rajkiyalive

कोल्हापूर जिल्ह्यात ऊस आंदोलनाचा भडका

वाहने पेटवली, धक्काबुक्कीचा प्रकार

 

जनप्रवास, कोल्हापूर 

कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ऐन दिवाळीत ऊसदर आंदोलनाचा भडका उडालेला आहे. उसाची वाहतूक करणारे ट्रॅक्टर उलथवून टाकण्याचा प्रकार टाकळीवाडी येथे घडला आहे. तर काल रात्री वारणा साखर कारखान्याकडे जाणारे उसाचे ट्रॅक्टर पेटवून देण्यात आले. गेल्या हंगामातील उसाला प्रति टन 400 रुपये अधिक द्यावेत आणि चालू गळीत हंगामासाठी प्रति टन 3500 रुपये द्यावेत या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलन सुरू केले आहे. राजू शेट्टी यांना राजकीय आव्हान मिळू लागले असल्याने शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. त्याचा प्रत्यय येऊ लागला आहे.

 

 

वारणा कारखान्याची वाहतूक का रोखली जात नाही, असा प्रश्न उपस्थित केल्याने काल रात्री या कारखान्याकडे जाणारे ट्रॅक्टर पेटवून देण्यात आले. रात्री वारणा सहकारी साखर कारखान्याचा ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर अज्ञात लोकांनी पेटविला. ही घटना वठार – पारगाव रस्त्यावरील चावरे फाट्याजवळ घडली आहे. शासन व कारखानदार आंदोलकांच्या मागणीकडे दुर्लक्ष करू लागल्याने लोकांची संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

आज सकाळी शिरोळ तालुक्यामध्ये अनेक गावांमध्ये उसाच्या गाड्या रोखण्यात आल्या. चाकातील हवा सोडून देण्यात आली. टाकळीवाडी या गावात तर आंदोलनाचा भडका उडाला. येथील काही शेतकर्‍यांनी कारखान्याला ऊस देण्यात आम्हाला रोखू नका, असे म्हटले होते. त्याला शेतकरी संघटनांनी आज आव्हान दिले. टाकळीवाडी येथे साखर कारखान्याजवळ असलेल्या उसाच्या फडात जाऊन स्वाभिमानी शेतकरी संघटना, आंदोलक अंकुश यांच्या कार्यकर्त्यांनी ऊस वाहतूक रोखली. यावेळी साखर कारखानदार समर्थकांना धक्काबुक्की करण्यात आली. शिवीगाळ झाल्याचा प्रकार घडला.

 

संतप्त आंदोलकांनी ऊसाच्या गाड्या उलथवून टाकल्या. आंदोलनाची वाढती तीव्रता पाहून घटनास्थळी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. साखर कारखाने तसेच परिसरात विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दरम्यान, कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल केल्याच्या निषेधार्थ स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हातकणंगले पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला. कारखानदारांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.

आष्ट्यात शेतकरी संघटना आक्रमक ; साखर कारखाना अधिकारी व कार्यकर्त्यांत वाद

गत वर्षी तुटलेल्या उसाला 400 रुपये दुसरा हप्ता व चालू ऊसाला 3500 रूपये यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी तीव्र आंदोलन केले. सर्वोदय सहकारी साखर (राजारामबापू युनिट क्र.3)सहकारी साखर व वसंतदादा पाटील साखर कारखाना(दत्त शुगर) सांगली कारखान्याकडे जाणारी ऊस वाहतूक रोखून धरली. ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर मधील मिरजवाडी गावाजवळ 5 ट्रॅक्टरची हवा सोडण्यात आली.

 

स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी आष्टा, मर्दवाडी, बावची, पोखर्णी, नागाव, बागणी, काकाचीवाडी, रोझावाडी या परिसरात फिरून ऊसतोडणी बंद पाडण्यात आली. रस्त्यावर वाहतूक व्यवस्था कोलमडून गेली यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते व कारखान्यादाराचे शेती अधिकारी याच्यात मोठा वाद झाला. उद्यापासून ऊसतोडणी बंद करतो तर बावची फाट्यावर 100 हुन ट्रॅक्टर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रोखुन धरले आहेत. जोपर्यंत तोडगा निघत नाही तोपर्यंत ऊस ट्रॅक्टर सोडणार नाही असा पवित्रा शेतकरी संघटनेने घेतला.
यावेळी आष्टा पोलिस ठाण्याचे सह पोलिस निरीक्षक श्रीकृष्ण कडकधोंड यांच्यासह मोठा मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

संघटनेचे तालुकाध्यक्ष भागवत जाधव, भाजप युवा मोर्चाचे प्रविण माने, बाबासाहेब सांद्रे,जगन्नाथ भोसले, पंडित सपकाळ, प्रताप पाटील, विश्वजीत पाटील, राजेंद्र राणे, विक्रांत गुरव,आशिष काळे, पोपट सुतार, सुरेंद्र माळी, मयुर पाटील, सुभाष पाटील, अमोल कोल्हे, शितल खंजीरे, सुनील कुदळे, संदेश उगळे, बबलू जमादार, प्रभाकर पाटील, शिवाजी पाटील, उत्तम पाटील, प्रकाश माळी, संपत भोसले, अधिक यादव, शामराव जाधव, सचिन यादव यासह कार्यकर्ते उपस्थित होते .

 

यावर्षी साखर कारखान्यानी साखर 3600 रूपये पुढे प्रतिक्विंटल भावाने विक्री केली. उपपदार्थ भाव चागला असताना जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी योग्य भाव देण्याबद्दल आडमुठेपणाची भुमिका सोडावी. मागील तुटलेल्या ऊसाचे पैसे जमा करावेत अन्यथा संघर्ष अटळ आहे असा इशारा भागवत जाधव यांनी दिला.

वाळवा तालुक्यात ऊसदर आंदोलन भडकण्याची चिन्हे

गतवर्षी तुटलेल्या उसाला 400 रुपये दुसरा हप्ता मिळावा. चालु ऊसाला 3500 रूपये दर मिळावा. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सर्वोदय सह.साखर व वसंतदादा पाटील साखर कारखान्याकडे जाणारी ऊस वाहतूक करणार्‍या ट्रॅक्टरच्या चाकातील हवा सोडली. तर बळीराजा शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी बहे, तांबवे येथे 25 बैलगाड्यांच्या टायर फोडल्या. दर जाहीर होत नाही तोपर्यंत एकही वाहन फिरुन देणार नाही असा इशारा दिला. त्यामुळे ऊसदर आंदोलन आता पेटणार असल्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.

 

स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी आष्टा, मर्दवाडी, बावची, पोखर्णी, नागाव, बागणी, काकाचीवाडी, रोझावाडी या परिसरात फिरून ऊसतोडणी बंद पाडल्या होत्या. बावची फाट्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ट्रॅक्टर रोखुन धरले. जोपर्यंत तोडगा निघत नाही तोपर्यंत ऊस ट्रॅक्टर सोडणार नाही अशी भुमिका घेतली. स्वाभिमानीचे भागवत जाधव, भाजप युवा मोर्चाचे प्रविण पाटील, बाबासाहेब सांद्रे, जगन्नाथ भोसले, पंडित सपकाळ, प्रताप पाटील, विश्वजीत पाटील, राजेंद्र राणे, विक्रांत गुरव, पोपट सुतार, सुरेंद्र माळी,मयुर पाटील, सुभाष पाटील,अमोल कोल्हे,शितल खंजीरे, सुनील कुदळे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

दरम्यान बहे येथे बैलगाडी चालक व बळीराजा शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. रस्त्यावरच बैलगाडीच्या चाकातील हवा सोडल्याने ट्रॅफिक जाम झाले होते. बळीराजा शेतकरी संघटना व स्वाभिमानी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन चक्काजाम करण्याचा इशारा दिला. गणेश शेवाळे, शहाजी पाटील, अशोक सलगर, मदन पाटील यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज