rajkiyalive

MIRAJ : वड्डीत शेतकर्‍याच्या मृत्यूनंतरही मृतदेहाची अवहेलना

MIRAJ : वड्डीत शेतकर्‍याच्या मृत्यूनंतरही मृतदेहाची अवहेलना

झोळीत घालून मृतदेह बाहेर काढला

मिरज / प्रतिनिधी

MIRAJ : वड्डीत शेतकर्‍याच्या मृत्यूनंतरही मृतदेहाची अवहेलना  : मिरजेतील पाटील गल्ली येथे राहणारे संतोष मनोहर येसुमाळी (वय 40) यांचा मिरज तालुक्यातील वड्डी येथील येसुमाळी वस्तीवर त्यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. त्यांच्या मृतदेह बाहेर आणण्यासाठी रस्ता नसल्याने त्यांना झोळीत घालून एक किलोमीटर पायपीट करत त्यांना बाहेर आणावे लागले.

MIRAJ : वड्डीत शेतकर्‍याच्या मृत्यूनंतरही मृतदेहाची अवहेलना

MIRAJ : वड्डीत शेतकर्‍याच्या मृत्यूनंतरही मृतदेहाची अवहेलना :येथील शेतकर्‍यांना पाणंद रस्ताच व्यवस्थीत नसल्याने मृतदेहाची अवहेलना होत आहे. त्यामुळे शेतकर्‍यांतून प्रचंड संताप व्यक्त होत आहे. प्रशासनाचे याकडे लक्ष घालून पाणंद रस्ते करण्याची मागणी होत आहे. आणखी किती प्रकार घडल्यानंतर शेतकर्‍यांना रस्ते मिळणार ? असा प्रश्न उपस्थितीत झाला आहे. वड्डी येथील शेतकरी येसुवाळी वस्तीवर संतोष नारायण येसुमाळी यांची शेती आहे. शेतातील पिकाला पाणी पाजविण्यासाठी म्हणून संतोष येसुमाळी हे आपली मोटरसायकल घेवून रात्रीच्यावेळी वड्डीतील आपल्या शेताकडे गेले होते. शेतापर्यंत जाण्यासाठी रस्ता नसल्याने काही अंतरावरच आपली मोटरसायकल लावून चालत शेतापर्यंत जात होते. त्यांना हृदय विकाराचा झटका आला आणि शेतापासून काही अंतरावर असलेल्या झाडाखाली तेथेच निपचीप पडले.

MIRAJ : वड्डीत शेतकर्‍याच्या मृत्यूनंतरही मृतदेहाची अवहेलना :सकाळी काही शेतकर्‍यांना संतोष येसुमाळी झाडाखाली झोपल्याचे निदर्शनास आले.

काही शेतकर्‍यांनी त्यांना उठविण्याचा प्रयत्न केला. परंतु काहीच हालचाल नव्हती. आजुबाजुच्या शेतकरी गोळा झाले. तसेच त्यांच्या नातेवाईकांना याची माहिती दिली. शेतातून बाहेर नेण्यासाठी अडचण निर्माण झाली होती. अवकाळी पाऊस पडल्याने पाणंद रस्ता हा अतिशय दलदल आणि खड्डे असल्याने बाहेर कसे जायचे असा प्रश्न निर्माण झाला. झोळीत त्यांचा मृतदेह घातला. दीड किलोमीटर पायपीट करावी लागल्यानंतर त्यानंतर ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये घालून उपचारासाठी शासकीय रूग्णालयात घेवून गेले. परंतु त्यांना मृत घोषित केले. प्रशासनाने पाणंद रस्ताच व्यवस्थित केला नसल्याने मृत्यूनंतरही मृतदेहाची हेळसांड झाली. त्यामुळे वड्डीतील शेतकरी आणि ग्रामस्थांतून प्रशासनाच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त होत आहे.

MIRAJ : वड्डीत शेतकर्‍याच्या मृत्यूनंतरही मृतदेहाची अवहेलना : वड्डीतील शेतकर्‍यांनी अनेक वर्षापासून पाणंद रस्ते व्हावीत यासाठी गेली अनेक वर्षापासून मागणी आहे.

अनेक शेतकर्‍यांना रस्ते नसल्याने सरबांधावरून रस्ता दिला असल्याचे निकाल 2002 रोजी तहसिलदारांनी दिला आहे. पण सातबार्‍यावर नोंदच नाही. परत 2022 लाही हाच निकाल परत दिला. परंतु पाणंद रस्ता झालाच नाही. आमदार, खासदार तसेच प्रशासनाकडे अनेकवेळा शेतकर्‍यांनी पाणंद रस्ता तसेच अनेक शेतकर्‍यांना रस्तेही नाही सरबांधावरून रस्ते दिले परंतु त्याची नोंद सातबार्‍यावर नाही. प्रशासनाच्या दुर्लक्ष आणि हलगर्जीपणामुळेच अनेक शेतकर्यांची रस्ते कामे प्रलंबित आहेत. मिरज तालुक्यातील अनेक शेतकर्यांच्या रस्त्याच्या मागण्या प्रलंबित आहेत. याकडे मात्र प्रशासनाने लक्ष घालून हा रस्त्याचा प्रश्न सोडवावा तसेच पाणंद रस्ते चांगल्या प्रकारे करावीत. अशी मागणी आता ग्रामस्थांतून होत आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज