rajkiyalive

kunthusagarji maharaj : जना जनांच्या आस्थेचे केंद्रबिंदू परमपूज्य जगद्गुरू कुंथूसागरजी महाराज

 

kunthusagarji maharaj : जना जनांच्या आस्थेचे केंद्रबिंदू परमपूज्य जगद्गुरू कुंथूसागरजी महाराज : सांगली येथील पद्मावती कॉलनी येथे बुधवार दि. 30 एप्रिलपासून पंचकल्याणक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या पंचकल्याण महोत्सवासाठी यांचे सानिध्य आणि आशिर्वाद लाभणार आहे. 24 डिसेंबर 2024 ते 24 एप्रिल 2025 या कालावधीत आचार्य कुंथूसागरजी महाराज आपल्या संघासहीत 121 दिवसामध्ये 2100 किलोमिटरचा विहार करून आले आहेत.

kunthusagarji maharaj : जना जनांच्या आस्थेचे केंद्रबिंदू परमपूज्य जगद्गुरू कुंथूसागरजी महाराज

यामध्ये ते निश्चयगिरी, स्तवनिधी, शांतिगीरी, गोकाक, धारवाड, हुबळी, नवग्रह, तीर्थवरूर, श्र्रवणबेळगोळ, मुडबिद्री, कारकल, वारंग, धर्मस्थळ, होम्बु्रज, ज्वालामालिनी, सौंधामठ, बैलगाव, कोल्हापूर मठ इत्यादी क्षेत्रावर विहार आणि दर्शन करून धर्मप्रभावना करून आले. आता त्यांचे आशिर्वाद सांगलीकरांना मिळणार आहेत. त्यांच्याविषयी थोडक्यात….
परम पूज्य गणाधिपती गणधराचार्य जगदगुरु 108 श्री कुंथूसागरजी महाराज यांचा जन्म 12 जून 1946 रोजी पं.रेवाचंदजी आणि आई सोहनबाई यांच्या परिवारात राजस्थानच्या मेवाड संभागामध्ये उदयपूर जिल्ह्याच्या बांठेडा गावात झाला. त्यांचे नाव त्यावेळी कन्हैया ठेवण्यात आले.

108 आचार्य महावीरकिर्तीती महाराज यांचे दर्शन आणि सानिध्य लाभले.

त्यांचे प्राथमिक शिक्षण झाल्यानंतर 1962 मध्ये तिर्थभक्त शिरोमणी 18 भाषांचे ज्ञान असणारे 108 आचार्य महावीरकिर्तीती महाराज यांचे दर्शन आणि सानिध्य लाभले. त्यांचा प्रभाव त्यांच्या मनात भिनला आणि त्यांनी 17 वर्षाच्या कोवळ्या वयात गृहत्याग केला आणि आचार्य महाराजांच्या संघामध्ये बालब्रह्मचारीच्या रूपात राहून सेवा, भक्ती आणि शास्त्राचे व जैन आगमचे अध्ययन करू लागले.

2 जुलै 1967 रोजी कर्नाटक राज्य येथील होंबुज पद्मावती अतिशय क्षेत्रामध्ये दिगंबरी दिक्षा

108 आचार्य महावीरकिर्तीजी महाराज यांनी आपली सेवा, योग्यता आणि अभ्यासाची क्षमता तसेच वैराग्य पाहून 2 जुलै 1967 रोजी कर्नाटक राज्य येथील होंबुज पद्मावती अतिशय क्षेत्रामध्ये त्यांना दिगंबरी दिक्षा दिली आणि त्यावेळी त्यांचे नाव 108 मुनिश्री कुंथुसागरजी महाराज ठेवण्यात आले. त्यांचे कार्य करण्याची पध्दत आणि निर्दोष मुनिचर्यामुळे त्यांनी थोड्याच दिवसात संपूर्ण संघात लाडके झाले. त्यांची योग्यता पाहून दिक्षागुरु पूज्य आचार्य श्री महावीरकिर्तीजी महाराज यांनी त्यांच्या समाधीच्या आधी 1972 मध्ये गुजरातच्या उंझा गावात त्यांना गणधर पदवी प्रदान केली.

1980 मध्ये महाराष्ट्राची धर्मनगरी अकलूज येथे त्यांना आचार्य म्हणून गौरविले

थोड्याच दिवसात त्यांच्या समाधीनंतर कुंथूसागर आपल्या संघासहीत संपूर्ण देशभरात विहार करत करत अद्भूत धर्म प्रभावना केली. कठोर तपश्चर्या, त्याग, साधना, संघाचे अनुशासन, प्रवचन शैली आणि शास्त्राचे ज्ञान यामुळे कुंथूसागर यांचे नाव देशभरात होऊ लागले. त्यामुळेच वात्सल्य रत्नाकर 108 आचार्य श्री विमलसागरजी महाराज यांनी 1980 मध्ये महाराष्ट्राची धर्मनगरी अकलूज येथे त्यांना आचार्य म्हणून गौरविले आणि आपण तेव्हापासून गणधराचार्य या नावाने कुंथूसागर देशमरात प्रसिध्द झाले.

1980 पासून आजपर्यंत कुंथूसागर महाराजांना देशभरातील वेगवेगळे आचार्य, समाज आणि चर्तुविध संघ यांनी वेळोवेळी विभिन्न उपाधी देवून गौरविले. त्यामध्ये रत्नाकर, श्रमण शिरोमणी, स्वाध्याय केसरी, भारत गौरव, निमित्तज्ञान शिरोमणी, तत्ववेत्ता, कलिकाल सर्वज्ञ, गणाधिपती, गणधराचार्य, श्रमणरत्न, अष्टांगनिमितज्ञ, मंत्रविद्या चक्रवर्ती, कल्पतरू, जिनागम सिध्दांत महोदधि, जगद्गुरू इत्यादी आहेत.

kunthusagarji-maharaj-the-center-of-peoples-interest-is-his-holiness-jagadguru-kunthusagarji-maharaj

या काळात त्यांनी आपल्या लेखनीमधून विभिन्न ग्रंथांची रचना आणि अनेक ग्रंथांची टीका केली आहे. त्यामध्ये रत्नकरण श्रावकाचार, श्री गोम्मट प्रश्नोत्तर चिंतामणी, प्रतिष्ठाविधी दर्पण, भद्रबाहू संहिता, स्याद्वाद केसरी, व्रतकथा कोष, लघुविद्यानुवाद, कुंथुगिरी पुष्पांजली, देवोषिधी रत्नाकर, असे ग्रंथ देशभरात विख्यात झाले.

त्यांनी आपले प्रथम शिष्य म्हणून 108 आचार्य श्री कनकनंदिजी महाराज यांना दिक्षा दिली. ते महाराज आज देश-विदेशात वैज्ञानिक आचार्य या नावाने विख्यात आहेत. त्यानंतर त्यांनी शेकडो भव्य लोकांना मुनि, आर्यिका, क्षुल्लक, क्षुल्लिका, ब्रह्मचारी अशी दिक्षा देऊन त्यांचे मोक्षमार्ग प्रशस्त केलेला आहे.

त्यांनी आपल्या शिष्यांना आणि मुनींना आचार्यपद, गणिनीपद दिलेले आहे. आपले शिष्य आणि उपशिष्य यामध्ये आचार्य कनकनंदिजी, आचार्य पद्मनंदिजी, आचार्य देवनंदिजी, आचार्य कुमुदनंदिजी, आचार्य कुशाग्रनंदिजी, आचार्य गुप्तीनंदिजी, आचार्य गुणनंदिजी, आचार्य गुणधरनंदिजी, आचार्य कर्मविजय नंदिजी, आचार्य विद्यानंदिजी, आचार्य तिर्थनंदिजी, आचार्य गुणमद्रनंदिजी, आचार्य वैराग्यनंदिजी, आचार्य निश्चयसागरजी असे विशाल आचार्य संघाचे कुंथूसागरजी गुरुनाम गुरु आहेत.

कुंथूसागर महाराजांकडून वीसपेक्षा जास्त क्षेत्राचा उध्दार झालेला असून आजपर्यंत त्यांनी शेकडो पंचकल्याणक पूजा आणि विधान केले आहेत. अणिन्दा पार्श्वनाथ या क्षेत्राचा जिर्णोध्दार आणि श्री क्षेत्र कुंथुगिरी प्रणेता म्हणून जैन धर्माला अमूल्य धरोहर प्रदान केली आहे. श्री क्षेत्र कुंथुगिरीचे नवनिर्माण श्री सम्मेदाचल कुंथुगिरी पर्वताचा निर्माण हे विशाल कार्य फक्त त्यांच्या त्याग आणि तपस्येने सम्पन्न झालेले आहे.

प्रत्येक पौर्णिमेस 1008 श्री कलिकुंड पाश्वनार्थ भगवान आणि प्रत्येक अमावस्येला 1008 श्री मुनिसुव्रतनाथ भगवान यांचे मस्तकाभिषेक डोळ्याचे पारणे फेडणारे असते. सदर अभिषेक बघण्यासाठी शेकडो श्रावक बंधु-भगिनी देशभरातून येत असतात. अनेक मुनि आर्यिका यांची चैत्यन्य अवस्थेमध्ये उत्कृष्ठ समाधि करून घेण्यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. त्यांना उत्कृष्ट निर्यापकाचार्य म्हणून विख्यात आहात.

त्यांच्याकडून आणि त्यांच्या आर्शिवादामुळे असे अनेक कार्य झालेले आहेत. ज्यांना विश्व रेकॉर्ड व लिम्काबुक रेकॉर्डमध्ये गौरविण्यात आलेले आहे. आर्षमार्ग चे कट्टर समर्थक म्हणून त्यांची संपूर्ण देशभरात ख्याती आहे. त्यांनी कधीही जैन धर्माच्या सिध्दांतामध्ये समझोता केलेला नाही.

त्यांच्याकडे येणारे सर्व भाविक मनाची शांती अनुभवून मनोवांछित फल प्राप्त करून जातात. ते फक्त जैनाचे नसून जना जनाच्या आस्थेचे केंद्रबिंदू आहात.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज