rajkiyalive

KAVTEMANKHAL CRIME NEWS : कवठे महांकाळमधील वादात मोठा ट्वीस्ट, माजी नगराध्यक्षाने संजकाकांविरोधातील तक्रार मागे घेतली

सांगली :

KAVTEMANKHAL CRIME NEWS : कवठे महांकाळमधील वादात मोठा ट्वीस्ट, माजी नगराध्यक्षाने संजकाकांविरोधातील तक्रार मागे घेतली : सांगलीतील कवठे महांकाळमध्ये माजी खासदार संजयकाका पाटील आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यामध्ये झालेल्या वादात मोठा ट्विस्ट पाहायला मिळतोय. राष्ट्रवादीचे माजी उपनगराध्यक्ष अय्याज मुल्ला यांनी एकप्रतिज्ञापत्र लिहून माजी खासदार संजयकाका पाटील यांच्या विरोधातील तक्रार मागे घेतली आहे. प्रतिज्ञापत्रात अय्याज मुल्ला यांनी गैरसमजुतेतून आणि गोंधळलेल्या परिस्थितीत आपण संजयकाका विरोधात तक्रार दिल्याचे म्हटले आहे.

KAVTEMANKHAL CRIME NEWS : कवठे महांकाळमधील वादात मोठा ट्वीस्ट, माजी नगराध्यक्षाने संजकाकांविरोधातील तक्रार मागे घेतली

रोहित पाटील मात्र या प्रकरणात नौटंकी करत केविलवाणा प्रयत्न करून सहानभूती मिळवण्याचा प्रयत्न करत होते. मात्र त्याचा हा डाव उघडा पडला असल्याचे अय्याज मुल्ली यांनी म्हटलं आहे. माजी खासदार संजयकाका पाटील यांचे स्वीय सहायक खंडू होवाळ यांनी देखील प्रतिज्ञापत्रातून तक्रार मागे घेतली आहे.

संजयकाका पाटलांचा रोहित पाटलांवर हल्लाबोल

कवठे महांकाळ येथे झालेल्या घटनेचा तपशील स्वत: अय्याज मुल्ला यांनी सांगितलेला आहे. आज त्यांनी केस मागे घेतली आहे. त्यांनी अ‍ॅफिडेविटमध्ये म्हटलं आहे की, संजकाकांचा कोणताही संबंध नाही. माझा गैरसमज झाला होता. तेव्हा रोहित पाटील राजकारणात नौटंकी करत आहेत. रोहित पाटील सहानूभुती मिळवण्याचा प्रयत्न करत होते. आता ते तोंडावर पडले आहेत. आज मोर्चासाठी गावागावात निरोप दिले होते. अतिशय थोडक्या माणसांमध्ये त्याला तो कार्यक्रम करावा लागला होता. मी बाहेरगावी आलेलो आहे, दोन दिवसांमध्ये मी त्यांना उत्तर देणार आहे. त्या सर्व गोष्टींचा मी खरपूस समाचार घेणार आहे. तासगाव-कवठे महांकाळमधील लोकांनी यांची नौटंकी ओळखलेली आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

माजी नगराध्यक्ष अय्याज मुल्ला यांनी माजी खासदार संजयकाका पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले होते. संजयकाका पाटील आणि त्यांच्या समर्थकांनी माझ्या घरात घूसून महिलांना आणि माझ्या आईला मारहाण केली, असा आरोप मुल्ला यांनी केला होता. मुल्ला यांनी फिर्याद दाखल केल्यानंतर संजयकाका पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर दुसरीकडे संजयकाका पाटील यांचे स्वीय सहाय्यक खंडू होवाळ यांनी अय्याज मुल्ला यांच्याविरोधात जातीवाचक शिवीगाळ व मारहाण केल्याप्रकरणी अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला होता. मात्र, आता दोन्ही बाजूंनी तक्रारी मागे घेतल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे सर्वांच्या भूवया उंचावल्या आहेत, तर दुसरीकडे संजयकाका पाटील दोन दिवसांनी निषेध सभा घेणार आहेत.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज