rajkiyalive

KHANAPUR : नागेवाडीचा पै. सुरजकुमार निकम याची आत्महत्या

जनप्रवास/प्रतिनिधी

KHANAPUR : नागेवाडीचा पै. सुरजकुमार निकम याची आत्महत्या : खानापूर तालुक्यातील नागनाथनगर नागेवाडी येथील नामवंत पैलवान सुरज निकम याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. आज दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून, या प्रकाराने कुस्ती क्षेत्रासह खानापूर तालुक्यात शोककळा पसरली आहे. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकलेले नाही.

KHANAPUR : नागेवाडीचा पै. सुरजकुमार निकम याची आत्महत्या

KHANAPUR : नागेवाडीचा पै. सुरजकुमार निकम याची आत्महत्या : पै. सुरजकुमार निकम हा नामवंत मल्ल आहे. त्याने यापूर्वी कुस्ती क्षेञातील अनेक किताब पटाकविले आहेत. विरोधी पैलवानाला कोणत्या डावावर चितपट करायचे यात त्याचा हातखंडा होता. त्याने अल्पावधीतच आपला कुस्ती क्षेत्रात दबदबा निर्माण करत कुमारकेसरी होण्याचा बहुमान मिळवलेला आहे. कुस्तीच्या आखाड्यात अनेक मल्लाना त्याने आस्मान दाखवले आहे. परंतू आज त्याने राहत्या घरी गळफास घेवून आपले जीवन संपविले.

त्याच्या वडिलांचे निधन झाल्यानंतर तो व्यथित होता. आज शुक्रवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास त्याने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याचे समोर आले. आत्महत्येचे वृत्त समजताच कुस्ती क्षेञासह सर्वञ हळहळ व्यक्त होत आहे. त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी विटा ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला आहे.

उद्या दुपारी त्याचे बंधू आल्यानंतर त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे समजते. माञ पै. सुरजकुमार याने आत्महत्या का केली ? याबाबत विटा पोलिस तपास करत असून त्याच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज