kavatemankhal news : घाटनांद्रेतील 16 द्राक्ष शेतकर्यांना 50 लाखाचा गंडा दलालांचा पोबारा : परभणी,दिल्ली सह तीन द्राक्ष व्यापार्यांनी कवठेमहांकाळ तालुक्यातील घाटनांद्रे येथील एका 16 द्राक्ष उत्पादक शेतकर्यांना सुमारे 50 लाख रूपयांचा गंडा घातला आहे. द्राक्ष खरेदी केल्यानंतर या द्राक्ष दलालांनी आठ दहा दिवसापासून पोबारा केला आहे.अखेर न्याय मिळण्यासाठी द्राक्ष उत्पादक शेतकरी वर्गाने कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे. पोलीस ठाण्यात तीन द्राक्ष दलाला विरुध्द शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
kavatemankhal news : घाटनांद्रेतील 16 द्राक्ष शेतकर्यांना 50 लाखाचा गंडा दलालांचा पोबारा
महादेव बाळासाहेब गडदे रा.नर्सपूर,सेलू बोकीर्णी,परभणी,हरिशकुमार बिंदेश्वर शहा,भरोजा व्हिलेज,आजादपूर,उत्तर पश्चिम दिल्ली व मोहित कुमार या तीन द्राक्ष व्यापार्यांनी घाटनांद्रे येथील तब्बल सोळा द्राक्ष उत्पादक शेतकर्यांकडून दि.1 फेब्रुवारी ते दि.20 फेब्रुवारी 2025 या कालावधीत घाटनांद्रे येथे परिसरात द्राक्ष खरेदी केली आहेत.
खरेदी करतेवेळी या तीन दलालांनी रोख पैसे न देता प्रत्येकास वेगवेगळे धनादेश दिले होते.
या चेकवर विस्वास ठेवून शेतकर्यांनी या दलालांना द्राक्षे दिली होती. त्यानंतर या द्राक्ष उत्पादक शेतकर्यांनी चेक बँकेत खात्यावर जमा केले. परंतु सर्व शेतकर्यांचे आरोपी दलालांच्या खात्यावर पैसे नसल्याने बाऊन्स झाले. या तीन व्यापार्यां कडून फसवणूक झाली असल्याचे लक्षात येताच या तीन व्यापार्यांची शोधाशोध केली व त्यांच्या फोनवर संपर्क साधला.परंतु दलालांनी उडवा उडवीची उत्तरे दिली. तसेच काही फोन नंबर चुकीचे असल्याचे उघडकीस आले.
घाटनांद्रे येथील द्राक्ष उत्पादक शेतकरी संदीप बाळासाहेब शिंदे ( वय 36) यांनी कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात शनिवारी फिर्याद दिली आहे.घाटनांद्रे येथील तब्बल 16 शेतकर्यांची या तीन आरोपी दलालांनी संगणमताने एकूण 49 लाख 79 हजार 68 रूपयांची केली असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
कवठेमहांकाळ तालुक्यातील घाटनांद्रे येथील द्राक्ष उत्पादक शेतकर्यांची पुढील प्रमाणे आर्थिक फसवणूक झाली आहे.
संदीप बाळासाहेब शिंदे- 2 लाख 41 हजार 118 रूपये, बाळासाहेब बहिर्जी पाटील- 4 लाख 45 हजार 500, हर्षल अरुण शिंदे- 2 लाख 80 हजार रूपये,नेताजी भिमराव झांबरे- 2 लाख 12 हजार 793 रूपये,उत्तम वसंत शिंदे- 2लाख 62 हजार 237 रूपये,पवन बबन शिंदे- 41 हजार,स्वेजीत पंडीत शिंदे- 4 लाख 22 हजार 383 रुपये,विठ्ठल रामचंद्र शिंदे 2 लाख 49 हजार 180 रूपये,विजय रंगराव साळुंखे 1 लाख 26 हजार 420रूपये,रामचंद्र सदाशिव साळुंखे 2 लाख 10 हजार 210 रूपये,संजय रावसाहेब शिंदे 7 लाख 38 हजार 431 रुपये,मानसिंग वसंत झांबरे 3 लाख 78 हजार 300 रुपये,प्रविण जयसिंग शिंदे 1 ,लाख 92 हजार 708रूपये,प्रमोद जयसिंग शिंदे 50 हजार 562 रुपये, शिवाजी तुकाराम शिंदे 10 लाख 11 हजार 630 व विष्णू एकनाथ जाधव- 1 लाख 16 हजार 486 अशी फसवणूक करण्यात आली आहे.
कवठेमहांकाळचे पोलिस निरीक्षक जोतिराम पाटील या आर्थिक फसवणूकीचे गांभीर्य लक्षात घेवून द्राक्ष उत्पादक शेतकरी वर्गाला न्याय मिळवून देण्याची भुमिका घेतली आहे. घाटनांद्रे येथील फसवणूक झालेल्या शेतकरी वर्गाला न्याय मिळवून देण्यासाठी कठोर पावले उचलण्याची भुमिका घेतली आहे. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक दत्ताञय कोळेकर करीत आहेत.

Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.



