विकासासाठी अधिकाधिक निधी देण्याची जबाबदारी अजितदादांनी दिली आहे. त्यामुळे अनेकजण अजितदादांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीत काम करतील, असा विश्वास राष्ट्रवादी शहर जिल्हाध्यक्ष अजितदादा गट पद्माकर जगदाळे यांनी व्यक्त केला.
निधीसाठी भेटलो, प्रवेश नाही: मैनुद्दीन बागवान
महाविकास आघाडी सरकारमध्ये उपमुख्यमंत्री असताना अजित पवार यांनी महापालिका क्षेत्रासाठी निधी देण्याची घोषणा केली होती. मिरज आणि कुपवाड येथिल विकास कामांसाठी त्यांनी निधी उपलब्ध करुन द्यावा. यासाठी पवार यांची भेट घेतली. तब्बल तास भर चर्चा झाली. मिरज दर्गा प्रस्तावाबाबतही त्यांच्याशी चर्चा केली. शिवाय मिरज सिव्हिल हॉस्पिटलच्या निधी देखील चर्चा झाली. भाजपचेही काही नगरसेवक उपस्थित होते. दादांनी निधी देण्याची ग्वाही दिली आहे. दादा गटांमध्ये प्रवेश करण्याबाबत कोणताही विचार नाही. तशी चर्चाही झाली नसल्याचे माजी महापौर मैनुद्दीन बागवान यांनी सांगित

Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.



