rajkiyalive

KARAMVIR PATSANSHTA : कर्मवीर पतसंस्थेने अण्णांचे नाव मोठे केले

वसगडे येथे कर्मवीर पतसंस्थेच्या वास्तु स्थलांतरप्रसंगी आ. डॉ. विश्वजीत कदम, प्रकाश पवार, रावसाहेब पाटील, अशोक सकळे, भारती चोपडे, सीईओ अनिल मगदूम आदी.

 

KARAMVIR PATSANSHTA : कर्मवीर पतसंस्थेने अण्णांचे नाव मोठे केले : आ. डॉ. विश्वजीत कदम ः कर्मवीर पतसंस्थेचे वसगडे शाखेचे स्थलांतर

 

 

 

KARAMVIR PATSANSHTA : कर्मवीर पतसंस्थेने अण्णांचे नाव मोठे केले :

सांगली : कर्मवीर अण्णांनी शैक्षणिक कार्य रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून उभे केले. त्यानंतर कर्मवीर पतसंस्थेने आर्थिक क्षेत्रात अण्णांचे नाव पुढे नेण्याचे कार्य केल्याचे गौरवोद्वार आ. डॉ. विश्वजीत कदम यांनी काढले.

कर्मवीर पतसंस्था सांगलीच्या वसगडे येथील शाखेचे प्रशस्त वास्तुत स्थलांतर

डॉ. कदम यांच्याहस्ते संपन्न झाले. याप्रसंगी ते बोलत होते. कर्मवीर पतसंस्थेने जवळपास सात लाख लोकांचे जीवन उजळवण्याचे कार्य केले आहे. संस्थेची प्रगती पाहता संस्थेला महाराष्ट्र राज्याचे कार्यक्षेत्र देखील अपुरे पडेल. या प्रगतीच्या चढत्या आलेखामुळे कर्मवीर पतसंस्था राज्यात नव्हे तर देशात आदर्श म्हणुन पुढे येईल.

 

सांगली कोल्हापूर सातारा जिल्हा कार्यक्षेत्रात संस्थेच्या 60 शाखा कार्यरत

प्रास्ताविक संस्थेचे चेअरमन रावसाहेब पाटील यांनी करताना संस्था करीत असलेल्या कार्यामध्ये अर्थकारण, प्रगती, तंत्रज्ञान, ग्राहकसेवा, समाजसेवा या कार्याचा आढावा दिला. सांगली कोल्हापूर सातारा जिल्हा कार्यक्षेत्रात संस्थेच्या 60 शाखा कार्यरत आहेत. सभासदांच्या विश्वासावर संस्थेने 1020 कोटीच्या ठेवी जमा आहेत. तर 795 कोटीचे कर्ज वाटप केल्याचे सांगितले.

सुत्रसंचलन संजय सासणे यांनी तर संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. अशोक सकळे यांनी आभार मानले.

यावेळी सत्यविजय बँकेचे अध्यक्ष प्रकाश पवार, नरसगोंडा पाटील, अरविंद पाटील, सरपंच वृषाली काशिद, उपसरपंच अनिल पाटील, ब्रम्हनाळचे सरपंच गिता गायकवाड, उपसरपंच सुभाष वडर, माजी पं. स. सदस्य प्रल्हाद गडदे, संचालक अँड एस. पी. मगदूम, डॉ. रमेश ढबू, ए. के. चौगुले, वसंतराव नवले, डॉ. एस. वी. पाटील, संचालिका भारती चोपडे, सचिन पाटील, अजित पाटील, सुदर्शन मव्दाण्णा, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल मगदूम यांच्यासह सभासद उपस्थित होते. सुत्रसंचलन संजय सासणे यांनी तर संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. अशोक सकळे यांनी आभार मानले.

 

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज