rajkiyalive

KAVLAPUR MURDAR NEWS : कवलापुरात जमावाच्या मारहाणीत हल्लेखोराचा मृत्यू : नऊ जणांना पोलिसांनी केली अटक

सांगली :

KAVLAPUR MURDAR NEWS : कवलापुरात जमावाच्या मारहाणीत हल्लेखोराचा मृत्यू : नऊ जणांना पोलिसांनी केली अटक : मिरज तालुक्यातील कवलापूर येथील तंटामुक्ती अध्यक्ष भानुदास किसनराव पाटील (वय 42) यांच्यावर कोयत्याने हल्ला करण्यात आल्याची घटना सोमवारी रात्रीच्या सुमारास घडली होती. यानंतर संतप्त जमावाने हल्लेखोर अल्पवयीन युवकास लाथाबुक्कयांनी बेदम मारहाण केली. पोलिसांना ही माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी जावून गंभीर जखमी झालेल्या युवकास तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल केले. दरम्यान उपचार सुरु असताना त्याचा मंगळवारी सकाळी मृत्यू झाला.

KAVLAPUR MURDAR NEWS : कवलापुरात जमावाच्या मारहाणीत हल्लेखोराचा मृत्यू : नऊ जणांना पोलिसांनी केली अटक

संकेत उर्फ शुभम चनाप्पा नरळे (वय 17, रा. हनुमान मंदिर, कारखाना परिसर, संजयनगर, सांगली) असे युवकाचे नाव आहे. सांगली ग्रामीण पोलीस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या विभागातील पोलिसांनी संकेत यास मारहाण करणार्‍यांपैकी 9 जणांना मंगळवारी सकाळी ताब्यात घेतले असून त्यांच्यावर खूनाचा गुन्हा दाखल केला आहे.

संकेत यास मारहाण करणारे अद्यापी पाच ते सहा जण पसार आहेत.

हा प्रकार पूर्ववैमनस्यातून झाला असल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे. ताब्यात घेण्यात आलेल्यांमध्ये कवलापूरातील महेश मोहन पाटील, गजानन तावदारकर, सचिन उर्फ पांडुरंग अरुण पाटील, पप्या मोनाप्पा पाटील, दिपक माळी, वैभव तोडकर, संतोष उर्फ बंडा नाईक, विवेक उर्फ गोट्या पाटील आणि विशाल विलास पाटील यांचा समावेश आहे. दरम्यान कोयत्याच्या हल्लयात जखमी झालेल्या भानुदास पाटील यांची प्रकृती स्थिर असल्याचे वैद्यकीय अधिकार्‍यांनी सांगितले.

याबाबत अधिक माहिती अशी की, कवलापूरातील तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष भानुदास पाटील हे सोमवारी रात्री 8 च्या सुमारास गावातील सिद्धेश्वर मंदिराजवळ उभे होते. त्यावेळी त्यांच्यावर तिघांनी कोयत्याने हल्ला केला होता. अचानक घडलेल्या या प्रकाराने पाटील रस्त्यावर कोसळले. तसेच हल्लयात ते गंभीर जखमी झाले. हल्लयाची घटना कळताच काही मिनीटातच परिसरात जमाव जमा झाला.

त्यामुळे हल्लेखोरांपैकी तिघांनी घटनास्थळावरुन पलायनाचा प्रयत्न केला.

अन्य दोघे पसार झाले तर संकेत नरळे हा जमावाच्या तावडीत सापडला. त्याला संतप्त जमावाने लाथाबुक्यांनी बेदम मारहाण केली. यामध्ये तो गंभीर जखमी झाला. त्यानंतर जमावाने त्यास भानुदास पाटील यांच्या तुकाई मळा येथील शेतात घेवून जावून तेथेही मारहाण केली आणि त्यास तेथेच सोडून ते पसार झाले. याबाबतची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी तातडीने कवलापूरात धाव घेतली.

तोपर्यत चौकात उपस्थित ग्रामस्थांनी जखमी झालेल्या भानुदास पाटील यांना सांगलीतील खाजगी रुग्णालयात दाखल केले होते. दरम्यान, पोलिसांनी जमावाने मारहाण केलेल्या संकेतचा शोध घेतला असता तो तुकाई मळा येथे जखमी अवस्थेत पडल्याचे निदर्शनास आले. त्यांनी त्यास तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल केले. मंगळवारी सकाळच्या सुमारास उपचार सुरु असताना संकेत नरळे याचा मृत्यू झाला.

सोमवारी रात्रीपासून कोणताही अनुचित प्रकार होवू नये याकरिता कवलापूरात पुरेसा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पोलिसांनी तपासाची चक्रे गतीने फिरवून मंगळवारी सकाळी संकेतवर हल्ला करणार्‍या 9 संशयितांना जेरबंद केले. या प्रकरणाचा तपास पोलीस निरिक्षक राजेश रामाघरे आणि सहा. पोलीस निरिक्षक प्रियांका बाबर करीत आहेत. मंगळवारी तंटामुक्ती अध्यक्षावर झालेल्या खूनी हल्ल्याच्या निषेधार्थ कवलापूरात बंद पाळण्यात आला होता.

मयतासह दोघांवर 307 अन्वये गुन्हा दाखल

तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष भानुदास पाटील यांच्यावर कोयत्याने हल्ला करणार्‍यांपैकी तिघांपैकी दोघे अल्पवयीन आहेत. मयत संकेत हा कोकणात गणपतीच्या मूर्ती तयार करण्याचे काम करीत होता. त्याचा पाटील यांच्यावर जुना राग होता. हल्ला करणार्‍यांमध्ये दुसरा संशयित अल्पवयीनच आहे. तर तिसरा संशयित जोतीराम शिवाजी माने (वय 22, रा. कवलापूर, ता. मिरज ) हा आहे. हल्लयात संकेत हा मयत झाला तर अन्य दोघे पाटील यांच्यावर हल्ला केल्यापासून पसार आहेत. खूनी हल्ला केल्याप्रकरणी तिघांवर कलम 307 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शाळेतून काढल्याचा राग…

मयत संकेत नरळे हा दोन वर्षापूर्वी कवलापूरातच राहण्यास होता. तो ज्या शाळेत शिकावयास होता तेथे त्याची इतर विद्यार्थ्यांसमवेत नेहमी भांडणे व्हायची. त्यामुळे तेथील मुख्याध्यापिका यांनी तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष भानुदास पाटील यांच्या सांगण्याने त्यास शाळेतून काढून टाकले होते. याचा राग संकेत याच्या मनात होता. त्यामुळे त्याने पाटील यांच्यावर सोमवारी रात्री कोयत्याने हल्ला केला आणि जमावाने केलेल्या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज