rajkiyalive

khanapur vidhansabha : खानापूर मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडीतील इच्छुकांमध्ये रस्सीखेच

प्रताप मेटकरी : जनप्रवास, विटा

khanapur vidhansabha : खानापूर मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडीतील इच्छुकांमध्ये रस्सीखेच : संपूर्ण सांगली जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या खानापूर विधानसभा मतदारसंघातील राजकारण आता रंजक वळणावर आले आहे. लोकसभेनंतर आता विधानसभा निवडणुकीची रंगतदार तालीम ही खानापूर विधानसभा मतदारसंघात आतापासूनच रंगू लागली आहे. निवडणूक लढविण्यास इच्छुक असणार्‍या महायुतीच्याच नेत्यांनी आमदारकीचा शड्डू ठोकत एकमेकांविरोधातच दंड थोपटले आहेत.

khanapur vidhansabha : खानापूर मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडीतील इच्छुकांमध्ये रस्सीखेच

khanapur vidhansabha : खानापूर मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडीतील इच्छुकांमध्ये रस्सीखेच :महाविकास आघाडीच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संजय विभूते आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे जिल्हा कार्याध्यक्ष अ‍ॅड. बाबासाहेब मुळीक यांनी मतदारसंघावर आपापल्या पक्षाचा दावा केला आहे. तर काँग्रेसचे नेते वेट अ‍ॅण्ड वॉचच्या भूमिकेत गेले आहेत. त्यामुळे आगामी खानापूर विधानसभा मतदारसंघातील निवडणूक रंगतदार होण्याची संकेत मिळत आहेत.

लोकसभेच्या निवडणूकीनंतर महाविकास आघाडीला टक्कर देण्यासाठी भाजप महाराष्ट्रात व्युहरचना आखत आहे.

महायुतीमध्ये भाजप, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादीचा अजित पवार गट व अन्य पक्ष आहेत. त्यांनी आता विधानसभा निवडणूकीवर लक्ष केंद्रीत केले आहे. खानापूर मतदारसंघात गेल्या दहा वर्षापासून शिवसेनेचे आमदार अनिलभाऊ बाबर हे लोकप्रतिनिधीत्व करत होते. परंतु काही महिन्यापूर्वीच त्यांचे निधन झाले आणि याची जबाबदारी त्यांचे सुपुत्र सुहास बाबर यांच्यावर येऊन ठेपली आहे. गेल्या अनेक महिन्यापासून ते देखील कामाला लागले असून त्यांनी आमदारकीच्या दृष्टीने मतदारसंघात साखरपेरणी सुरू केली आहे

दुसरीकडे दोन टर्म आमदार राहिलेले सदाशिवराव पाटील यांनी देखील त्यांचे सुपुत्र वैभव पाटील यांच्या हातात नेतृत्वाची धुरा दिली आहे.

यंदाची विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी वैभव पाटील हेदेखील इच्छुक आहेत. त्यांनी देखील निवडणूक लढविण्याची तयारी केली आहे. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून त्यांनी खानापूर मतदारसंघासह जिल्ह्यात रान तापवलेले आहे. राष्ट्रवादीच्या अजितदादा गटाची मजबूत बांधणीही केली आहे. त्यांनी उपमुख्यमंत्री अजितदादांच्या माध्यमातून मतदारसंघात अनेक विकासकामे आणून उमेदवारीवर दावा केला आहे.
आटपाडीचे नेते माजी आमदार

राजेंद्रआण्णा देशमुख आणि त्यांचे बंधू माजी जि.प. अध्यक्ष अमरसिंह देशमुख यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही.

राज्यपातळीवर भाजप आणि शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजितदादा गटाची युती असल्यामुळे आटपाडीच्या देशमुख घराण्याची आणि त्यांच्या गटाची विधानसभेला भूमिका काय राहणार ? याकडेच नजरा लागल्या आहेत.
आता नव्याने तिसरे नाव जोमाने चर्चेत आलेले आहे ते म्हणजे भाजपचे

ब्रह्मानंद पडळकर हेही या मतदारसंघातून इच्छुक आहेत.

विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांचे बंधू माजी समाजकल्याण सभापती ब्रह्मानंद पडळकर यांचे. ब्रह्मानंद पडळकर हेही या मतदारसंघातून इच्छुक आहेत. आमदार गोपीचंद पडळकर हे जतमधून चाचपणी करत असले तरी त्यांनी खानापूर विधानसभा मतदारसंघावर नजर ठेवली आहे. ब्रह्मानंद पडळकर यांनी खानापूर, आटपाडी व विसापूर सर्कलमध्ये आपला जनसंपर्क वाढवला असून त्यांनीदेखील आमदारकी लढवण्याच्या दृष्टीने सुरुवात केली आहे. माञ शेवटच्या क्षणीच या दोघा बंधूमधील कोण खानापूर विधानसभा मतदारसंघाच्या आखाड्यात उतरणार ? हे समजणार आहे.

सुहास बाबर, वैभव पाटील व ब्रह्मानंद पडळकर हेच नेते प्रबळ इच्छुक आहेत.

एकंदरीत खानापूर विधानसभा मतदारसंघात महायुतीमधील सुहास बाबर, वैभव पाटील व ब्रह्मानंद पडळकर हेच नेते प्रबळ इच्छुक आहेत. त्यामुळे महायुतीमध्येच आमदारकीवरुन या मतदारसंघात रस्सीखेच सुरू झाल्याचे चित्र सध्यातरी आहे. येणार्‍या काळात महायुती अशीच कायम राहिल्यास ते कोणत्या नेत्याला पसंती देणार? हा मात्र मोठा प्रश्न महायुतीसमोर असणार आहे. तिन्हीही नेत्यांनी आमदारकीची निवडणूक लढविण्याचे फायनल सांगितले असले तरी शेवटी ते काय निर्णय घेतात ? हे मात्र येणारा काळच दाखवणार आहे.

दरम्यान महायुतीमधील नेत्यांमध्ये रस्सीखेच सुरू असतानाच महाविकास आघाडीमधील घटक पक्ष असणार्‍या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संजय विभूते यांनी पत्रकार परिषद घेऊन विधानसभा निवडणूक लढविण्यास इच्छुक असल्याचे सांगत खानापूर विधानसभा मतदारसंघाची ही जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे लढविणार आहे. आमच्या पक्षाचा आमदार व्हावा, ही माझ्या पक्षाची एक जागा सांगली जिल्ह्यात वाढावी या उद्देशाने मी पक्षाच्या विचारधारेचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे. त्यामुळे मी थांबायला तयार आहे. वैभवदादांना आमदार व्हायचं असेल तर त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात यावे, अशी जाहीर खुली ऑफर देत राजकीय गुगली टाकली आहे.

लोकसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेले खासदार विशाल पाटील यांनी काँग्रेसला पाठिंबा दिला आहे.

लोकसभा निवडणुकीत खानापूर विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांना 92459 तर महायुतीचे भाजपा उमेदवार संजयकाका पाटील यांना 75795 तर महाविकास आघाडीचे चंद्रहार पाटील यांना 16956 मते मिळाली आहेत. लोकसभेला खानापूर विधानसभा मतदारसंघात झालेल्या मतदानाचा विचार करता महाविकास आघाडी अधिक अपक्ष उमेदवाराच्या मतांची बेरीज साधारण 1 लाख 12 हजार होत आहे. तर महायुतीचे उमेदवार संजयकाका पाटील यांची 75 हजार मते मिळाली आहेत म्हणजेच महाविकास आघाडीला 35 हजार मते जादा मिळालेली आहेत.

त्यामुळे मतदारसंघात महाविकास आघाडीची ताकद वाढलेली आहे.

मात्र लोकसभा निवडणुकीची आणि विधानसभा निवडणुकीची राजकीय समीकरणे वेगवेगळी असतात. खानापूर तालुक्यातील काँग्रेसने गत विधानसभा निवडणूकीत शिवसेनेचे आमदार अनिलभाऊ बाबर यांना थेट काँग्रेस कमिटीत जाहीर पाठिंबा देत खानापूर तालुक्यातील काँग्रेस आमदार बाबर यांच्या दावणीला बांधली आहे. त्यामुळे मतदारसंघातील काँग्रेस मरगळलेल्या अवस्थेत आहे. आधे इधर आधे उधर अशी बिकट अवस्था तालुक्यातील काँग्रेसची आहे.

खानापूर मतदारसंघात निर्णायक व्होट बँक कदम गटाची आहे.

मात्र काँग्रेसचे नेते आमदार डॉ. विश्वजित कदम हे म्हणावे असे लक्ष या मतदारसंघात देत नाहीत. कदम आणि बाबर गटाची छुपी युती असल्याची चर्चा राजकीय पटलावर आहे. गेल्या अनेक दिवसांपासून विधानसभेसाठी काँग्रेसकडून युवा नेते डॉ. जितेश कदम यांचे नाव चर्चेत आहे. मात्र याबाबत कोणतीच राजकीय हालचाल दिसत नाही. दरम्यान कदम गटाचे खंदे समर्थक माजी नगरसेवक अँड. सुमित गायकवाड यांनी खानापूर विधानसभेची जागा काँग्रेस लढविणारच अशी सूचक पोस्ट फेसबुकवर टाकून भूमिका व्यक्त केली असली तरी काँग्रेसचे मतदारसंघातील नेते कोणती भूमिका घेणार ? याचीच उत्सुकता आहे.

तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष अ‍ॅड. बाबासाहेब मुळीक यांनी देखील नुकतीच पत्रकार परिषद घेत खानापूर विधानसभा मतदारसंघावर पूर्वीपासून यशवंतराव चव्हाण, शरद पवार यांच्या विचाराचा प्रभाव आहे. यापूर्वी समाजवादी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांचे अनेकवेळा विधानसभा सदस्य निवडून आलेले आहेत. खानापूर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे प्रभावी संघटन आहे. लोकसभेला या मतदारसंघात भाजप विरोधात महाविकास आघाडीला मोठे मताधिक्य मिळाल्याने हा मतदारसंघ राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला मिळावा, असा दावा केला आहे.

मात्र आदर्श सरपंच आणि राष्ट्रवादीचे खानापूर विधानसभा क्षेत्राध्यक्ष सुशांत देवकर हे देखील खानापूर विधानसभा मतदारसंघाची निवडणूक लढविण्यास राष्ट्रवादीकडून इच्छुक आहेत. तर मतदारसंघात धनगर समाजाचे मतदान हे निर्णायक असल्याने धनगर समाजाचे युवा नेते आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे खंदे समर्थक आणि राष्ट्रवादी युवकचे प्रदेश सरचिटणीस राजूशेठ जानकर हेही राष्ट्रवादीकडून विधानसभा निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. ते राष्ट्रवादीच्या वरिष्ठ आणि राज्य पातळीवरील नेत्यांशी सातत्याने संपर्कात आहेत.

राजूशेठ जानकर यांचे नाव राष्ट्रवादीकडून विधानसभा निवडणूक लढवू इच्छिणार्‍याच्या यादीत आल्याने राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. राजूशेठ जानकर यांनी गाठीभेटी घेत निवडणूक लढविण्याच्या दृष्टीने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. एकंदरीत लोकसभा निवडणुकीपाठोपाठ आता खानापूर विधानसभा मतदारसंघात विधानसभा निवडणुकीचे वारे जोरदार वाहू लागले असून महायुती आणि महाविकास आघाडीतील इच्छुक उमेदवारांनी मोर्चेबांधणी करून विधानसभेच्या साखरपेरणीला सुरुवात केली आहे.

त्यामुळे इच्छुक उमेदवारानी विविध कार्यक्रम आणि कार्यकर्त्यांच्या वाढदिवसानिमित्त गावोगावी भेटीगाठी घेऊन जनसंपर्क वाढविला आहे. त्यामुळे खानापूर विधानसभा मतदारसंघात विधानसभा निवडणुकीच्या तयारीला वेग आला आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज