मिरज / उदय रावळ
miraj vidhansabha 2024 : मिरजेत गुरू शिष्यात लढाई रंगणार: मिरज विधानसभेची रंगत वाढली असून एकेकाळी पालकमंत्री ना.डॉ.सुरेशभाऊ खाडे यांची स्वीय सहाय्यक असलेले प्रा.मोहन वनखंडे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. वनखंडे यांना काँग्रेसचे तिकिट मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मिरज विधानसभेवर तीनवेळा आपले वर्चस्व सिध्द केलेले पालकमंत्री डॉ.सुरेशभाऊ खाडे यांच्या विरोधात मोहन वनखंडे निवडणूक मैदानात शड्डू ठोकले आहे. मिरज विधानसभा काँग्रेसला सुटण्याची शक्यता असून पश्चिम महाराष्ट्रात ही लढत अतिशय प्रतिष्ठेची आणि संघर्षमय होणार आहेे.
miraj vidhansabha 2024 : मिरजेत गुरू शिष्यात लढाई रंगणार
प्रा.मोहन वनखंडे यांनी पालकमंत्र्यांच्या तीनही निवडणुका स्वत: हाताळून पालकमंत्री ना.डॉ.सुरेशभाऊ खाडे यांना निवडून आणण्यामध्ये त्यांची महत्वाची भूमिका आहे. आता स्वत: प्रा. मोहन वनखंडे हे महाविकास आघाडीतून काँग्रेसच्या चिन्हावर निवडणूक लढण्यासाठी सज्ज झाले आहेत. जरी काँग्रेसचे तिकिट प्रा. मोहन वनखंडे यांना मिळेल परंतु काँग्रेसअंतर्गत नाराजी उफाळून येत आहे. अनेक वर्षापासून काँग्रेसचा झेंडा हातात घेवून कामे केली आणि आयात उमेदवारास तिकिट दिल्याची नाराजी व्यक्त होत आहे.
सी.आर. सांगलीकर यांनी 2014 ला काँग्रसेच्या तिकिटावर निवडणुक लढविणार होते.
त्याचवेळी काँग्रेसकडून सिध्दार्थ जाधव यांना तिकिट देण्यात आले. त्यामुळे काँग्रेसचे निष्ठावंत असूनही सांगलीकर यांना तिकिट मिळाले नाही. त्यामुळे आजही त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. सी.आर.सांगलीकर यांना काँग्रेसने तिकिट द्यावे अशी मागणी त्यांच्या कार्यकर्त्यांकडून केली जात आहे. जर प्रा. मोहन वनखंडे यांना काँग्रेसने तिकिट दिल्यास काँग्रेसमधून आणखी नाराजी उफाळून त्याचा वेगळा गट वेगळी भूमिका घेण्याच्या तयारीत आहेत.
मिरज विधानसभा क्षेत्रात आपले वर्चस्व अबाधित राखलेले पालकमंत्री ना.डॉ.सुरेशभाऊ खाडे यांनी आपल्या विकासकामाच्या जोरावर आपला गड अबाधित राखण्यासाठी संघर्ष करावा लागणार आहे. पालकमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक असलेले प्रा. मोहन वनखंडे काँग्रेसच्या चिन्हावर निवडणून लढविण्यासाठी मैदानात उतरणार आहेत. मिरज विधानसभा ही काँग्रेसला सुटावी यासाठी बर्याच घडामोडी घडत आहेत. मोहन वनखंडे यांना मानणारा मोठा गट शहर व मिरजपूर्व भागात आहे.
suresh 1मिरज विधानसभा मतदार संघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. लोकसभेच्या निवडणुकीवेळी काँग्रेसचे आजी, माजी नगरसेवक व तसेच अनेक कार्यकर्ते एकत्र येवून लोकसभेचे अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांच्या पाठीशी उभा राहिला.
राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि उध्दव बाळासाहेब पक्ष असे आघाडी आहे.
लोकसभेला उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाला सांगलीची जागा सुटली होती. त्यावेळी आघाडी धर्म सर्वांनी पाळवा असा आदेश असताना काँग्रेसचे नेते व कार्यकर्ते उघड उघड अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांचा प्रचार केला होता. त्यावेळी राष्ट्रवादी आणि उबाठा पक्षाने काँग्रेसवर अक्षेप घेतला होता. तुम्ही आघाडी धर्म पाळला नाही. याची सल राष्ट्रवादी आणि उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील सर्व पक्ष आघाडी धर्म पाळतील का? असा प्रश्न उपस्थित होतो. मोहन वनखंडे यांना जर काँग्रेसचे तिकिट मिळाल्यास महाविकास आघाडीतील मनभेद आणि मतभेद कसं दूर करतील याच्यावरच सर्व गणित अवलंबून आहे. मिरजपूर्व भागात मोहन वनखंडे यांनीही सुप्त प्रचार सुरू केला आहे. तरीही गाफील राहून चालणार नाही ह ओळखून त्यांनी कार्यकर्त्यांची बांधणी केली आहे.
भाजपने काही महिन्यापासूनच मिरज विधानसभा मतदार संघ पिंजून काढण्यास सुरूवात केली आहे.
त्यामुळे त्यांची प्रचार यंत्रणा सक्षम केली आहे. राजकीय आणि आर्थिक सक्षम असलेल्या पालकमंत्र्यांना घेरण्याची तयारी महाविकास आघाडीकडून तयारी सुरू आहे. पालकमंत्री ना.डॉ.सुरेशभाऊ खाडे हे चक्रव्यूह कसे भेदणार आणि पालकमंत्र्यांना चक्रव्यूहात कसे अडकविता येईल राजकीय समीकरणे जुळविण्यासाठी मोठ्या घडामोडी घडत आहेत. एकास एक लढत झाल्यास ही लढत अतिशय चुरशीची आणि ऐतिहासिक होणार आहे.
परंतु महाविकास आघाडीतून उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे आघाडी धर्म पाळतील की नाही हाही मोठा प्रश्न आहे. लोकसभेच्यावेळी काँग्रेसने आघाडी धर्म न पाळता अपक्षाचा प्रचार केला आहे. त्यामुळे विधानसभेला मिरज विधानसभा मतदार संघात आघाडीमध्ये बिघाडी होवू शकते. तिन्ही पक्षाकडून जरी आघाडी धर्म पाळण्याचे आदेश आले तरी अंतर्गत धुसफूस हीअजूनही आहे. ती अंतर्गत धुसफूस मोहन वनखंडे हे कशा पध्दतीने हाताळणार आणि मिरज विधानसभा काबीज करण्यासाठी कोणत्या व्यूहरचना करणार हे येत्या काही दिवसातच दिसणार आहे.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.