rajkiyalive

kavtepiran crime news : कवठेपिरान यात्रेत पोलिसांसमोरच तुफान राडा; गाडीवर दगडफेक

kavtepiran crime news : कवठेपिरान यात्रेत पोलिसांसमोरच तुफान राडा; गाडीवर दगडफेक: मिरज तालुक्यातील कवठेपिरान येथे यात्रेत झालेल्या वादातून दोन गटात राडा झाला. एका घरात टोळक्याने घुसून गाडीवर दगडफेक केली. ही सारी घटना सीसीटीव्हीत कैद झाली मध्यरात्री ही घटना घेतली. घटनास्थळी पोलिस हजर असल्याने मोठा अनर्थ टळला. दरम्यान, ग्रामीण पोलिसांनी स्वतः फिर्याद दाखल करत तेरा जणांवर गुन्हे नोंदवले आहे.

kavtepiran crime news : कवठेपिरान यात्रेत पोलिसांसमोरच तुफान राडा; गाडीवर दगडफेक

शुभम कृष्णात पाटील (27), मनोहर पिराजी यादव (47), जालींदर विठ्ठल दिंडे (44), जयराज राजाराम साळुंखे (29), रणजित रंगराव पाटील (30), प्रकाश बाबूराव दिंडे (34), किरण किसन पाटील (31), कपिल शिवाजी किर्ते (38), रोहित नारायण पाटील (35), पवनकुमार राजेंद्र साळुंखे (22), इस्माईल शब्बीर सय्यद (28), लिकायत शौकत पिंजारी (41), अरूण भिमराव साळुंखे (46, सर्व रा. कवठेपिरान) अशी त्या संशयितांची नावे असून त्यांना नोटीसा बाजवण्यात आली आहेत.

kavtepiran-crime-news-storm-rages-in-front-of-police-in-kavtepiran-yatra-stone-pelting-on-the-car

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, कवठेपिरानाचा यात्रेचा काल मुख्य दिवस होता. त्यानिमित्ताने ऑक्रेस्ट्रा आणण्यात आला होता. त्याला यात्रा कमिटीचा विरोध होता. मात्र, एका गटाने परवानगी घेत रात्री दहा वाजता हा ऑक्रेस्ट्रा बंद करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. साडेनऊच्या सुमारास ऑक्रेस्ट्राला सुरूवात झाली. त्यावेळी पोलिस निरीक्षक किरण चौगले व त्यांचे पथक गावात दाखल होतेच.

दहाच्या सुमारास पोलिसांनी हा ऑक्रेस्ट्रा बंद केला.

दहाच्या सुमारास पोलिसांनी हा ऑक्रेस्ट्रा बंद केला. त्यावेळी गावीतील जमाव संतप्त झाला. त्यांना ही तक्रार ज्याने दिले आहे, त्यांच्या घरावर चाल करण्यास सुरूवात केली. पावणे बाराच्या सुमारास संशयित दहा ते तेरा जणांचा जमाव गावातील एकाच्या घरासमोर आला. त्यावेळी पोलिस निरीक्षक चौगले व त्यांचे पथकही त्याठिकाणी होते. त्यावेळी पोलिसांनी जमावास पांगवण्यास सुरूवात केली. जमाव आक्रमक होताच पोलिसी खाक्या दाखवण्यात आला.

त्यावेळी जमावातील एकाने दगफेक करत गाडीची तोडफोड केली.

त्यानंतर काही काळ तणाव निर्माण झाला. पोलिसांनी परिस्थितीत नियंत्रणात आणली. मात्र, घटनास्थळाचे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले. त्यातील दिसलेल्या संशयितांवर गुन्हे नोंद करण्यात आले. सर्व संशयितांना पोलिस ठाण्यात आणत कारवाई करण्यात आली. रात्री उशीरा नोटी बजावण्यात आला. गावात कायदा, सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये, यासाठी बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दरम्यान, आज सकाळीही दुसर्‍या गटानेही गाडीची तोडफोड केल्याची घटना समोर आली आहे. याबाबत अद्याप नोंद करण्यात आली नाही. मात्र ते तक्रारही दाखल करण्यात येणार असल्याचे निरीक्षक चौगले यांनी दिली.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज