rajkiyalive

SAMBHAJI RAJE KOLHAPUR : मराठा आरक्षणाबाबत सरकारने भूमिका स्पष्ट करावी

 

SAMBHAJI RAJE KOLHAPUR : मराठा आरक्षणाबाबत सरकारने भूमिका स्पष्ट करावी : छत्रपती संभाजीराजे ः स्वराज्य संघटनेचे विधानसभा फोकस

 

SAMBHAJI RAJE KOLHAPUR : मराठा आरक्षणाबाबत सरकारने भूमिका स्पष्ट करावी

जनप्रवास  सांगली

मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न वर्षानुवर्षे रखडलेला आहे. सरकारने एकदा दिलेले आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले. लवकरच आरक्षण दिले जाणार असल्याचे सरकार सांगते. परंतु सामाजिक मागासलेपणा असेल अथवा बाबतीत आरक्षण कसे देणार? हे राज्य सरकारने स्पष्ट करावे, अशी मागणी माजी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी सांगलीत केली. स्वराज्य संघटना निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असली तरी लोकसभा निवडणुकीऐवजी विधानसभा फोकस राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा

RAMDAS ATHAWALE : आंबेडकरांनी वंचित आघाडी बरखास्त करुन सोबत यावे

hatkanagle loksabha : शिंदे गटाला कमळाचाच पर्याय?

प्रतीक पाटील मैदानात की शेट्टींवर दबावतंत्र…?

SANGLI LOKSABHA : विशाल पाटलांनी पळ काढू नये

शरद मोहोळच्या अट्टल ’गुंडगिरी’चा प्रवास

सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण रद्द केले.

सांगली येथे एका कार्यक्रमासाठी छत्रपती संभाजीराजे आले होते, त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी स्वतः 2007 पासून महाराष्ट्र पिंजून काढला आहे. समाजाला कशा पद्धतीने आरक्षण मिळेल, याबाबत सरकारने सांगितले होते. तत्कालीन सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिले, मात्र सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण रद्द केले. मागील काही महिन्यांपासून आरक्षणाची मागणी जोर धरत आहे. सरकारही लवकरच आरक्षण देण्याचे आश्वासन देत आहे. सामाजिक मागासलेपणा असो अथवा अन्य बाबतीतमध्ये समाजाला आरक्षण दिले जाणार आहे, याबाबत सरकारने भूमिका स्पष्ट करावे. दिलेले आरक्षण पुन्हा कायद्याच्या कचाट्यात अडकणार नाही, याची दक्षता घेतली पाहिजे.

 

 

मी स्वतः काही दिवसांपूर्वी सोशल मिडीयाच्या माध्यमातून ज्या पद्धतीने आरक्षण देतो म्हणता, ते कसे देणार हे स्पष्ट करण्याची मागणी केली आहे. मराठा समाजाच्या भावना आणि कायदा यांचा समतोल न्याय देण्यात यावा. आरक्षणासाठी लढा उभारणारे मनोज जरांगे-पाटील आणि सरकार यांच्यात वेगवेगळी चर्चा होत आहे, परंतु त्याबाबत कोणतेही भाष्य करणार नसल्याचे छत्रपती संभाजीराजे यांनी स्पष्ट केले.

स्वराज्य संघटनेचे विधानसभा फोकस

स्वराज्य संघटना मुख्य प्रवाहात राहणार यामध्ये दुमत असण्याचे कारण नाही. मात्र आम्ही लोकसभा निवडणूक लढविण्याबाबत अजून स्पष्टता नाही. वेळप्रसंगी सर्वांना दिसेल. मात्र विधानसभा निवडणूक ताकदीने लढविण्यावर फोकस केला जाणार असल्याचे छत्रपती संभाजीराजे यांनी सांगितले.

 

राम मंदीर उभे राहतेय स्वागतार्ह

गेल्या काही दशकांपासून राम मंदिरचा प्रश्न प्रलंबित होता. अनेक वर्षानंतत अयोध्येमध्ये राम मंदिर स्थापन होत असल्याची समाधानाची बाब आहे. राम मंदिर उभे राहतेय त्याचे स्वागत करीत असल्याचेही छत्रपती यांनी सांगितले.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज