rajkiyalive

miraj news : मिरजेत जोरदार वार्‍यासह अवकाळी पावसाची हजेरी : झाडे उन्मळून पडली, पत्र उडून गेली

miraj news : मिरजेत जोरदार वार्‍यासह अवकाळी पावसाची हजेरी : झाडे उन्मळून पडली, पत्र उडून गेली : मिरजेत मंगळवारी साडेपाचच्या सुमारास अवकाळी पावसाने वेगवान वार्‍याने हजेरी लावल्याने उन्हामुळे अंगाची लाहीलाही झालेल्या मिरजकरांना थोडासा दिलासा मिळाला. सकाळ पासून ढगाळ वातावरण निर्माण झाल्यामुळे वातावरणात उष्मा जाणवत होता. अवकाळी पावसाने तासभर हजेरी लावून सर्वत्र धुमाकुळ घालून वातावरणात गारवा निर्माण केला.

miraj news : मिरजेत जोरदार वार्‍यासह अवकाळी पावसाची हजेरी : झाडे उन्मळून पडली, पत्र उडून गेली

पाऊस थांबल्यानंतर परत सर्वत्र उष्मा जाणवत होता.शहरात जोरदार वादळी वार्‍यासह अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे मिरज शहरातील अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली होती. तर काही ठिकाणी अनेकांच्या घरांची पत्रे उडून लांब वर पडली होती. काहींनी घराच्या छतावर लावलेले सोलर पॅनल दूरवर पडले होते. तर जाहिरातीसाठी लावलेले डिजिटल बोर्ड फाटले होते.

मिरजेतील सकल भागामध्ये पावसाने पाणी साचून सर्वत्र पाणी तुंबले होते. तुंबलेल्या पाण्यामुळे महापालिकेच्या कारभाराचा या पावसाने पोलखोल केली आहे. अनेक ठिकाणी ड्रेनेजचे पाणी रस्त्यावर वाहताना दिसत होते.

शहरातील शास्त्री, चौक गाढवे चौक, गांधी चौक, नदीवेस, मंगळवार पेठ, वखारभाग,रेल्वे स्टेशन, एसटी स्टँड आदी सखल भागात पावसामुळे सर्वत्र दलदल निर्माण झाली होती. गांधी चौकामध्ये भलेमोठे झाड दुकानावर पडले. सुदैवाने जीवतहानी कुठे झाली नाही. तर दुकानाचे मोठे नुकसान झाले. इसापुरे गल्ली येथील जनावरांच्या गोठ्याचा पत्रा वार्‍याने उडून रस्त्यावर येऊन पडला. पत्रा रस्त्यावरच पडल्यामुळे काही काळ वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता.

miraj-news-unseasonal-rains-accompanied-by-strong-winds-in-miraj-trees-uprooted-leaves-blown-awayz

वार्‍याची तीव्रता इतकी मोठी होती की जनावरांच्या गोठयांची चारहीखांबे उखडून वार्‍याने उडून पडली.
वादळी वार्‍यामुळे अनेक ठिकाणी विजेचे खांब वाकले तर काही झाडे विजेच्या तारांवर पडल्याने वीज वितरण विभागाने काही काळ वीज पुरवठा खंडीत केला. त्यामुळे मिरजकरांना काही काळ अंधारात काढावे लागले. वीज वितरण विभागाचे कर्मचारी अनेक ठिकाणी फिरवून कुठे कुठे वीजेची तारे तुटले आहेत त्या ठिकाणच्या वीज जपुरवठा खंडित करून परत विजेच्या तारा जोडण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु होते. रात्री बराचवेळ मिरज शहरात लाईट नव्हती.

अवकाळी अवकाळी पावसाने काही काळ मिरज करांना गारव्याचा अनुभव दिला नंतर परत हवेत उष्मा जाणवू लागल्याने त्यातच लाईट गेल्यामुळे वीजपुरवठा खंडित असल्यामुळे पंखा कधी सुरू होईल याची वाट पहावी लागली. काही तासानंतर हवेमध्ये परत उष्मा निर्माण झाला. या पावसामुळे काही मिनिटे गारवा जाणवला परंतु नंतर तापलेल्या तव्यावर पाणी जसं पडल्यानंतर जशी वाफ येते तशी वाफ जमिनीतून येत होती एवढी तीव्रता जाणवत होती.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज