rajkiyalive

kagal vidhansabha eiection 2024 :कायम काठावरच जिंकणार्‍या मुश्रीफांचा वारू समरजीत रोखणार?

दिनेशकुमार ऐतवडे

kagal vidhansabha eiection 2024 :कायम काठावरच जिंकणार्‍या मुश्रीफांचा वारू समरजीत रोखणार?: लोकसभा निवडणुकीनंतर पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील राजकारण पुन्हा एकदा पेटले आहे. कागलचे राजे समरजीत घाटगे यांनी भाजपला रामराम करून तुतारी हातात घेण्याचे ठरविले आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत त्यांनी मेळावा घेतला असून, 3 सप्टेंबर रोजी पक्ष प्रवेश करणार आहेत. त्यामुळे कागल पुन्हा एकदा फ्रंटपेजवर आले आहे. सलग पाच वेळा निवडून आलेल्या हसन मुश्र्रीफांची विजयाची डबल हट्रीक होणार की घाटगे त्यांना क्लिन बोल्ड करणार हे येणार्‍या निवडणुकीत कळेल.

kagal vidhansabha eiection 2024 :कायम काठावरच जिंकणार्‍या मुश्रीफांचा वारू समरजीत रोखणार?

कोल्हापूरच्या राजकारणात कागल विधानसभा मतदार संघ कायमच चर्चेत राहिले आहे. आजपयंर्र्त सदाशिवराव मंडलिक, विक्रमसिंह घाटगे, हसन मुश्रीफ यांनी या मतदार संघातून प्रतिनिधित्व केले आहे. मुश्रीफ तर 1999 पासून या मतदार संघाचे आमदार आहेत. एकाकाळी सदाशिवराव मंडलिकांचे सोबती असणार्‍या मुश्रीफांनी त्यांच्यासोबत सवतासुभा मांडला आणि वेगळी चूल मांडली. त्यावेळी पासून मंडलिक आणि मुश्र्रीफ असा सामना या मतदार संघात रंगला आहे. गेल्या पाच निवडणुकीत मुश्रीफांच्या मताची टक्केवारी वाढतच चालली आहे.
1972 च्या निवडणुकीपासून सदाशिवराव मंडलिकांचे पर्व सुरू झाले. पहिल्याच निवडणुकीत त्यांनी अपक्ष म्हणून बाजी मारली काँग्रेसच्या दत्ताजीराव निकमांचा त्यांनी पराभव करून विधानसभेत प्रवेश केला.

1978 च्या निवडणुकीतही त्यांनी अपक्ष म्हणून आपली उमेदवारी जाहीर केली. परंतु त्याचवेळी कागलचे राजे विक्रमसिंह घाटगे यांनीही अपक्ष उमेदवारी भरली. काँग्रेसने हिंदूराव पाटील यांनी उमेदवारी दिली. कागलच्या राजेंचा मोठा विजय झाला. विक्रमसिंह आमदार झाले.
दोन वर्षातच सरकार कोसळले. पुन्हा निवडणुका लागल्या. काँग्रेसमध्ये उभी फूट पडली होती. इंदिरा काँग्रेसतर्फे विक्रमसिंह घाटगे मैदानात उतरले तर रेड्डी काँग्रेसतर्फे सदाशिवराव मंडलिड उभे राहिले. पुन्हा एकदा घाटगेंनी बाजी मारली.

1985 मध्ये शरद पवारांनी समाजीवादी काँग्रेसची स्थापना केली होती. सदाशिवराव मंडलिक यांनी शरद पवार गटाकडून उभे राहिले तर काँग्रेसकडून पुन्हा एका विक्रमसिंह घाटगेंना उमेदवारी मिळाली. यावेळी मात्र मंडलिकांनी घाटगेंची विजयाची हॅटट्रीक चुकवून विजयी झाले.
1990 मध्ये सदाशिवराव मंडलिक काँग्रेसमध्ये होते. त्यामुळे विद्यमान आमदार असल्यामुळे काँग्रेसचे तिकीट त्यांना मिळाले. त्यांच्या विरोधात जनतादलातर्फे संजय घाटगे मैदानात उतरले होते. परंतु त्यांची डाळ शिजली नाही. मंडलिक पुन्हा विजयी झाले.

1995 मध्ये पुन्हा एकदा विक्रमसिंह घाटगेंनी नशीब आजमावण्याचा प्रयत्न केला. परंतु सदाशिवराव मंडलिक हेच पुन्हा विजयी झाले.
1999 मध्ये काँग्रेसमध्ये फूट पडली. शरद पवारांनी राष्ट्रवादीची स्थापना केली. सदाशिवराव मंडलिक खासदार झाले होते. त्यामुळे ही जागा हसन मुश्रीफांना मिळाली. त्यांच्या विरोधात काँग्रेसने संजयबाबा घाटगे यांना उभे केले. परंतु पहिल्याच प्रयत्नात हसन मुश्र्रीफ विजयी झाली. तेंव्हापासून 2004, 2009, 2014 आणि 2019 असे सलग पाच वेळा ते कागलमधून आमदार झाले आहेत. त्यांना पराभूत करण्यासाठी अनेक प्रयत्न झाले परंतु त्यामध्ये कोणीही यशस्वी होवू शकले नाही.

गेल्या पाच वर्षापासून कागलचे समरजीत घाटगे यांनी भाजपच्या माध्यमातून लोकसंपर्क वाढविला आहे. त्यांना तिकीट मिळेल, अशी खाली होती. परंतु गेल्या दोन वर्षात राज्याचे राजकारण बदलले. शिंदे गट आणि अजित पवार गट भाजपासोबत गेले. आणि गेल्याच महिन्यात अजित पवारांनी कागलमधून हसन मुश्रीफांची उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे समरजित घाटगेंना उमेदवारी मिळणार नाही हे निश्चित झाले. त्यामुळे त्यांनी निर्णय घेतला. जयंत पाटील यांनीही त्यांच्याशी चर्चा केली. आणि 3 सप्टेंबर रोजी त्यांचा पक्षप्रवेश ठरला आहे. त्यामुळे येणार्‍या विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा घाटगे आणि मुश्र्रीफ असा सामना रंगणार आहे. या निवडणुकीतील समिकरणे बदलली आहेत. महायुती आणि महाविकास आघाडी असा सामना होणार आहे. लोकसभेला महायुतीचा पराभव झाला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या आशा वाढल्या आहेत.

हसन मुश्रीफांचा कायमच काठावरच विजय
गेल्या पाच निवडणुकीत कागलमधून आमदार होत असलेल्या मुश्रीफांना विजयासाठी झगडावे लागत आहे. 1999 मध्ये 3 हजार, 2004 मध्ये 1 हजार, 2009 मध्ये 50 हजार, 2014 मध्ये 5 हजार तर 2019 मध्ये 18 हजार मताधिक्याने जिंकत आले आहेत. 2009 मध्ये संजय घाटगे आणि समरजित घाटगे यांनी प्रत्येकी 57 हजार मते घेतली होती. त्यामुळे हसन मुश्र्रीफांना कायमच विजयासाठी संघर्ष करावा लागत आहे.

 

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज