rajkiyalive

kolhapur flood breaking news : अकिवाट बस्तवाड रस्त्यावर महापुरात टॅ्रक्टर उलटली, तिघे बेपत्ता, चौघे सुखरूप, एकाचा मृत्यू

कुरुंदवाड दि.2( प्रतिनिधी):—-
kolhapur flood breaking news : अकिवाट बस्तवाड रस्त्यावर महापुरात टॅ्रक्टर उलटली, तिघे बेपत्ता, चौघे सुखरूप, एकाचा मृत्यू : अकिवाट – बस्तवाड रस्त्यावर पुराचे पाणी आले असताना अकिवाट ग्रामपंचायतीच्या पाण्याची मोटर चालू करण्यासाठी ट्रॅक्टरमधून जात असताना ट्रॅक्टर पाण्याच्या धारेमुळे उलटला. यातील पाच जण पोहत कसेबसे बाहेर आले तर तिघेजण बेपत्ता असून, एनडीआरएफ, वजीर रेस्क्यू फोर्स, व्हाईट आर्मी जवानांच्या व स्थानिक नागरिकांच्यावतीने त्यांचा शोध सुरू आहे. यातील अकिवाट सरपंचाचे पती सुहास पाटील यांना दम लागल्याने श्वास घेता न आल्याने त्यांना उपचारासाठी नेले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

kolhapur flood breaking news : अकिवाट बस्तवाड रस्त्यावर महापुरात टॅ्रक्टर उलटली, तिघे बेपत्ता, चौघे सुखरूप, एकाचा मृत्यू

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, अकिवाट बस्तवाड मार्गावर सध्या कृष्णेच्या पुराचे मोठ्या प्रमाणात पाणी आले आहे या मार्गावर वाहणार्‍या पाण्याला प्रचंड धार असून, यातून माजी जिल्हा परिषद सदस्य इकबाल बैरगदार, अकिवाट सरपंचांचे पती सुहास पाटील, अण्णासाहे हासुरे ,श्रेणिक चौगुले ,अरुण कोथळे, सागर माने, रोहिदास माने हे ट्रॅक्टर मधून जात असताना ट्रॅक्टर चालकास पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज न आल्याने पुराच्या पाण्यात ट्रॅक्टर पलटी झाला.

या ट्रॉलीमध्ये अकिवाट येथील सात ते आठ प्रवासी प्रवास करत होते यातील सुहास पाटील व रोहिदास माने हे दोघेजण अकिवाटच्या किनार्‍यास पोहत आले तर श्रेणिक चौगुले, अरुण कोथळे , सागर माने हे तिघेजण बस्तवाड किनार्‍यास पोहत सुखरूप पुराच्या पाण्याच्या बाहेर आले तर माजी जि.प.सदस्य बैरगदार व हासुरे यांच्यासह आणखीन एक पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहत गेल्याने बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे.

शिरोळ तालुक्यातील अकिवाट गावच्या ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठ्याची मोटर सुरू करण्यासाठी व या परिसरात नदीकाठावर असणार्‍या केळी बागेत कामासाठी जात असलेले नागरिक ट्रॅक्टर ट्रॉलीत बसून जात असताना चालकास पाण्याच्या अंदाज न आल्याने पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे ट्रॅक्टर ट्रॉली पलटी झाली. यामधील पाच जण पोहत पाण्याच्या प्रवाहाबरोबर पाण्याच्या बाहेर आले. मात्र अन्य तिघांची शोध मोहीम अद्याप सुरू आहे. दरम्यान या घटनेची माहिती अकिवाट परिसरात वार्‍यासारखी पसरली आणि नेमकी घटना काय झाले याबाबत माहिती घेण्यासाठी नागरिक व भगिनी यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

पाण्याच्या प्रभावाबरोबर बेपत्ता झालेल्या तिघांचा शोध मोहीम वजीर रेस्क्यू फोर्स, एनडीआरएफ, आपत्ती व्यवस्थापनच्या जवानामार्फत वेगाने सुरू आहे. सरपंचांचे पती मयत झाल्याने अकिवाट गावावर शोककळा पसरलेली आहे. या दुर्दैवी दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दुपारी दोनच्या सुमाराला अकिवाट येथे तातडीने भेट दिली. दत्तवाड प्राथमिक आरोग्य केंद्रात दुर्घटनेतील मृत सुहास पाटील यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले. तसेच दुर्घटनेतून वाचलेल्या इतर जखमींची विचारपूस केली.

पालकमंत्री श्री. मुश्रीफ यांनी मृत सुहास पाटील यांच्या कुटुंबीयांना तात्काळ चार लाख रुपयांची शासकीय मदत जाहीर केली.

मृत सुहास पाटील यांच्या कुटुंबीयांना सर्वतोपरी मदत आणि सहकार्य करणार असल्याचेही ते म्हणाले. पालकमंत्री मुश्रीफ यांनी एनडीआरएफच्या जवानांकडून शोध व मदत कार्याची माहिती घेतली. केंद्रीय एनडीआरएफ पथकासह महाराष्ट्राचे एसडीआरएफ व कर्नाटकच्या एसडीआरएफच्या सात बोटी शोध कार्यात सहभागी झाल्या आहेत.

अकिवाट घटनास्थळी पालकमंत्री हसन मुश्रीफ, खासदार धैर्यशील माने,जिल्हाधिकारी अमोल येडगे, शिरोळचे तहसीलदार अनिल हेळकर, कुरुंदवाड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी आशिष चौहान, कुरुंदवाड सपोनि रविराज फडणीस, माजी आमदार उल्हास पाटील, जयसिंगपूरचे माजी नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर, दत्त कारखान्याचे चेअरमन गणपतराव पाटील, गुरुदत्त कारखान्याचे चेअरमन माधवराव घाटगे, अशोकराव माने,अकिवाट गावचे तलाठी व ग्रामसेवक , विजय भोजे आदींनी भेट दिली यावेळी जिल्हाधिकारी यांनी प्रशासनास योग्य सूचना केल्या आहेत.दरम्यान पाण्याची पातळी स्थिर अवस्थेत दिसते.

19 वर्षानंतर दुर्दैवी घटना…

2005 साली आलेल्या महापुरात नागरिकांना लष्कराच्या बोटीतून राजापूर टाकळी दरम्यान स्थलांतरित करत असताना अशीच घटना घडली होती. त्यामध्येही दहा जणांना जलसमाधी मिळाली होती. त्यानंतर 2024 साली आलेल्या या महापुरात अकिवाट येथील एकाला आपला प्राण गमवावा लागला आहे. तर दोन बेपत्ता आहेत. यामुळे कृष्णा काठावरील नागरिकांनी महापुराची धास्ती घेतली आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज