rajkiyalive

khanapur vidhansabha 2024 : महायुतीला धक्का, विट्यात वैभव पाटील घेणात हातात तुतारी

जनप्रवास / प्रताप मेटकरी
khanapur vidhansabha 2024 : महायुतीला धक्का, विट्यात वैभव पाटील घेणात हातात तुतारी : गेल्या वर्षभरात अडचणीच्या काळात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आपल्याला मोलाची साथ दिली आहे. परंतु महायुतीच्या जागा वाटपात खानापूर मतदारसंघ शिंदे गटाकडे जातोय. गेल्या 10 वर्षांतील भोंगळ कारभार रोखून सत्ताधार्‍यांची सत्तेची मस्ती उतरविण्यासाठी आणि मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी तसेच सर्वसामान्य कार्यकर्त्यांची झालेली होलपट थांबविण्यासाठी सध्याच्या राजकीय अपरिहार्य परिस्थितीत शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पक्ष आपल्यासोबत असणे अतिशय गरजेचे बनलेले आहे.

khanapur vidhansabha 2024 : महायुतीला धक्का, विट्यात वैभव पाटील घेणात हातात तुतारी

आगामी विधानसभा निवडणूकीला सामोरे जाताना आपल्यासोबत पक्षाची भक्कम ताकद आपल्यासोबत असली पाहिजे. त्यामुळेच आपण शरदचंद्र पवार राष्ट्रवादीत घरवापसीचा निर्णय घेऊन तुतारी हाती घेऊया. त्यामुळे लवकरच एकजुटीने निर्णय करूया, अशी महत्वपूर्ण घोषणा विटा येथे पाटील गटाच्या खानापूर विधानसभा मतदारसंघातील प्रमुख कार्यकर्त्यांच्या आयोजित बैठकीत झाली. या बैठकीस माजी आमदार अ‍ॅड. सदाशिवराव पाटील आणि जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. वैभव पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

या बैठकीत माजी आमदार अ‍ॅड. पाटील आणि अ‍ॅड. वैभव पाटील यांनी कार्यकर्त्यांची मने जाणून घेत संवाद साधत आपली पुढील भूमिका मांडली. यावेळी झालेल्या बैठकीत बोलताना माजी आमदार अ‍ॅड. सदाशिवराव पाटील म्हणाले, विधानसभा निवडणूकीला सामोरे जात असताना पूर्ण ताकदीनिशी जायचे आहे. जनतेच्या आशिर्वादाच्या बळावर विधानसभेचे मैदान जिंकायचे आहे. त्यासाठी अनेक राजकीय घडामोडी सुरू आहेत. लवकरच त्या सर्व घडामोडी स्पष्ट होतील.

यापुढच्या काळात योग्य दिशेने राजकारण करायचे आहे. आपल्या विचारांची अनेक मंडळी आपल्यासोबत आगामी काळात दिसतील. आपण विधानसभेच्या दोन निवडणूका जिंकल्या आहेत तर दोन निवडणूका पराभूत झालो आहे. त्यामुळे त्या पराभवातून अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या आहेत. त्या सर्व त्रुटी दूर करून यंदाच्या विधानसभेची निवडणूक जनतेच्या आशिर्वादाने जिंकून गुलाल आपणच घ्यायचा आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांनी गाफील न राहता आतापासूनच कामाला लागा, असे आवाहन केले.

यावेळी अ‍ॅड. वैभव पाटील यांनी कार्यकर्त्यांशी भावनिक होऊन संवाद साधत गेल्या आठवड्यात सांगलीत शरदचंद्र पवारसाहेबांची भेट घेतल्याची त्यांनतरकाल पुणे येथे सदाशिवरावभाऊ पाटील आणि मी खानापूर मतदारसंघातून उमेदवारीची मागणी करत मुलाखत दिल्याची माहिती दिली. तसेच महायुतीच्या जागा वाटपात खानापूर मतदारसंघ शिंदे गटाकडे जातोय.

गेल्या 10 वर्षांतील भोंगळ कारभार रोखून सत्ताधार्‍यांची सत्तेची मस्ती उतरविण्यासाठी आणि मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी तसेच सर्वसामान्य कार्यकर्त्यांची झालेली होलपट थांबविण्यासाठी आपणाला निवडणूकीत उतरावेचे लागणार आहे. त्यामुळे विधानसभेच्या निवडणूकीत एकास एक लढत व्हायची असेल विरोधात एकच उमेदवार पाहिजे. तसेच महाविकास आघाडीच्या जागा वाटपात ही खानापूर मतदारसंघाची जागा शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पक्षाच्या तुतारीला मिळू शकते. त्यामुळे यंदाची निवडणूक जिंकण्यासाठी ताकदीने उतरायचे आहे.

गेल्या 10 वर्षांतील सत्ताधार्‍यांचा भोंगळ कारभार रोखून त्यांची सत्तेची मस्ती उतरविण्यासाठी आणि मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी तसेच सर्वसामान्य कार्यकर्त्यांची झालेली होलपट थांबविण्यासाठी आपणाला निवडणूकीत उतरावेचे लागणार आहे. सध्याच्या राजकीय अपरिहार्य परिस्थितीत शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पक्ष आपल्यासोबत असणे अतिशय गरजेचे बनलेले आहे. आगामी विधानसभा निवडणूकीला सामोरे जाताना आपल्यासोबत महाविकास आघाडीतील पक्षाची भक्कम ताकद आपल्यासोबत असली पाहिजे. त्यामुळेच आपण शरदचंद्र पवार राष्ट्रवादीत घरवापसीचा निर्णय घेऊन तुतारी हाती घेऊया. पण उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यावर आपली कोणतीही नाराजी नाही. सध्याच्या राजकीय अपरिहार्य परिस्थितीमुळे तुतारीचा निर्णय घ्यावा लागत आहे. हे कार्यकर्त्यांनी समजून घेऊन आजपासून निवडणूकीच्या तयारीला लागावे.

– अ‍ॅड. वैभव पाटील
Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज