rajkiyalive

kolhapur news : पन्हाळ्याच्या माजी नगरसेविकांच्या पुत्रावर पोस्कोतंर्गत गुन्हा दाखल.:अल्पवयीन मुलीशी केले असभ्य वर्तन.

पन्हाळा-प्रतिनिधी
kolhapur news : पन्हाळ्याच्या माजी नगरसेविकांच्या पुत्रावर पोस्कोतंर्गत गुन्हा दाखल.:अल्पवयीन मुलीशी केले असभ्य वर्तन. : ज्या छ.ताराराणी यांनी राज्यकारभाराची सुत्रे पन्हाळगडावरुन हलविली होती.त्याच पन्हाळगडावरील एका माजी नगसेविकांच्या पुत्राकडुन अल्पवयीन मुलीशी असभ्य वर्तन केल्याप्रकरणी पोस्को कायद्यातंर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.राहुल अशोक भोसले वय:35 वर्षे रा.पन्हाळा अशा संशयित आरोपीचे नाव असुन आरोपीला अटक करण्यात आली असुन पन्हाळा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपीला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.दरम्यान बदलापुर,कोलकोत्ता,शिय ता.करवीर येथील घटना ताजी असताना पन्हाळ्यात एका चिमुकल्यासोबत लज्जा उत्तपन्न होईल असे वर्तन झाल्याने पन्हाळ्यासह परिसरातुन संतप्त प्रतिक्रया उमटत आहे.

kolhapur news : पन्हाळ्याच्या माजी नगरसेविकांच्या पुत्रावर पोस्कोतंर्गत गुन्हा दाखल.:अल्पवयीन मुलीशी केले असभ्य वर्तन.

अधिक माहिती अशी की,संशयित आरोपी राहुल भोसले हा पन्हाळगडावरील एका शाळेसाठी गडाच्या आसपास असणार्‍या बांधारी परिसरातील विद्यार्थ्यांना त्याच्या ओमनी गाडीतुन ने-आण करत होता.पिडीत मुलगी एकटी शेवटी त्याच्या घराकडे जाताना राहत होती.याचाच गैरफायदा उठवत वारंवार पिडीत मुलीच्या अंगाशी खेळणे असा प्रकार आरोपीकडुन घडत होते.27 सप्टेंबर रोजी शाळेतुन घरी सोडताना या आरोपींने रस्त्यामध्ये गाडी थांबवुन पिडीत मुलींशी असभ्य वर्तणुक केली.

घरी आल्यावर या पिडीत मुलीने हा प्रकार आपल्या आईला सांगितले.पण मुलीचे वडील कामानिमित्त नागपुर गेल्याने ते 6 आँक्टोंबर रविवारी परत आल्यावर पिडीत मुलीने व तिच्या आईने सर्व हकीकत वडीलांना सांगितले.त्यामुळे रविवारी रात्री पिडीत मुलींच्या कुटुंबीयांनी पोलिस ठाण्यात धाव घेवुन आईच्या वतीने तक्रार दाखल करण्यात आली.त्यानुसार आरोपीवर पोस्को कायद्यातंर्गत गुन्हा दाखल झाला असुन त्याला तीन दिवसाची पोलिस कोठडीत सुनावन्यात आली आहे.मात्र संतप्त गावकर्‍यांनी या घटनेचा निषेंध करत रविवारी रात्री पोलिस ठाण्यासमोर ठिय्या मांडल्याने वातावरण तणावपुर्ण बनले होते.

राहुल भोसले हा एका शक्ती पक्षाच्या माजी नगरसेविका चा मुलगा असुन तो विवाहीत आहेत.त्यांच्या आईच्या कार्यकाळात जणु आपणच नगरसेविक असल्याचा बनाव करत दमदाटी करणे,शिवीगाळी करणे असा प्रकार होत असल्याचे बोलले जात आहे.सध्या पन्हाळा गाईड युनियनचा तो अध्यक्ष असुन आपल्या शक्ती पक्षाच्या लोकप्रतिनिधीच्या जीवावर गाईड लोकांना देखील तुच्च वागणुक देत असल्याची चर्चा देखील रंगली आहे.

तर महिलांच्याबाबतीत त्याच्या बर्‍याच तक्रारी असुन बदनामी पायी कोणीही त्याच्यावर तक्रार करण्यास धजत नव्हते.दरम्यान, झालेल्या प्रकारात काही राजकीय मंडळींच्याकडुन संशयित आरोपीला पाठीशी घालण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याची चर्चेला ऊत आला असुन या प्रकणाचा तपास निपक्षपातीपणे व्हावा, अशी मागणी होत असुन ज्या प्रमाणे बदलापुर प्रकरणात अक्षय शिंदे बाबत घडले त्याची पुनराव्रुत्ती पोलिसांनी राहुल भोसले बाबत करावी,अशी मागणी पिडीत मुलीच्या नातेवाईकांसह ,सर्व सामान्य नागरिकांच्यातुन होत आहे.अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक संजय बोबले यांच्या मार्गदर्शनाखाली पन्हाळा पोलिस करत आहेत.

 

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज