rajkiyalive

miraj local news : मिरजेच्या धीरज मेंढे याने बनविला शेतात औषध फवारणी करणारा अत्याधुनिक ड्रोन

उदय रावळ

miraj local news : मिरजेच्या धीरज मेंढे याने बनविला शेतात औषध फवारणी करणारा अत्याधुनिक ड्रोन : शेतीला आधुनिकतेची जोड देत आपली शेती कशी प्रगत होईल याकडे पाहणारे जिद्दी आणि प्रबळ इच्छाशक्ती असणारे युवक आजही आहेत. त्याचेच उदारण द्यायचे झाले तर.. मिरजेतील धीरज अरूण मेंढे या युवकाने शेतात औषध फवारणी करण्यासाठी ड्रोन तयार करून दाखविले आहे.

miraj local news : मिरजेच्या धीरज मेंढे याने बनविला शेतात औषध फवारणी करणारा अत्याधुनिक ड्रोन

धीरज अरूण मेंढे हा शेतकरी कुटुंबातील वडील. अरूण हे शेतीच्या कामात व्यस्त असतात. शेतकरी कुटूंबात धीरज मेंढे याने शेतात राबणार्‍या वडिलांकडे पाहिले की त्याला वाटायचं की शेतीत फार राबायला लागते म्हणून त्याने शिकायचं ठरविले. बिझनेस मॅनेजमेंटचा कोर्स पूर्ण केला. वडील पिकांवर औषध फवारणी करण्यासाठी शेत मजुराची वाट पाहत होते. मजुरांची संख्या कमी असल्याने मजूरही आज येतो उद्या येतो असे वारंवार सांगत होते. परंतु पिकाला वेळेत औषध मारणे जरूरीचे नाहीतर सर्व पीक वाया जाणार होते.

धीरजचे वडील अरूण यांनी पिकाला औषध फवारणी केली. औषध फवारणी करताना धीरजच्या वडिलांना झालेले कष्ट त्याला दिसत होते.

तसेच औषध फवारणी ही काळजीपुर्वक करणे महत्वाचे असते. हा औषध फवारणीवेळी झालेला विलंब आणि त्रास पाहून त्याचवेळी धीरजच्या कल्पनेला बळ मिळाले. युट्युबर औषध फवारणी बाबत कोणकोणती अत्याधुनिक साधणे आहेत ते पाहिले. चीन, जपान या प्रगत देशात देशात शेतीसाठी ड्रोनच्या सहाय्याने औषध फवारणी तसेच विविध कामे कशी केली जातात. तसेच दक्षिण भारतात ड्रोनचा वापर होत होता.

धीरज याने आपण ड्रोन तयार करायचाच असा दृष्ढ निश्चिय केला आणि त्याने कोलकत्ता येथे जावून ड्रोनबाबतची माहिती आणि त्याचे प्रशिक्षण घेतले. ड्रोन तयार करण्यासाठी लागणारे महत्वाचे साहित्य चायना येथून मागवून घेतले. तसेच ड्रोनसाठी लागणरे अनेक पार्ट हे वेगवेगळ्या ठिकाणाहून मागवून घेतले.

कोलकत्ता घेतलेल्या ड्रोन बनविण्याच्या प्रशिक्षणातून मिळालेल्या अनुभवातून ड्रोन जोडण्याचे काम सुरू झाले. ड्रोन बनविताना अनेक अडचणी येत येत्या, ऑनलाईन याची माहिती घेवून त्यातील अडचणी बर्‍यापैकी सोडविल्या. अनेक बारीकसारीक गोष्टींबाबत अनेकांकडून याची माहिती घेतली. ड्रोन तयार करताना त्यांचा भाऊ धनंजय मेंढे याचीही साथ मिळत होती.

ड्रोन तयार झाल्यानंतर त्याची चाचणी घेण्यात आली आणि ड्रोन यशस्वी उड्डाण केल्यानंतर शेतातील पिकांवर औषध फवारणी करून पाहिले. अत्यंत कुशल पध्दतीने ड्रोनच्या सहाय्याने कमी वेळेत सर्वच पिकांवर औषध फवारणी होती होती. त्यामुळे आजुबाजुच्या शेतकर्‍यांमध्ये कुतूहल निर्माण झाले. अनेक शेतकर्यांनी आपल्या शेतात ड्रोनच्या सहाय्याह्याने औषध फवारणी करून घेतली. त्याचा पिक वाढीला चांगला फायदा झाला.

ड्रोन तयार केल्यानंतर ड्रोन उडविण्यासाठी प्रशिक्षण तसेच परवानगीची गरज असते.

धीरज यांनी पुणे येथे ड्रोन पायलयची प्रशिक्षण पूर्ण करून मान्यता प्राप्त संस्थेचे प्रमाणपत्रही मिळाले. धीरज मेंढे याची कल्पना सत्यात उतरली होती. धीरज याला त्याचा भाऊ धनंजय मेंढे याची साथ भक्कम मिळाली. 27 सॅटेलाईट मिळतात हा ड्रोन पूर्ण अत्याधुनिक असून, रिमोटच्या सहाय्याने हा ड्रोन चालविला जातो.

ड्रोनच्या सहाय्याने शेतामध्ये फवारणी करण्यासाठी वापरात येणारे ड्रोन आता मिरजेत तयार करू शकतो याचा आनंद धीरजला झाला होता.

जुन्या पंपाच्या मदतीने औषध फवारणी करताना तब्बल शंभर ते दीडशे लिटर पाणी लागते तसेच होणारे कष्ट हे वेगळेच आहेत.
औषध फवारणीसाठी ड्रोन बनल्याने त्याच्या साह्याने कोणत्याही पिकावर औषध फवारणी करता येते. एक एकर फवारणीकरीता लागणारा कलावधी पाच ते आठ मिनिटे लागतो. तसेच ड्रोनच्या फवारणी ही अत्यंत समांतर व प्रत्येक भागावर एकसारखी सुक्ष्म फवारणी तसेच थेट किटकनाशके, खते यांचेशी होणारी संपर्क टाळला जावून शारीरिक आणि आरोग्यास होणारी हानी टाळता येते. शंभर टक्के उत्पनामध्ये वाढत होते. धीरज यांनी ड्रोन विक्री पश्चात तत्पर सेवा व लागणारे सुटे भाग माफत दरात उपलब्ध करीत देत आहेत.

धीरज यांनी स्वत:च्या बनविलेल्या ड्रोनच्या सहाय्याने आतापर्यंत तीन हजार एकर औषध फवारणी केली आहे. त्याने बनविलेल्या ड्रोनला शेतकर्‍यांकडून मागणी वाढत आहे. धीरज याने स्काय ड्रोन सेल्स ऍन्ड सर्व्हिसेस ही फर्म सुरू केली आहे. पश्चिम महाराष्ट्रात तसेच मिरज तालुक्यात प्रथमच आत प्रयोग यशस्वी झाल्याचा आनंद धीरज मेंढे यांच्यामध्ये आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज