माजी मंत्री आ.जयंतराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त इस्लामपूर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने येथील पोलीस परेड ग्राऊंडवर आयोजित जयंत चषक क्रिकेट स्पर्धेच्या प्रदर्शनीय सामन्यात पत्रकार संघाने यावर्षी विजयाची परंपरा कायम ठेवली.
Jayant patil news : जयंत चषक क्रिकेट स्पर्धेच्या प्रदर्शनीय सामन्यात पत्रकार संघाचा दुसऱ्या वर्षीही विजय।।
या स्पर्धेत नगरसेवक संघ,डॉक्टर सेल संघ,नगरपालिका कर्मचारी व वकील संघटना संघाने उत्कृष्ठ खेळाचे दर्शन घडवित प्रति स्पर्धी संघावर मात केली. युवा नेते प्रतिक दादा पाटील यांच्या संकल्पनेतून कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना खेळाची आवड व संधी देण्या साठी गेल्या वर्षापासून या स्पर्धा घेतल्या जात आहेत. माजी मंत्री आ.जयंतराव पाटील यांनी स्पर्धेस भेट देत शुभेच्छा दिल्या.
पहिला सामना राजारामबापू साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रतिकदादा पाटील यांच्या नेतृत्वाखालील राजारामबापू सहकारी साखर कारखाना संचालक संघ व पत्रकार संघात झाला. प्रथम फलंदाजी करताना राजारामबापू संघाने ५ षटकात ५० धावा काढल्या. यामध्ये माजी जि.प.अध्यक्ष देवराज पाटील यांनी ५ चौकारासह २९ धावांचे योगदान केले. त्यांना अमरसिंह साळुंखे, दीपक पाटील यांनी चांगली साथ दिली. प्रतिकदादांनी ४ धावा करीत २ विकेट घेतल्या. त्यास उत्तर देताना पत्रकार संघाचे युनूस शेख यांनी ६ चौकारास २७ धावा, विनोद मोहिते यांनी एका षटकारासह ११ धावा आणि शांताराम पाटील यांनी ४ धावा काढत पत्रकार संघाने विजय पटकाविला.
नगरपालिका कर्मचारी व पोलीस यांच्यात चुरशीचा सामना झाला. या सामन्यात कर्मचारी संघाने पोलीस संघावर १८ धावांनी विजय मिळविला. डॉक्टर सेल संघाने राजारामबापू बँक संघावर,नगरसेवक संघाने राजारामबापू दूध संघावर,तर वकील संघटना संघाने वाळवा तालुका युवक राष्ट्रवादी काँग्रेस संघास पराभूत केले.
प्रारंभी स्पर्धेचा शुभारंभ युवा नेते प्रतिकदादा पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी प्रा.शामराव पाटील,अँड. चिमणभाऊ डांगे,शहराध्यक्ष शहाजी पाटील, दादासाहेब पाटील,खंडेराव जाधव,अँड. धैर्यशिल पाटील,संजय पाटील,संदीप पाटील, सुभाषराव सूर्यवंशी,विश्वनाथ डांगे,सुनिल मलगुंडे,सचिन कोळी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
जेष्ठांचाही खेळात सहभाग।।
राजारामबापू दूध संघाचे अध्यक्ष नेताजीराव पाटील,माजी अध्यक्ष विनायक पाटील,उपाध्यक्ष शशिकांत पाटील,जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब पाटील यांच्यासह अनेक जेष्ठ पदाधिकारी,संचालक,नगरसेवक या स्पर्धेतील प्रदर्शनीय सामन्यात खेळले. अनेकांना फलंदाजी,गोलंदाजीसह क्षेत्ररक्षण करताना अडचणी येत होत्या. त्यातून अनेक गंमती-जमती झाल्या. मात्र सर्वांनी हेल्दी खेळ केला

Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.



