स्थानिक गुन्हे अन्वेषण ने दोघांना केले जेरबंद
kupwad murdar news : कुपवाडमध्ये दारूच्या वादातून धारधार शस्त्राने तरुणाचा खून : कुपवाड : औद्योगिक वसाहत ते सावळी रस्त्यावरील आरटीओ ऑफिसच्या पिछाडीस मोकळ्या मैदानात ’दारू पिण्याच्या वादावरून ’सराईत गुन्हेगाराचा दोघा संशयितांनी धारदार शस्त्राने पोटावर व छातीवर वर्मी वार करून खून केला. ही घटना सोमवारी रात्री उशिरा घडली. समीर रमजान नदाफ (वय 41, रा. रॉयल सिटी मारावा अपार्टमेंट दुसरा मजला,कुपवाड) असे मृताचे नाव आहे.
kupwad murdar news : कुपवाडमध्ये दारूच्या वादातून धारधार शस्त्राने तरुणाचा खून
याप्रकरणी शमा रियाज नदाफ यांनी कुपवाड पोलिसात फिर्याद दिली.एका सराईतसह दोघांवर कुपवाड पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सोहेल सलीम काझी (रा. खारे मळा कुपवाड), साबीर शरीफ मुकादम (रा. बडेपीर कॉलनी कुपवाड) अशी गुन्हा नोंद केलेल्या संशयितांची नावे आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, कुपवाड औद्योगिक वसाहत ते सावळी रस्त्यावरील एका कारखान्यासमोर रक्ताच्या थारोळ्यात पडल्याची माहिती कुपवाड पोलिसांना मिळाली. सहायक पोलिस निरीक्षक दीपक भांडवलकर यांनी पोलिस कर्मचार्यांसह तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी जखमी नदाफला आयुष हेल्पलाईन टीमच्या मदतीने मिरजेतील शासकीय रुग्णालयात दाखल केले; परंतु वर्मी घाव बसल्याने त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
घटनास्थळी श्वान पथक, फॉरेन्सिक लॅबोरेटरी चे पथक पाचारण करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर पोलिस अधीक्षक रितू खोखर, मिरजेचे उपअधीक्षक प्रणिल गिल्डा यांनी घटनास्थळी भेट दिली. तपासाच्या अनुषंगाने सूचना केल्या.पोलिसांनी तपासाची चक्रे गतीने फिरवत स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने सापळा रचून कुपवाड ते जुना मिरज रस्त्यावरील बडेपीर दर्ग्याजवळून दोघांना ताब्यात घेतले.त्यांना पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी सांगितले मयत समीर नदाफ हा सोहेल काझी याच्या पानपट्टीवर येऊन पैसे न देता मावा, सिगारेट घेऊन जात होता पैसे मागितले की जीवे मारण्याची धमकी द्यायचा याचा राग सोहेलला होता.
kupwad-murdar-news-youth-murdered-with-sharp-weapon-over-liquor-dispute-in-kupwad
सोमवारी पाण्याचा टाकीजवळ संशयित सोहेल व साबीर थांबले असता नदाफ त्या ठिकाणी आला व त्यांना दारूसाठी पैसे मागितले त्यावेळी त्यास दारू पिण्यास जाऊया असे सांगून त्याला आर टी ओ ऑफिस शेजारील मैदानात घेऊन गेले त्या ठिकाणी त्याच्या छातीवर, पाठीवर, व डोक्याच्या पाठीमागे धार धार शस्त्राने वार केल्याची कबुली दिली. दोघा संशयितांना अटक करून पुढील तपासाठी कुपवाड पोलीसांच्या ताब्यात दिले.

Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.