rajkiyalive

LOKSABHA 2024 EXIT POLL: विशाल पाटील, सत्यजितआबा, शाहू महाराज यांच्या विजयाची शक्यता

Disclaimer : सर्वेक्षणातून समोर आलेले निकष पूर्णपणे लोकांकडून मिळालेल्या उत्तरांवर आधारित आहेत, त्यामुळे यातून rajkiya live कोणताही दावा करत नाही. यासाठी लोकांची मतं जाणून घेण्यात आली आहेत. सर्वेक्षणातील त्रुटींचं मार्जिन ऑफ एरर प्लस – मायनस 3 ते प्लस – मायनस 5 टक्के इतके आहे.

राजकीय लाईव्हच्यावतीने राज्यातील 48 जागांच्या सर्व्हेतील  अंदाज

लाईव्हच्यावतीने लोकसभा 2024 च्या संपूर्ण महाराष्ट्रातील 48 मतदार संघातील निवडणूक निकालाचा सर्व्हे घेण्यात आला. या सर्व्हेमध्ये महाराष्ट्रात महायुतीला 23, महाविकास आघाडीला 24, तर अपक्ष 1 जागा मिळतील, असा निष्कर्ष पुढे आला आहे. राज्यात विक्रम करीत सांगलीतून अपक्ष विशाल पाटील हे बाजी मारून दरवाजा फोडत संसदेत एंन्ट्री करतील असे, सर्व्हेतून पुढे आले आहे.
हातकणंगले मतदार संघातून शिवसेना सत्यजित पाटील तर कोल्हापूर लोकसभा मतदार संघातून छ. शाहू महाराज बाजी मारतील असा अंदाज आहे.

महाराष्ट्रातील 48 मतदारसंघांची विभागनिहाय स्थिती

LOKSABHA 2024 EXIT POLL: विशाल पाटील, सत्यजितआबा, शाहू महाराज यांच्या विजयाची शक्यता  : लाईव्हच्यावतीने लोकसभा 2024 च्या संपूर्ण महाराष्ट्रातील 48 मतदार संघातील निवडणूक निकालाचा सर्व्हे घेण्यात आला. या सर्व्हेमध्ये महाराष्ट्रात महायुतीला 23, महाविकास आघाडीला 24, तर अपक्ष 1 जागा मिळतील, असा निष्कर्ष पुढे आला आहे. राज्यात विक्रम करीत सांगलीतून अपक्ष विशाल पाटील हे बाजी मारून दरवाजा फोडत संसदेत एंन्ट्री करतील असे, सर्व्हेतून पुढे आले आहे.

 

LOKSABHA 2024 EXIT POLL: विशाल पाटील, सत्यजितआबा, शाहू महाराज यांच्या विजयाची शक्यता

महायुतीला (43) या निवडणुकीत तब्बल 19 जागांवर फटका बसल्याचे दिसत आहे.

या निष्कर्षातून सन 2019 च्या तुलनेत महायुतीला (43) या निवडणुकीत तब्बल 19 जागांवर फटका बसल्याचे दिसत आहे. जरी 2019 ला महाविकास आघाडी नसली तरी विरोधक काँग्रेस, राष्ट्रवादीची संख्या केवळ 5 होती. पण पाच वर्षात बरेच पाणी पुलाखालून वाहून गेले. भाजपशी सोबत करीत शिवसेनेतून चिन्ह व पक्ष घेवून शिंदे गट फुटला. राष्ट्रवादीचे अजितदादा पवार यांनीही भाजपच्या साथीने शिंदे सेनेचा कित्ता गिरवत शरद पवारांपासून राष्ट्रवादी आणि चिन्ह बळकावत स्वतंत्र गट निर्माण केला. त्यामुळे त्यांच्या महायुती विरोधात शरद पवारांचा राष्ट्रवादी, उध्दव ठाकरे शिवसेना व काँग्रेस यांच्या साथीने महाविकास आघाडी लढली. त्यातून विरोधक महाविकास आघाडीला 16 जागांवर फायदा होताना दिसून येत आहे.

यातील महायुतीचे घटक भाजपला 19, शिंदे गटाला 4 जागा मिळतील तर अजितदादा गटाला भोपळाही फोडला येणार नसल्याचे दिसते. महाविकास आघाडीतील ठाकरे गटाला 14, शरद पवार गटाला 6 तर काँग्रेसला 4 जागा मिळतील असे दिसून येते.

पश्चिम महाराष्ट्र – 10 लोकसभा मतदारसंघ एकूण 10 पैकी महायुतीला केवळ 2 जागा (1 भाजप, 1 शिंदे गट ) ,
तर महाविकास आघाडीला 7 जागा मिळू शकतात. त्यात (शरद पवार गट 4, काँग्रेस 2 व उद्धव ठाकरे सेना 1)

कोकण आणि ठाणे – 6 लोकसभा मतदारसंघ,
महायुतीला 3 (भाजप2, शिंदे सेना गट – 1,), महाविकास आघाडी 3 (उद्धव ठाकरे सेना 3)

विदर्भ – 10 लोकसभा मतदारसंघ
महायुतीला 6 (भाजप 5, शिवसेना शिंदे सेना 1) महाविकास आघाडी 4 (उद्धव ठाकरे सेना 2, शरद पवार गट 1, काँग्रेस 1)

मराठवाडा – 8 लोकसभा मतदारसंघ
महायुतीला 3 (भाजप 3) महाविकास आघाडी 5 (उद्धव ठाकरे सेना 4, राष्ट्रवादी शरद पवार गट 1)
मुंबई विभाग – 6 लोकसभा मतदारसंघ
महायुतीला 2 (भाजप 2) महाविकास आघाडी 4 (उद्धव ठाकरे सेना – 3, काँग्रेस 1)
उत्तर महाराष्ट्र – 8 लोकसभा मतदारसंघ
महायुतीला 7 (भाजप 6 शिंदे शिवसेना गट – 1) महाविकास आघाडीला 1 (उद्धव ठाकरे सेना -1)

पश्चिम महाराष्ट्र -10 लोकसभा मतदारसंघ

एकूण 10 पैकी महायुतीला केवळ 2 जागा (1 भाजप, शिंदे गट 1) , अपक्ष 1

तर महाविकास आघाडीला 7 जागा मिळू शकतात. त्यात (शरद पवार गट 4, काँग्रेस 2 व उद्धव ठाकरे सेना 1)
पुणे – मुरलीधर मोहोळ – भाजप विजयी विरुद्ध रविंद्र धंगेकर – काँग्रेस
बारामती – सुप्रिया सुळे – शरद पवार गट विजयी विरुद्ध सुनेत्रा पवार – अजितदादा गट
शिरूर – विद्यमान खा. अमोल कोल्हे – शरद पवार गट विजयी विरुद्ध शिवाजीराव आढळराव पाटील – अजितदादा गट
मावळ – श्रीरंग बारणे – शिंदे शिवसेना गट विजयी विरुद्ध संज्योत वाघेरे – उद्धव ठाकरे सेना
सातारा – शशिकांत शिंदे – शरद पवार गट विजयी विरुद्ध उदयनराजे भोसले – भाजप
कोल्हापूर – छत्रपती शाहू महाराज – काँग्रेस विजयी विरुद्ध विद्यमान खा. संजय मंडलिक – शिंदे सेना शिवसेना
हातकणंगले – सत्यजित पाटील-सरुडकर – उद्धव ठाकरे सेना विजयी विरुद्ध विद्यमान खा. धैर्यशील माने – शिंदे शिवसेना गट
सांगली – विशाल पाटील -अपक्ष विजयी विरुद्ध विद्यमान खा. संजयकाका पाटील – भाजप
सोलापूर – प्रणिती शिंदे – काँग्रेस विजयी विरुद्ध राम सातपुते – भाजप,
माढा – धैर्यशील मोहिते-पाटील – शरद पवार गट विजयी विरुद्ध विद्यमान खा. रणजितसिंह मोहिते-पाटील -भाजप

उत्तर महाराष्ट्र – 8 लोकसभा मतदारसंघ

महायुतीला 7 (भाजप 6 शिंदे शिवसेना गट – 1) महाविकास आघाडीला 1 (उद्धव ठाकरे सेना -1)

अहमदनगर – सुजय विखे – भाजप विजयी विरुद्ध निलेश लंके – शरद पवार गट
शिर्डी – सदाशिव लोखंडे – शिवसेना शिंदे गट विजयी विरुद्ध भाऊसाहेब वाघचौरे – उद्धव ठाकरे सेना
नंदुरबार – डॉ. हिना गावीत – भाजप विजयी विरुद्ध गोवाल पाडवी – काँग्रेस
धुळे- सुभाष भामरे – भाजप विजयी विरुद्ध डॉ. शोभा बच्छाव – काँग्रेस
जळगाव – स्मिता वाघ – भाजप विजयी विरुद्ध करण पवार – शिवसेना – ठाकरे गट,
रावेर – रक्षा खडसे – भाजप विजयी विरुद्ध श्रीराम पाटील – शरद पवार गट
दिंडोरी – डॉ. भारती पवार – भाजप विजयी विरुद्ध भास्करराव भगरे – शरद पवार गट
नाशिक – राजाभाऊ वाजे – उद्धव ठाकरे सेना विजयी विरुद्ध हेमंत गोडसे – शिंदे सेना

मराठवाडा – 8 लोकसभा मतदारसंघ

महायुतीला 3 (भाजप 3) महाविकास आघाडी 5 (उद्धव ठाकरे सेना 4, राष्ट्रवादी शरद पवार गट)

बिड – बजरंग सोनावणे – राष्ट्रवादी शरद पवार गट विजयी विरुद्ध पंकजा मुंडे- भाजप (जरांगे फॅक्टरचा फटका)
उस्मानाबाद – धाराशिव : विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर – शिवसेना ठाकरे सेना विजयी विरुद्ध अर्चना पाटील – अजित पवार गट
लातूर – सुधाकर श्रृंगारे – भाजप विजयी विरुद्ध शिवाजीराव काळगे – काँग्रेस
हिंगोली – नागेश पाटील- आष्टीकर – शिवसेना ठाकरे सेना विजयी विरुद्ध बाबूराव कदम – शिवसेना शिंदे सेना
नांदेड – प्रतापराव चिखलीकर – भाजप विजयी विरूद्ध वसंतराव चव्हाण – काँग्रेस
परभणी – संजय जाधव – शिवसेना ठाकरे गट विजयी विरुद्ध महादेवराव जानकर – राष्टवादी – अजित पवार गट
जालना – रावसाहेब दानवे – भाजप विजयी विरुद्ध कल्याण काळे – काँग्रेस
औरंगाबाद – चंद्रकांत खैरे – शिवसेना उद्धव ठाकरे गट विरुद्ध संदीपान भुमरे – शिवसेना शिंदे सेना

विदर्भ – 10 लोकसभा मतदारसंघ

महायुतीला 6 (भाजप 5, शिवसेना शिंदे सेना 1) महाविकास आघाडी 4 (उद्धव ठाकरे सेना 2, शरद पवार गट 1, काँग्रेस 1)

बुलढाणा – नरेंद्र खेडेकर – उद्धव ठाकरे गट विजयी विरुद्ध विरुद्ध प्रतापराव जाधव – शिवसेना शिंदे सेना
अकोला – अनुप धोत्रे – भाजप विजयी विरुद्ध अभय पाटील – काँग्रेस
अमरावती – बळवंत वानखेडे – काँग्रेस विजयी विरुद्ध नवनीत राणा – भाजप (बच्चू कडूंच्या विरोधामुळे नवनीत राणा अडचणीत)
वर्धा – अमर काळे – राष्ट्रवादी शरद पवार गट विजयी विरुद्ध रामदास तडस – भाजप
रामटेक – राजू पारवे – शिवसेना शिंदे सेना विजयी विरुद्ध श्यामकुमार बर्वे – काँग्रेस
नागपूर – नितीन गडकरी – भाजप विजयी विरुद्ध विकास ठाकरे – काँग्रेस
भंडारा-गोंदिया – सुनील मेंढे – भाजप विजयी विरुद्ध डॉ. प्रशांत पडोळे – काँग्रेस
गडचिरोली-चिमूर – अशोक नेते – भाजप विजयी विरुद्ध डॉ. नामदेव किरसान – काँग्रेस
चंद्रपूर – सुधीर मुनगंटीवार – भाजप विजयी विरुद्ध – प्रतिभा धानोरकर – काँग्रेस
यवतमाळ-वाशिम – संजय देशमुख -शिवसेना ठाकरे सेना विजयी विरुद्ध राजश्री पाटील – शिवसेना शिंदे सेना भावना गवळींची उमेदवारी कापली)

कोकण आणि ठाणे – 6 लोकसभा मतदारसंघ

महायुतीला 3 (भाजप 2, शिंदे सेना गट – 1, अजितदादा गट 0), महाविकास आघाडी 3 (उद्धव ठाकरे सेना 3)

रत्नागिरी-सिंधुदुर्ग – विनायक राऊत – उद्धव ठाकरे विजयी विरुद्ध सेना नारायण राणे – भाजप
रायगड – अनंत गिते – शिवसेना ठाकरे सेना विजयी विरुद्ध सुनील तटकरे अजितदादा गट राष्ट्रवादी
पालघर – हेमंत सावरा – भाजप विजयी विरुद्ध भारती कामडी – शिवसेना ठाकरे सेना
भिवंडी – कपिल पाटील – भाजप विजयी विरुद्ध सुरेश म्हात्रे (बाळ्यामामा) – राष्ट्रवादी शरद पवार गट
कल्याण – डॉ. श्रीकांत शिंदे विजयी विरुद्ध वैशाली दरेकर (शिवसेना ठाकरे सेना गट)
ठाणे – राजन विचारे – शिवसेना ठाकरे गट विजयी विरुद्ध नरेश म्हात्रे – शिवसेना शिंदे सेना गट

मुंबई विभाग – 6 लोकसभा मतदारसंघ

महायुतीला 2 (भाजप 2) महाविकास आघाडी 4 (उद्धव ठाकरे सेना – 3, काँग्रेस 1)

मुंबई उत्तर – पियुष गोयल – भाजप विजयी विरुद्ध विरुद्ध भूषण पाटील – काँग्रेस
मुंबई उत्तर पश्चिम – अमोल किर्तीकर – शिवसेना ठाकरे सेना विजयी विरुद्ध रविंद्र वायकर – शिवसेना शिंदे सेना
मुंबई ईशान्य (उत्तर पूर्व) – मिहीर कोटेचा – भाजप विरुद्ध विजयी संजय दिना पाटील – शिवसेना ठाकरे सेना
मुंबई उत्तर मध्य – डॉ. वर्षा गायकवाड – काँग्रेस विजयी विरुद्ध अ‍ॅड. उज्ज्वल निकम – भाजप
मुंबई दक्षिण मध्य – अनिल देसाई – शिवसेना ठाकरे सेना विजयी विरूद्ध राहुल शेवाळे – शिवसेना शिंदे सेना
मुंबई दक्षिण मुंबई – अरविंद सावंत – शिवसेना ठाकरे सेना विजयी विरुद्ध यामिनी जाधव – शिवसेना शिंदे सेना

 

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज