rajkiyalive

kolhapur political news : कोल्हापुरात पालकमंत्रीपदावर आबिटकरांची जोरदार मोर्चेबांधणी

दिनेशकुमार ऐतवडे

kolhapur political news : कोल्हापुरात पालकमंत्रीपदावर आबिटकरांची जोरदार मोर्चेबांधणी: राज्यात महायुतीचे सत्ता येवून बरेच दिवस झाले परंतु पालकमंत्र्यांचा वाद अद्याप मिटला नाही. फडणवीस सरकारने 17 जिल्ह्यात मंत्रीपद दिले नाही परंतु कोल्हापूर जिल्ह्यात तीन कॅबीनेट मंत्रीपद दिले आहेत. राष्ट्रवादीचे हसन मुश्रीफ, शिवसेना शिंदे गटाचे प्रकाश आबीटकर तर मूळचे कोल्हापूरचे असलेले आणि पुण्यातून निवडून आलेले चंद्रकांत पाटील हे तिघे कॅबीनेट मंत्री आहेत. त्यामुळे कोल्हापुरात आता पालकमंत्री कोणाला करायचे याबाबत मोठा तिढा निर्माण झाला आहे.

kolhapur political news : कोल्हापुरात पालकमंत्रीपदावर आबिटकरांची जोरदार मोर्चेबांधणी

पालकमंत्रीपदासाठी आता शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजपामध्ये रस्सीखेच सुरू आहे. कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेना शिंदे गटाचे चार आमदार निवडून आल्याने पालकमंत्रीपदावर शिवसेनेने दावा केला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत असल्याने हे पद कोणाला मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

राज्यात अगदी अनपेक्षितरित्या महायुतीची सत्ता आली.

कोल्हापूर जिल्ह्यातून महाविकास आघाडी हद्दपार झाली. कोल्हापूरात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे एकमेव हसन मुश्रीफ निवडून आले आहेत. तर शिवसेना शिंदे गटाचे प्रकाश आबीटकर, राजेश क्षीरसागर, चंद्रदीप नरके हे निवडून आले तर शिंदेंना मानणारे राजेंद्र पाटील यड्रावकर यांनाही शिंदे गटात मोजले जाते. जिल्ह्यातील 10 पैकी भारतीय जनता पार्टीचे 3, शिंदे सेनेचे 3, जनसुराज्य शक्ती पक्षाचे 2, राष्ट्रवादी अजित पवार गट 1 आणि शिवसेना पुरस्कृत अपक्ष 1 असे उमेदवार निवडून आले. त्यामुळे पक्षीय बलाबल पाहिले तर शिवसेना शिंदे गटाचे आमदार जास्त आहेत. त्यामुळे या बळावर प्रकाश आबीटकर यांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

सध्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये पालकमंत्री पदासाठी जोरदार रस्सीखेच सुरू आहे.

मात्र यापूर्वी मंत्री चंद्रकांत पाटील आणि हसन मुश्रीफ यांच्या माध्यमातून भाजपा आणि राष्ट्रवादीने पालकमंत्री पद भूषवले आहेत तर यंदा पहिल्यांदाच कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतलेल्या प्रकाश अबिटकर यांचे पारड जड मानलं जात आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीने काँग्रेसचा सुफडासाफ केला आणि निर्विवाद वर्चस्व मिळवले…

भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि कोथरूड विधानसभा मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या रूपाने तिसरे कॅबिनेटमंत्री पद जिल्ह्याला मिळाले आहे. 2019 च्या निवडणुकीत भाजपला कोल्हापूर जिल्ह्यात एकही जागा निवडून आणता आले नाही यानंतर गेल्या पाच वर्षात भाजप सहकार च्या माध्यमातून मातब्बर नेत्यांची चांगली मोट बांधली. जिल्ह्याच्या सहकारावर नियंत्रण असाव यासाठी आणि पुण्याचा पालकमंत्रीपद अजित पवार यांना गेलं तर ज्येष्ठ नेते म्हणून पूर्वी कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री पद सांभाळलेल्या चंद्रकांत पाटील यांनाही पक्ष पालकमंत्री पदाची जबाबदारी देऊ शकतो

मात्र ज्यांचे जास्त आमदार त्यांचाच पालकमंत्री असं सूत्र ठरल्यास शिवसेनेकडून कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतलेल्या प्रकाश अबिटकर यांनाही यंदा पालकमंत्री पदाची संधी आहे. तर राष्ट्रवादीकडून सलग सहाव्यांदा निवडून आलेले हसन मुश्रीफ यांचाही पालकमंत्री पदावर डोळा आहे.गेल्या तीन वर्षांपासून लांबणीवर पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर आणि विशेषतः

महायुतीला मिळालेल्या भरघोस यशानंतर यंदा पार पडण्याच्या हालचाली सुरू आहेत.या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून जिल्ह्यात आपला पालकमंत्री असेल तर जास्तीत जास्त ताकद लावता येईल यासाठी महायुतीतील तिन्ही प्रमुख पक्षातील नेते पालकमंत्री पद आपल्याकडे ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणे आणि जिल्ह्याला मिळालेली मंत्रीपद यामुळे या निवडणुकीतही महायुती सहकारी संस्था आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी प्रयत्न करणार आहे. यामुळे कोल्हापूरचा पालकमंत्री पद नेमकं कोणाला जाणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज