rajkiyalive

jayashritai patil news : जयश्रीताईंचे ठरले, बुधवारी भाजपमध्ये प्रवेश; चंद्रकांतदादांची शिष्ठाई यशस्वी

jayashritai patil news : जयश्रीताईंचे ठरले, बुधवारी भाजपमध्ये प्रवेश; चंद्रकांतदादांची शिष्ठाई यशस्वी ” लकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सोमवारी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षा जयश्रीताई पाटील यांची निवासस्थानी भेट घेत भाजप प्रवेशाची चर्चा केली. जयश्रीताई पाटील यांनी बुधवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले. 

jayashritai patil news : जयश्रीताईंचे ठरले, बुधवारी भाजपमध्ये प्रवेश; चंद्रकांतदादांची शिष्ठाई यशस्वी

भाऊंच्या कार्यकर्त्यांना ताकद देऊ: ना. चंद्रकांतदादा पाटील

मदनभाऊ पाटील गटाच्या कार्यकर्त्यांना भाजपमध्ये अंतर पडू देणार नाही. शेतकरी बँकेच्या कायदेशीर विषयात कायदेशीर मदत करू, अशी ग्वाही पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली. काँग्रेसमधून निलंबित केल्यानंतर जयश्रीताई पाटील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र जयश्रीताई पाटील यांना थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप प्रवेशाची ऑफर दिली.

त्यानंतर पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील सोमवारी जयश्रीताई पाटील यांची विजय बंगल्यावर भेट घेतली. यावेळी आ. सुधीर गाडगीळ, आ. सुरेश खाडे, भाजपचे जिल्हाध्यक्ष सम्राट महाडीक, जनसुराज्य पक्षाचे नेते समित कदम, शेखर इनामदार, मकरंद देशपांडे, सुरेश आवटी, माजी महापौर किशोर जामदार, विजय धुळूबुळू, कांचन कांबळे, किशोर शहा आदी उपस्थित होते.

पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, जयश्रीताई पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली.

त्यांनी मदनभाऊंच्या कार्यकर्त्यांना न्याय देण्याचे आश्वासन दिले आहे. त्यांच्या उपस्थितीत बुधवारी मुंबईत हा पक्ष प्रवेश होणार आहे. जयश्रीताई पाटील व त्यांच्या कार्यकर्त्यांना जिल्हा नियोजन समितीसह जिथे जिथे सत्तेचे वाटप आहे, तिथे पुरेशी संधी देणार आहे. भाजपमध्ये येणार्‍या प्रत्येकाला पक्षाने काही ना काही दिले असून सन्मानाने वागवले असल्याचे पाटील यांनी सांगीतले. जयश्री पाटील यांना शंभर टक्के पक्षात न्याय दिला जाईल, अशी ग्वाही दिली.

ते पुढे म्हणाले, जयश्री पाटील स्वत:साठी नव्हे तर कार्यकर्त्यांसाठी हा पक्ष प्रवेश करत आहेत. जयश्री पाटील व त्यांच्या मुलींना वसंतदादा बॅँकेच्या जोखडातून सोडवण्याची आमची तयारी होती मात्र पाटील यांनी आम्हालाच नव्हे तर आमच्या कार्यकर्त्यांनाही यातून बाहेर काढण्याची मागणी केली. सामान्य माणसांसाठी, कार्यकर्त्यांसाठी काम करण्याचा वारसा त्यांना वसंतदादा, मदनभाऊंपासून मिळाला आहे. त्याचा हा गुण मला अधिक भावला आहे. वसंतदादा बॅँकेतून त्यांना व त्यांच्या सहकार्‍यांना कायदेशीर रित्या सोडवले जाईल, अशी ग्वाही दिली.

यावेळी आंनदराव पाटील, सुभाष यादव, नरसगोंडा पाटील, माजी महापौर सुरेश पाटील, माजी नगरसवेक हणमंत पवार, माजी विरोधी पक्षनेते उत्तम साखळकर, संजय मेंढे, माजी नगरसेवक संतोष पाटील, प्रकाश मुळके, प्रशांत पाटील, शेवंता वाघमारे, रोहिणी पाटील, मृणाल पाटील, विष्णू अण्णा खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष संग्राम पाटील, मदनभाऊ युवा मंचचे अध्यक्ष आनंद लेंगरे, कार्यध्यक्ष शितल लोंढे यांच्यासह मदनभाऊ पाटील गटाचे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

jayashritai-patil-news-jayashritai-decided-to-join-bjp-on-wednesday-chandrakantdadas-training-successful

कार्यकर्त्यांच्या हितासाठी भाजपबरोबर: जयश्रीताई पाटील

काँग्रेसमधून निलंबित केल्यानंतर कुठल्यातरी पक्षात प्रवेश करणे आवश्यकच होते. भाजप, राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्यासह अन्य पक्षांचीही ऑफर होती. गेली तीन महिने मी कार्यकर्त्यांशी याबाबत चर्चा करत होते. बहुसंख्य कार्यकर्त्यांनी भाजपसोबत जाण्याचे मत मांडले. कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी व जनतेच्या हितासाठी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी मी स्वत: बोलले. त्यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेशाचे त्यांनी मान्य केले आहे. सांगलीच्या विकासासाठी, लोकांची अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी हा पक्ष प्रवेश होत असून माजी मंत्री मदनभाऊ पाटील यांचे विकासाचे स्वप्न पूर्ण करणार आहे. यापुढे मी व माझे कार्यकर्ते भाजपचे काम प्रामाणिकपणे करतील.

खा. विशाल पाटलांनी प्रवेश करावा अन्यथा उमेदवार तयार करू…

माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील आणि भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेचर, कल्चर एकच आहे ते म्हणजे सामान्य माणसांसाठी काम करणे. त्यामुळे वसंतदादांच्या घराण्यातील कोणी तरी आपल्या पक्षात पाहिजे ही आमची खूप वर्षापासून इच्छा होती. जयश्रीताईंनी आता प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. खा. विशाल पाटील सकाळीच एका कार्यक्रमात भेटले त्यांना तुमच्याच घरी निघालोय असे सांगून जयश्रीताईंच्या घरी आलो.

त्यांनी जा म्हणून सांगितले. पण मला प्रत्यक्षात खा. विशाल पाटील यांच्या घरी जायचे आहे. विशाल पाटील यांना भाजप प्रवेशाची माझी ऑफर आजही कायम आहे. त्यांचे बधू प्रतिक पाटील यांच्या पक्ष प्रवेशाची आम्ही वाट पाहत आहे. अन्यथा आम्ही 2029 आमचा उमेदवार तयारी करू. देवेंद्र फडणवीस काहीही करू शकतात, असे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणाले.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज