rajkiyalive

manojkumar news : ज्येष्ठ अभिनेते मनोजकुमार यांचे निधन, वयाच्या 87 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

manojkumar news : ज्येष्ठ अभिनेते मनोजकुमार यांचे निधन, वयाच्या 87 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास : मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टीत ‘भारत’ कुमार म्हणून ओळखल्या जाणार्‍या ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांचे आज निधन झाले आहे. मनोज कुमार यांनी वयाच्या 87 वर्षी मुंबईतील धीरुभाई अंबानी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. काही दिवसांपूर्वीच त्यांना तब्येत बरी नसल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

manojkumar news : ज्येष्ठ अभिनेते मनोजकुमार यांचे निधन, वयाच्या 87 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

त्यांच्या निधनाने सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. अभिनेते मनोज कुमार यांनी अनेक अजरामर भूमिका साकारल्या. त्यांच्या देशभक्तीपर चित्रपटामुळे त्यांना एक वेगळी ओळखही मिळाली. आपल्या संवेदनशील अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडणार्‍या या अभिनेत्याने अभिनयासोबतही इतरही बर्‍याच क्षेत्रांमध्ये आपली ओळख निर्माण केली.

देशभक्तिपर चित्रपटांमुळे मनोज कुमार यांना नवी ओळख मिळाली. चाहत्यांनी त्यांना भारत कुमार हे नाव दिले. ‘मेरे देश की धरती’ या त्यांच्या गाण्याचे स्वर कानावर पडताच त्यांचा चेहरा डोळ्यांसमोर उभा राहतो. या अभिनेत्याने आज जगाचा निरोप घेतला आहे.
मनोज कुमार यांनी आपल्या अभिनयाने बॉलिवूडचा एक काळ गाजवला. आजही त्यांची लोकप्रियता तसूभरही कमी झालेली नाही.

manojkumar-news-veteran-actor-manoj-kumar-passes-away-took-his-last-breath-at-the-age-of-87

मनोज कुमार यांचा जन्म 24 जुलै 1937 रोजी सध्या पाकिस्तानात असलेल्या एबटाबाद येथे झाला होता. ’हरियाली और रास्ता’, ’वो कौन थी’, ’हिमालय की गोद में’, ’दो बदन’, ’उपकार’, ’पत्थर के सनम’, ’नील कमल’, ’पूरब और पश्चिम’, ’रोटी कपडा और मकान’, ’क्रांती’ हे त्यांचे गाजलेले सिनेमे आहेत. या सिनेमातील त्यांच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले होते. भारतीय सिनेसृष्टीतील योगदानाबद्दल मनोज कुमार यांना 1992 मध्ये पद्मश्री आणि 2015 मध्ये दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज