rajkiyalive

मिरज पूर्व भागात विशाल ’लाट’ , काँग्रेसमधील अंतर्गत कलह संपुष्टात !

विशाल जाधव, सलगरे

मिरज पूर्व भागात विशाल ’लाट’ , काँग्रेसमधील अंतर्गत कलह संपुष्टात ! : यंदाच्या या लोकसभेच्या निवडणुकीत स्थानिक राजकीय नेत्यांचा मोठा कस लागणार होता हे चित्र आधीच दिसून येत होते मात्र आता आकडेवारी समोर आल्यानंतर मात्र हे चित्र पूर्णपणे स्पष्ट झाले आहे मिरज ग्रामीणमधून तब्बल आठ हजार 860 चे मताधिक्य विशाल पाटील यांनी मिळवले. यावेळी भाजपचे जिल्हा परिषद गट व पंचायती समिती गण व बहुतांशी ग्रामपंचायत ताब्यात असतानाही याचा मोठा फटका भाजपला बसल्याचे दिसून आले. आरग गावातून 831 चे मताधिक्य विशाल पाटील यांना मिळाले हा मोठा आत्मचिंतन करावयास लावणारा निकाल मानला जात आहे.

मिरज पूर्व भागात विशाल ’लाट’ , काँग्रेसमधील अंतर्गत कलह संपुष्टात !

कोट्यवधींची कामे भाजपने आरगेत केलेली असताना नेमके काय चुकले हा प्रश्न आता भाजपच्या नेत्यांना पडला आहे. त्याचप्रमाणे बेडगेतील काही स्थानिक प्रश्न व एका भावनिक विषयाचा संजयकाकांना फटका बसला. बेडगेमधूनही तब्बल 543 मतांचे मताधिक्य विशाल पाटील यांनी मिळाले. कोट्यवधी रुपयांची विकास कामे बेडग मध्येही झालेली असताना लोकसभेला मात्र काही स्थानिक गोष्टींचा फटका व भावनिक मुद्द्यांच्या विषयाला अनुसरून संजयकाका समजूत काढण्यात अपयशी ठरले. ऐनवेळी काहीजणांनी अंतिम टप्प्यात घोळ घालत कमळ हाती घेतले होते मात्र निकालानंतर हम भी साथ थे ची भूमिका आता व्यक्त होत आहे.

सलगरे येथून विशाल पाटील यांच्या अपेक्षेप्रमाणे 270 मतांची मताधिक्य

बेडगेचे संभाजीराजे पाटील यांच्यासह पक्षातील काही नेत्यांनी हि धुरा यशस्वी सांभाळत विशाल पाटील यांना चांगले मताधिक्य मिळवून दिले. सलगरे येथून विशाल पाटील यांच्या अपेक्षेप्रमाणे 270 मतांची मताधिक्य विशाल पाटील यांनी मिळवले. तानाजीराव पाटील हे यंदा मात्र भाजपचा जाहीर प्रचार करत होते. विशाल पाटील यांनी सलगरेत एका प्रचारदौर्‍यावेळी सुरेश कोळेकर यांच्या नेतृत्वात असणार्‍या टीमला आव्हान देत सांगीतले होते की 60 टक्क्यांहून अधिक मतदान मला न झाल्यास तुम्ही गुलाल लावण्यास येऊ नका, इतकी प्रतिष्ठेची लढाई बनलेली असताना सलगरेमधून मात्र विशाल पाटील यांनी मुसंडी मारली.

चाबुकस्वारवाडी येथेही 133 मतांचे मताधिक्य

स्थानिक मागासवर्गीय समाजाच्या जमिनीचा विषय व काँग्रेसचे तानाजीराव पाटील यांनी ऐनवेळी संजयकाकांचा केलेला प्रचार याचा उलट परिणाम यावेळी दिसून आला. एरंडोलीमधून मात्र विशाल पाटील यांनी अपेक्षेप्रमाणे मताधिक्य मिळाले नाही केवळ 39 मते संजयकाकांहून अधिक विशाल पाटील यांनी मिळवली. बाजार समितीचे बाबगोंडा पाटील यांच्यासह अनेक मातब्बर नेते एरंडोलीमध्ये असताना विशाल पाटील काही अंशी मागे पडले. स्थानिक राजकारणातील ऐनवेळी काँग्रेसच्या नेत्यांनी भूमिका बदलून केलेला संजयकाकांचा प्रचार याचाही फटका येथे विशाल पाटील बसला. चाबुकस्वारवाडी येथेही 133 मतांचे मताधिक्य संजयकाका पाटील यांनी प्राप्त केले.

खंडेराजुरीत विशाल पाटील यांनी जवळपास 700 मतांचे मताधिक्य प्राप्त केले.

यामध्ये इंद्रजीत पाटील यांच्यासोबत येत अनेक इतर नेत्यांनी पद्धतीने नेत्यांनी पाकीटाला साथ देत ही मोठा आकडा गाठण्याची किमया केली भाजपचे गाव असणार्‍या व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्राजक्ता कोरे यांच्या गावामधून मात्र भाजपलाच दणका बसला. तब्बल 215 मतांची आघाडी विशाल पाटील यांनी मिळवली. गावामध्ये राजू कोरे यांची एक हाती सत्ता असताना लोकसभेला मात्र संजयकाकांसाठी मतांचे समीकरण का बिघडले याची काही अंशी कल्पना स्थानिक जाणकारांना आहे. म्हैशाळातून कमळच उमलुन 579 अधिक मते काकांच्या पारड्यात पडली.

बेळंकी येथूनही 361 मतांची मताधिक्य विशाल पाटील यांना मिळाले.

बाळासाहेब होनमोरे यांचे गाव असलेल्या मल्लेवाडी मधूनही विशाल पाटील यांना चांगल्या मतांची रसद मिळाली. तब्बल 747 मते या गावांमधून विशाल पाटील यांनी मिळवली. संजयकाकांनी लिंगनूर येथून मारुती पाटील यांच्या नेतृत्वातील गावाने 934 मतांची मताधिक्य मिळवून विक्रम केला. खटाव येथूनही 372 मतांची आघाडी सरपंच रावसाहेब बेडगे यांनी मिळवून दिले. डोंगरवाडी येथेही सरपंच दीपक शिंदे यांच्या नेतृत्वाखाली 198 मतांची आघाडी संजयकाका यांनी प्राप्त केली. बहुतांशी पदाधिकार्‍यांनी संजयकाकांचे काम न करण्याची भूमिका घेतली होती. मात्र ऐनवेळी सुरेश खाडे यांच्या दबावतंत्रापुढे झुकत संजयकाकांचे काम करावे लागले.

एकंदरीत मिरज तालुक्यासह ग्रामीण भागामध्ये यंदाची ही लोकसभेची निवडणूक व मिळालेले मताधिक्य हा केवळ संजयकाका पाटील यांच्या विषयी असणारी नाराजी व स्थानिक छोट्या-मोठ्या मुद्द्यांवरील राजकारण व भावनिक मुद्द्यांना अनुसरून झाली आहे यात विशाल पाटील यांच्या सहानभुतीच्या लाटेने मोठे मताधिक्य मिळवण्याची किमया केली.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज