rajkiyalive

jayashri patil news : जयश्रीताई पाटील यांचा भाजप प्रवेश निश्चित?

जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षा जयश्रीताई पाटील यांचा भाजप प्रवेश निश्चित झाल्याचे समजते. त्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे उच्च तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील हे आज (सोमवारी) जयश्रीताईंची सांगलीतील त्यांच्या घरी भेट घेणार आहेत. मंगळवारी अथवा बुधवारी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे संकेत आहेत. त्यामुळे मदनभाऊ गटही भाजपसोबत jayashri patil news : जयश्रीताई पाटील यांचा भाजप प्रवेश निश्चित? : जाणार असल्याचे स्पष्ट असून काँग्रेससाठी हा मोठा धक्का आहे.

jayashri patil news : जयश्रीताई पाटील यांचा भाजप प्रवेश निश्चित?

चंद्रकांतदादा पाटील भेटणार, दोन दिवसांत फडणवीसांच्या उपस्थितीत मुंबईत प्रवेश

विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाने माजी मंत्री मदनभाऊ पाटील गटाच्या नेत्या, जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षा जयश्रीताई पाटील यांना उमेदवारी दिली नव्हती. त्यामुळे त्यांनी अपक्ष निवडणूक लढवली. काँग्रेस पक्षाने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली. पाटील यांनी आता वेगळी राजकीय वाटचाल सुरु करण्याचा निर्णय घेतला होता. काही दिवसांपूर्वीच त्यांनी कार्यकर्त्यांची मते जाणून घेतली. यावेळी त्यांना भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसची ऑफर असल्याचे सांगण्यात आले होते. शुक्रवारी व शनिवारी त्या मुंबईत होत्या. यावेळी भाजपच्या प्रदेश नेत्यांनी त्यांना संपर्क साधला. त्यासाठी सांगली जिल्ह्यातील एका नेत्याने प्रयत्न केले होते.

जयश्रीताई पाटील यांना भाजपबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसकडून देखील ऑफर देण्यात आली होती.

राष्ट्रवादीचे नेते व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे त्यांच्या संपर्कात होते. त्यामुळे जयश्रीताई पाटील भाजपमध्ये जाणार की राष्ट्रवादीत? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अशातच जयश्रीताई पाटील यांचा यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला असल्याचे समजते. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील हे रविवारपासून सांगलीत आहेत. सोमवारी सकाळी जयश्रीताईंची भेट घेणार असून प्रवेशाबाबत सविस्तर चर्चा करणार असल्याचे समजते.

jayashri-patil-news-is-jayashritai-patils-entry-into-bjp-certain

आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या वरिष्ट नेत्यांनी जयश्रीताई पाटील यांना भाजपमध्ये घेण्याचा आग्रह आहे. त्यामुळे जयश्रीताई प्रमुख पदाधिकार्‍यांसह मंगळवारी अथवा बुधवारी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करतील, असे स्पष्ट संकेत मिळत आहेत. त्यामुळे काँग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

मदनभाऊ गटाचे नगरसेवकही जाणार
महानगरपालिकेच्या निवडणुकीपूर्वी मदनभाऊ गट भाजपबरोबर यावा, यासाठी प्रदेश पातळीवरील भाजपच्या नेत्यांनी जयश्रीताई पाटील यांना संपर्क केला आहे. त्यांच्याशी चर्चेनंतर जयश्रीताई यांचा भाजपमध्ये प्रवेश निश्चित झाला आहे. जयश्रीताई पाटील यांच्यासोबत मदनभाऊ गटाचे माजी नगरसेवकही प्रवेश करणार आहेत.
Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज