rajkiyalive

kupwad crime news : वटपौर्णिमेच्या रात्रीच कुर्‍हाडीने घाव घालून पत्नीने घेतला पतीचा जीव

kupwad crime news : वटपौर्णिमेच्या रात्रीच कुर्‍हाडीने घाव घालून पत्नीने घेतला पतीचा जीव : शहरातील प्रकाशनगर गल्ली नंबर 6 मध्ये एकता कॉलनी येथे मंगळवारी वटपौर्णिमेच्या रात्री साडेअकरा ते साडेबाराच्या दरम्यान राहत्या घरातच अनिल तानाजी लोखंडे ( वय -53 ) याचा पत्नीने डोक्यावर, कानावर कुर्‍हाडीने वर्मी घाव घालून निर्घृण खून केल्याची घटना घडली.या घटनेची नोंद कुपवाड पोलिसात झाली आहे.

kupwad crime news : वटपौर्णिमेच्या रात्रीच कुर्‍हाडीने घाव घालून पत्नीने घेतला पतीचा जीव

कुपवाड प्रकाशनगर मधील घटना : कौटुंबिक कारणातून खून झाल्याचा प्राथमिक अंदाज

नातेवाईक मुकेश मोहन लोखंडे यांनी कुपवाड पोलिसात फिर्याद दिली . याप्रकरणी पत्नी राधिका बाळकृष्ण इंगळे (वय 27वर्ष रा. वडी ता. खटाव जि. सातारा. सध्या प्रकाश नगर गल्ली क्रमांक 6अहिल्यानगर कुपवाड) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित महिलेचे नाव आहे. कौटुंबिक कारणातून खून झाल्याची माहिती प्राथमिक तपासात पुढे येत आहे.

पोलिसांनी व घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार मयत अनिल लोखंडे यांचे पहिल्या पत्नीचे दोन वर्षापूर्वी आजाराने निधन झाले.मयत अनिल यांना दोन मुली दोन्ही मुलींची लग्न झाल्याने अनिल हा एकटाच घरी राहत होता.त्यामुळे पोटाचे हाल होत असल्याने अनिल यांच्या नातेवाईकांनी सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील वडी गावातील राधिका बाळकृष्ण इंगळे या 27 वर्षीय तरुणी सोबत 23 मे 2025 रोजी लग्न लावून दिले.

लग्न झाल्यावर अवघ्या 17 दिवसांनी वटपौर्णिमेच्या रात्री साडेअकरा ते साडेबाराच्या दरम्यान कौटुंबिक कारणातून पत्नी राधिकाने घरामधील हॉलमध्ये अंथरुणावर बेसावध पडलेले असताना पती अनिल याच्या डोक्यावर व कुर्‍हाडीने वर्मी घाव घातले. वर्मी घाव बसल्याने अनिल याचा जागीच मृत्यू झाला.

kupwad-crime-news-wife-kills-husband-with-axe-on-vat-pournima-night

ही माहिती मिळताच माधवनगर मधील नातेवाईकांनी अहिल्यानगर येथे अनिल लोखंडे यांच्या घरी तातडीने धाव घेऊन पाहणी केली असता आणि लोखंडे हे अंथरुणावर रक्ताच्या थारोळ्यात पडले होते तर शेजारी रक्ताने माखलेली कुर्‍हाड दिसली . फिर्यादी मुकेश लोखंडे यांनी कुपवाड पोलिसांना कळविले.

घटनेची माहिती मिळताच मिरजेचे पोलिस उपविभागीय अधिकारी प्रणिल गिल्डा, सहाय्यक पोलिस निरीक्षक दीपक भांडवलकर यांच्यासह पथकाने घटनास्थळी धाव घेतली. घटनेचा पंचनामा केला.संशयित राधिकाला ताब्यात घेतले.संशयित पत्नी राधिका हिने खुनाची कबुली दिली. अधिक तपास पोलीस करीत आहेत.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज