rajkiyalive

KHANAPUR VIDHANSABHA : विनिंग मेरीटच्या निकषावर शिवसेना शिंदे गटाच्या पहिल्या दहा जागांमध्ये माझे नाव: सुहास बाबर

जनप्रवास/विटा

KHANAPUR VIDHANSABHA : विनिंग मेरीटच्या निकषावर शिवसेना शिंदे गटाच्या पहिल्या दहा जागांमध्ये माझे नाव: सुहास बाबर : आगामी विधानसभा निवडणुकीत विनिंग मेरीटच्या निकषावर शिवसेना शिंदे गटाच्या पहिल्या दहा जागांमध्ये माझे नाव आहे, असा दावा करत मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून रस्ते कामांसाठी ६० कोटींचा निधी मिळाल्याचे सांगत खानापूर मतदारसंघासाठी गेल्या चार महिन्यात तब्बल एक हजार कोटी रुपयांचा निधी आणल्याचा दावाही माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुहास बाबर यांनी पत्रकार परिषदेत केला.

KHANAPUR VIDHANSABHA : विनिंग मेरीटच्या निकषावर शिवसेना शिंदे गटाच्या पहिल्या दहा जागांमध्ये माझे नाव: सुहास बाबर

यावेळी बोलताना सुहास बाबर म्हणाले, स्वर्गीय आमदार अनिलभाऊ बाबर यांच्या निधनानंतर गेल्या पाच महिन्यामध्ये विकासकामांचा वेग तोच राहिला पाहिजे, या दृष्टीने आपण प्रयत्न करतोय. गेल्या चार-पाच महिन्यामध्ये भाऊंच्यानंतरही महायुती सरकारने आपल्या मतदारसंघावर विविध कामांसाठी मोठ्या प्रमाणावर निधी देऊन प्रेम व्यक्त केले आहे. अर्थात भाऊंच्या अपूर्ण कामांसाठी मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, ग्रामविकास मंत्री पाणीपुरवठा मंत्री आणि सार्वजनिक बांधकाममंत्री या सगळ्यांनी हा निधी दिला.
भाऊंच्यानंतर आपण मतदारसंघातील रस्ते कामासाठी हॅम मधून ७७७ कोटी रुपये आणले
आटपाडी, खानापूरसाठी पाणीपुरवठा योजना, हातनूर आणि विट्याच्या नवीन नळपाणी पुरवठा योजनेचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात आहे.  हातनूर ग्रामीण रुग्णालयासाठी दहा कोटी रुपये, तसेच विट्यासाठी १०० बेडचे उपजिल्हा रुग्णालय करायचे जे भाऊंचे स्वप्न होते त्याचा पाठपुरावा करून ते कामही आता अंतिम टप्प्यात आहे.
मागे आपण मंत्री गिरीश महाजन यांना भेटलो होतो, त्यांना विनंती केली होती की भाऊंच्या मागे जी काही त्यांनी सुचविलेली कामे असतील ती आम्हाला पूर्ण करून दिली पाहिजेत. त्या पद्धतीने आपण सगळे प्रस्ताव तयार करून येथून पाठवले होते, ते मंत्री महाजन यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि त्या त्या संबंधित विभागाकडून मंजूर करून घेऊन मतदार संघाला मदत करण्याचा प्रयत्न केला. काल मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या कामाचे आदेश निघाले.
यामध्ये खानापूर मतदारसंघातील ४० किलोमीटरच्या रस्त्यांसाठी ६० कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
यात ५८ कोटी रुपये हे रस्ते कामांसाठी आणि उरलेले दोन कोटी रुपये संबंधित ठेकेदारांना पाच वर्षाच्या देखभाल दुरुस्तीसाठी म्हणून देण्यात येणार आहेत. हे सगळे रस्ते काँक्रीटचे होणार आहेत. पूर्वी डांबरीचे रस्ते असायचे परंतु अलीकडच्या काळात निकष बदलले आहेत
त्यामुळे मुख्य मंत्री ग्रामसडक योजनेचे सगळे रस्ते काँक्रीटचे होणार आहेत.
यांत आटपाडी ते पांढरेवाडी – रानमळा (६ कि.मी.), शेटफळे ते चावरवस्ती (३ कि.मी.), गोमेवाडी ते हिवतड शुकाचारी (३ कि.मी.), घानवड ते भाग्यनगर (४ कि.मी.), नागेवाडी ते गोडाचीवाडी (कान्हेरवाडीपर्यंत)(४ कि.मी.), विभूतवाडी ते गुळेवाडी (३.६०कि. मी), हिवरे ते जाधववाडी (२ कि.मी), कमळापूर ते महालक्ष्मी मंदिर (४कि.मी), विटा ते चिंचणी मंगरूळ-खैराटी मळा (२.८०कि.मी), हिंगणगादे ते साळुंखेवस्ती (२ कि.मी) आणि हातनूर ते पीरदेव (२.७०कि.मी) या रस्त्यांचा समावेश आहे.
      गेल्या पाच वर्षात आमदार बाबर यांच्या माध्यमातून आपण पाणी रस्ते आरोग्य आणि शिक्षण या सगळ्याच भौतिक सुविधांबाबत राज्यातील इतर मतदारसंघांच्या तुलनेत सर्वात मोठा निधी आणल्याचे सांगत भाऊंच्या निर्णयानंतरही आपण रडत बसण्यापेक्षा दुःख पाठीवर टाकून लढण्याची जिद्द जी आम्हाला वारशाने मिळाली, ती आपण लोकांच्या न्यायासाठी, वेगवेगळ्या प्रश्नांसाठी लढत राहिलो असल्याचे सुहास बाबर यांनी सांगितले.
Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज