rajkiyalive

kavtepiran crime news : कवठेपिरान मधील जुगार अड्डा पोलिसांनी केला उध्वस्त

kavtepiran crime news : कवठेपिरान मधील जुगार अड्डा पोलिसांनी केला उध्वस्त : मिरज तालुक्यातील कवठेपिरान गावाजवळील दुधगाव रोडवर एका घरामध्ये सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिस उपअधिक्षक प्रनिल गिल्डा आणि सांगली ग्रामीण पोलिसांच्या संयुक्त पथकाने रविवारी सायंकाळी छापा टाकत उध्वस्त केला. यावेळी जुगार खेळणार्या 17 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 30 मोटारसायकली, कार, कोयता, तलवार आणि जुगाराचे साहित्य असा 19 लाख 22 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईमुळे कवठेपिरान परिसरात खळबळ उडाली आहे.

kavtepiran crime news : कवठेपिरान मधील जुगार अड्डा पोलिसांनी केला उध्वस्त

17 जणांवर कारवाई करत 19 लाखांचा मुद्देमाल जप्त : राजकीय पदाधिकार्‍यांशी संबंधित होता अड्डा?

चार दिवसांपूर्वी मिरजेतील म्हैसाळ रस्त्यावर पोलिस अधिक्षक संदीप घुगे यांच्या आदेशाने विशेष पथकाने जुगार अड्ड्यावर छापा टाकून 61 जणांना ताब्यात घेतले होते. आता कवठेपिरान येथे पोलिसांनी छापा टाकून जुगार अड्डा उद्धवस्त केला. कवठेपिरान-दुधगाव रस्त्यावर हा जुगार अड्डा सुरू होता. याची माहिती पोलिसांनी मिळाली होती. पोलिस उपअधिक्षक प्रनिल गिल्डा, सांगली ग्रामीणचे निरीक्षक किरण चौगले यांच्या नेतृत्वाखालील संयुक्त पथकाने सायंकाळी जुगार अड्ड्यावर छापा टाकला.

यावेळी जुगार खेळणार्‍या 17 जणांना ताब्यात घेतले.

आशिष संजय किरपाळे, रोहित नारायण पाटील, प्रकाश भाऊसाहेब पाटील, अनिकेत अरुण चौगुले, प्रशांत बाळासाहेब पवार (सर्व रा. कवठेपिरान), अनिल आदिनाथ पाटील, आलम रहमान मुजावर (दोघे रा. कुंभोज), अभयकुमार महावीर कोले, गणेश महादेव पाटील (दोघे रा. दुधगाव), सुनील रघुनाथ चव्हाण, सुरज सिकंदर तांबोळी (दोघे रा. कसबे डिग्रज), उस्मान कुतुबुद्दीन मगदूम (रा. सांगली), सुरेश शामराव खोचेकर (रा. खोची), अमोल संपत राजमाने, बिरदेव रामचंद्र बंडगर (दोघे रा. हातकणंगले), शुभम राजेश पाटील, तुषार जालिंद गावडे (दोघे रा. वाळवा) अशी ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे आहेत.

पोलिसांनी जुगार अड्ड्यावरून 30 मोटारसायकली, एक कार, जुगारातील रोख रक्कम 85 हजार 100 रुपये, 16 मोबाईल, जुगाराच्या पत्त्याचे बॉक्स, टेबल खुर्च्या, कोयता, तलवार असा 19 लाख 22 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. जुगार खेळणार्‍या 17 जणांना रात्री सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात आणण्यात आले.

kavtepiran-crime-news-police-dismantled-gambling-den-in-kavtepiran

त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरा सुरू होते. या कारवाईत संजयनगर पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक किरण स्वामी, हेड कॉन्टेबल गजानन जाधव, सुरेश पवार, दत्तात्रय फडतरे, अक्षय जाधव, प्रशांत सूर्यवंशी, सांगली ग्रामीणचे उपनिरीक्षक तांबोळी, सहाय्यक फौजदार मेघराज रुपनर, संभाजी पवार, रणजित घारगे, बंडू पवार, अभिजित पाटील, हिम्मत शेख यांनी भाग घेतला.

राजकीय पदाधिकार्‍याशी संबंधित अड्डा?
कवठेपिरान येथील जुगार अड्डा एका राजकीय पक्षाच्या पदाधिकार्‍याशी संबंधित असल्याची चर्चा होती. जुगार अड्ड्यावर छापा टाकून 17 जणांना ताब्यात घेतल्याचे समजताच संबंधित पदाधिकारी ग्रामीण पोलिस ठाण्याबाहेर घुटमळत होता, असेही प्रत्यक्षदर्शनी सांगितले.
Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज