9 लाख 54 हजारांचा मुद्देमाल केला जप्त : स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई.
miraj crime news : आरगेतील पद्मावती मंदिरात चोरी करणारा सराईत जेरबंद : सांगली : मिरज तालुक्यातील आरग येथील पद्मावती मंदिरातून सोन्या-चांदीचे दागिन्यांवर डल्ला मारणार्या सराईत चोरट्याच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले आहे. या चोरट्याकडून सोन्याचांदीचे दागिने आणि दुचाकी असा एकूण 9 लाख 54 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने पाचवा मैल येथे कारवाई केली. अक्षय अर्जुन मोरे (वय 27, रा. गोंदीलवाडी रेल्वे गेट, पलूस आमणापूर रस्ता, ता. पलूस) असे अटक केलेल्या सराईताचे नाव आहे.
miraj crime news : आरगेतील पद्मावती मंदिरात चोरी करणारा सराईत जेरबंद
आरग येथील शितल आण्णासाहेब उपाध्ये यांच्या मालकीचे पद्मावती मातेचे मंदिर आहे. बुधवार दि. 8 जानेवारी रोजी मध्यरात्रीनंतर रेकॉर्डवरील गुन्हेगार अक्षय मोरे याने मंदिरातील गाभार्यात प्रवेश करून देवीच्या अंगावरील सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले. गुरुवारी पहाटे हा प्रकार उघडकीस येताच सर्वत्र खळबळ उडाली होती. मिरज ग्रामीण पोलिसांसह स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली.
पोलिस तपासात सीसीटीव्ही फुटेजमध्ये संशयित चोरटा हा कैद झाला होता.
हे ‘फुटेज’ सर्वत्र ‘व्हायरल’ झाले होते. परंतू अक्षय याचा चेहरा स्पष्ट दिसत नसल्यामुळे पोलिसांसमोर तपासाचे आव्हान होते. गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक सतीश शिंदे यांनी सहायक निरीक्षक पंकज पवार आणि कर्मचार्यांच्या पथकाला चोरट्याच्या माग काढण्याच्या सूचना दिल्या होत्या. पथक माग काढत असताना त्यांना आरग येथील मंदिरात चोरी करणारा संशयित दागिने विक्री करण्यासाठी पाचवा मैल येथे दुचाकीवरून फिरत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने तेथे जाऊन पाहणी केली.
तेव्हा पाठीवर सॅक असलेला अक्षय मोरे आढळून आला. त्याला पळून जाण्याची संधी न देता ताब्यात घेतले.
त्याच्या सॅकमध्ये सोन्याचांदीचे दागिने मिळाले. चौकशीत त्याने पद्मावती मातेच्या मंदिरात चोरी केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून 7 लाख 49 हजार रूपयाचे सोन्याचे दागिने, 1 लाख 40 हजार रूपयाचे चांदीचे दागिने, 65 हजार रूपयाची दुचाकी असा 9 लाख 54 हजार रूपयाचा मुद्देमाल जप्त केला. त्याला मिरज ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात दिले.
सदरची कारवाई पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, सहायक निरीक्षक पंकज पवार, नितीन सावंत, कर्मचारी अनिल कोळेकर, दरिबा बंडगर, सागर लवटे, सागर टिंगरे, संदीप गुरव, नागेश खरात, सतीश माने, महादेव नागणे, मच्छिंद्र बर्डे, अमर नरळे, इम्रान मुल्ला, संकेत मगदूम, सचिन धोत्रे यांच्या पथकाने केली. दरम्यान, अटक केलेला अक्षय मोरे हा पोलिस रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्याविरूद्ध यापूर्वी पलूस, विश्रामबाग पोलिस ठाण्यात मालमत्तेविरूद्धचे गुन्हे दाखल आहेत.

Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.



