rajkiyalive

khanapur vidhansabha 2034 : पुन्हा मशाल विरूध्द विशाल

जनप्रवास । सांगली

khanapur vidhansabha 2034 : पुन्हा मशाल विरूध्द विशाल : लोकसभा निवडणुकीत उमेदवारीसाठी अनेक हेलपाटे मारूनही उबाठामुळे उमेदवारी मिळू शकली नाही. त्यामुळे लोकसभेचे उट्टे काढण्याचा इरादा विशाल पाटील यांनी नुकताच बोलून दाखविला. येणार्‍या विधानसभा निवडणुकीत खानापूर-आटपाडी मतदार संघात सुहासभैय्या बाबर यांना कोणत्याही परिस्थितीत लाखाच्यावर मते मिळाली पाहिजेत आणि ते निवडून आले पाहिजेत, त्यासाठी कामाला लागा असे आवाहन खासदार विशाल पाटील यांनी केल्याने सर्वांच्या भूवया उंचावल्या आहेत. एकंदरीत महाविकास आघाडी आणि उध्दव ठाकरेंच्या विरोधातच त्यांची भूमिका असून, पुन्हा एकदा विशाल विरूध्द मशाल अशीच लढत रंगण्याची चिन्हे दिसत आहेत.

khanapur vidhansabha 2034 : पुन्हा मशाल विरूध्द विशाल

अपक्ष राहून खासदार झालेल्या विशाल पाटलांना सुहास बाबर यांनी उघडपणे पाठिंबा दिला होता. त्या उपकाराची परतफेड की जयंत पाटील आणि उद्ध्दव ठाकरे यांना दे धक्का अशी चर्चा सुरू झाली आहे. लोकसभा निवडणुकीत सांगलीच्या जागेवरून काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्यात प्रचंड टोकाचा वाद झाला होता. ठाकरेंनी हट्टाने सांगलीची जागा काँग्रेसकडून आपल्याकडे घेतली आणि त्याठिकाणी चंद्रहार पाटील यांना उमेदवारी दिली.

मात्र ठाकरेंच्या उमेदवाराविरोधात काँग्रेस नेते विशाल पाटील यांनी बंडखोरी करत अपक्ष निवडणुकीला सामोरे गेले. या निवडणुकीत विशाल पाटलांनी दणदणीत विजय मिळवला. आता याच विजयात हातभार लावणार्‍यांना विशाल पाटील मदत करणार आहेत. त्यात खानापूर मतदारसंघात सुहार बाबर यांच्या पाठिशी असल्याचं खासदार विशाल पाटील यांनी जाहीर केले आहे.

खासदार विशाल पाटील म्हणाले की, मतांच्या स्वरुपात लाखांच्या आकड्यात सुहास बाबर यांना पाठिंबा मिळावा. आम्ही अपक्ष आहोत, कुणाला घाबरत नाही. आम्हाला कुणी बोलायचे कारण नाही. जिथं आमच्यावर प्रेम दिसतंय तिथे आम्हाला प्रेम द्यायचे कळतंय. त्यामुळे आम्ही ताकदीनं तुमच्या पाठिशी राहणार यात शंका नाही असं त्यांनी जाहीर भूमिका मांडली

त्यामुळे लोकसभेनंतर आता विधानसभेलाही विशाल पाटलांनी ठाकरे गटाशी भिडण्याचं ठरवलं आहे. तर सगळ्यांमध्ये ताळमेळ असणं गरजेचा आहे. महाविकास आघाडीचे जे घटक आहेत आम्हाला भाजपाप्रणित महाराष्ट्रद्वेष्टे सरकार आहे ते घालवण्याचं काम आपल्याला करायचं आहे असं सांगत आदित्य ठाकरेंनी विशाल पाटलांच्या भूमिकेवर प्रतिक्रिया दिली आहे

सुहास बाबर महायुतीचे संभाव्य उमेदवारखानापूर आटपाडी मतदारसंघात मागील निवडणुकीत शिवसेनेकडून अनिल बाबर निवडून आले होते. अनिल बाबर यांच्या रुपाने शिवसेनेने पश्चिम महाराष्ट्रातील या जागेवर भगवा झेंडा फडकवला. मात्र एकनाथ शिंदेंनी घेतलेल्या भूमिकेनंतर अनिल बाबर हे शिंदेसोबत गेले होते.

त्यात महाविकास आघाडीत ही जागा उद्धव ठाकरेंच्या वाट्याला जाण्याची शक्यता आहे. त्यात खासदार विशाल पाटलांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे गटाला दणका दिला आहे. विशाल पाटलांच्या या वक्तव्याने महाविकास आघाडीमध्ये चुळबूळ सुरू झाली आहे. विशाल पाटील यांनी अपक्ष म्हणून जरी खासदार झाले असले तरी त्यांनी काँग्रेसला पाठिंबा दिला होता. आता महायुतीचे संभाव्य उमेदवार सुहास बाबर यांना पाठिंबा देवून त्यांनी खळबळ उडवून दिली आहे. त्यांच्या या वक्तव्याने महाविकास आघाडीची धुरा सांभाळणारे जयंत पाटील यांनाही धक्का बसल्याचे मानले जात आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज