rajkiyalive

(MIRAJ ) मिरजेतील कुंटणखान्यावर छापा

 हॉटेल मालकासह दोन महिलांविरोधात गुन्हा दाखल : पीडित महिलेची सुटका. 

मिरज शहरातील हॉटेलच्या नावाखाली सुरु असलेल्या कुंटणखान्यावर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने छापा टाकला. हॉटेल रिलॅक्स पॉइंटवर कारवाई करत कुंटणखाना चालविणाऱ्या महिलेसह तिघांना अटक केली.

 

मिरजेतील हॉटेल मध्ये सुरु असणाऱ्या कुंटणखान्यावर छापा

यावेळी जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडलेल्या पिडीत महिलेची सुटका करण्यात आली. पोलिसांनी कुंटणखाना चालविणारी दलाल महिला मुणेरा बाबासाहेब नदाफ (वय ४७, रा. खतीबनगर, मिरज), महिला व्यवस्थापक भारती रामा भगत (वय ७०, रा. हॉटेल रिलॅक्स पॉईंट) आणि हॉटेल मालक आफान हुसेन शेख (वय २१, रा. फेज क्र. २, रमा उद्यान, पंढरपूर रस्ता मिरज ) यांच्यावर महात्मा गांधी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिसांनी स्वतंत्र मोहिम हाती घेतली
याबाबत अधिक माहिती अशी कि, जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडणाऱ्या महिलांच्या सुटकेसाठी पोलिसांनी स्वतंत्र मोहिम हाती घेतली आहे. पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी याबाबतचे आदेश दिले होते. सांगलीच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या सहाय्यक पोलीस निरिक्षक प्रियांका बाबर यांना मिरजेतील हॉटेल रिलॅक्स पॉईंट येथे एका महिलेकडून वेश्या व्यवसाय करुन घेतला जात असल्याची माहिती मिळाली होती.

हॉटेलमध्ये बोगस गिऱ्हाईक पाठवून खात्री केली.
त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषणसह अन्य पोलीस कर्मचाऱ्यांच्या पथकाने हॉटेलमध्ये बोगस गिऱ्हाईक पाठवून खात्री केली. स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे आणि सहाय्यक निरीक्षक प्रियांका बाबर यांनी एक पथक तयार करून हॉटेलवर छापा टाकला. यावेळी एका पिडीत महिलेची सुटका केली. तर तिला वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडणाऱ्या तिघांना अटक करुन त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. तपास पोलीस निरिक्षक सुधीर भालेराव करीत आहेत.
सदरची कारवाई पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, सहाय्यक निरीक्षक प्रियांका बाबर, हेडकॉन्स्टेबल रुपाली क्षीरसागर, अनिता गायकवाड, महेश गायकवाड, संग्राम गायकवाड यांच्या पथकाने केली.

सांगलीत तरुणाला चाकूचा धाक दाखवून लुटणारे दोघे जेरबंद : एकजण झाला पसार : ६५ हजारांचा मुद्देमाल केला जप्त. 

 शहरातील काळी खण जवळ रस्त्याच्याकडेला लघुशंकेसाठी थांबलेल्या एका तरुणाला चाकूचा धाक दाखवून धमकावत त्याच्या जवळील सोन्याची चेन आणि रोख रक्कम असा ७५ हजारांचा मुद्देमाल चोरांच्या चोरट्यांच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या. या दोघांकडून चोरीतील ६५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
१३ नोव्हेंबर रोजी रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास घडली.
सदर चोरीची घटना हि दि. १३ नोव्हेंबर रोजी रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी अमित बबन माळी (वय ३५ रा. लक्ष्मीनगर, सांगली) यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. विकी राजू मोकळे (वय २५ रा. माकडवाले गल्ली, सांगली), गणेश हणमंत पवार (वय २० रा. सांगली) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत तर विष्णू मुलके हा पसार झाला आहे. विश्रामबाग पोलिसांच्या पथकाने सदरची कारवाई केली.
सर्वसामान्यांचा आधारवड हरपला:
अज्ञात चोरटयांनी त्यांना चाकूचा धाक दाखवून चेन आणि  रोख चोरी करून पलायन केले
याबाबत अधिक माहिती अशी कि, अमित बबन माळी हे दि. १३ नोव्हेंबर रोजी रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास घरी निघाले होते. आपटा पोलीस चौकीजवळ काळ्या खाणी जवळ ते लघुशंकेसाठी थांबले असता अज्ञात चोरटयांनी त्यांना चाकूचा धाक दाखवून त्यांची सोन्याची चेन आणि दहा हजार रुपये रोख असा मुद्देमाल जबरी चोरी करून पलायन केले होते. या घटनेची नोंद विश्रामबाग पोलीस ठाण्यात झाली होती.
संशयितांचा शोध घेत असताना गोपनीय माहिती मिळाली
विश्रामबाग पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे एक पथक संशयितांचा शोध घेत असताना गोपनीय माहिती मिळाली कि, सदरच्या गुन्ह्यातील संशयित हे शिलंगण चौक येथे चोरीतील दागिन्यांची विक्री करण्यासाठी येणार आहेत. मिळालेल्या माहिती प्रमाणे पथकातील कर्मचाऱ्यांनी शिलंगण चौक येथे सापळा लावला असता संशयित दोघेजण त्याठिकाणी आले. यावेळी त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी सदर गुन्हा केल्याची कबुली दिली.
६५ हजारांची सोन्याची चेन पोलिसांनी हस्तगत केली.
यावेळी त्यांच्याकडून ६५ हजारांची सोन्याची चेन पोलिसांनी हस्तगत केली. सदरची कारवाई पोलीस निरीक्षक संजय मोरे, अनिल ऐनापुरे, संदीप साळुंखे, संदीप घस्ते, महंमद मुलाणी, आर्यन देशिंगकर, संकेत कानडे, प्रशांत माळी, शिवाजी ठोकळ, गजानन चव्हाण यांच्या पथकाने केली.
Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज