rajkiyalive

मिरजेसह परिसरात वादळी वार्‍यासह पावसाची हजेरी

तीन रिक्षांवर झाड कोसळल्याने मोठे नुकसान

मिरज / जनप्रवास
मिरजेसह परिसरात वादळी वार्‍यासह पावसाची हजेरी : मिरज शहर परिसरात वादळी वार्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली. वादळी वार्यामुळे शहरातील अनेक झाडे उन्हाळून पडली आहेत. तर मिशन हॉस्पिटल चौकात असलेल्या संभाजी ब्रिगेड रिक्षा स्टॉप येथील तीन रिक्षावर भले मोठे झाडाची फांदी पडल्याने रिक्षाचे मोठे नुकसान झाले आहे.

काही दिवसांमध्ये उष्णतेचे तीव्रतेमध्ये प्रचंड वाढ झाल्यामुळे नागरिक उखाड्याने हैराण झाले होते. उष्णते च्या तिव्रतेचे प्रमाण 42 पर्यंत गेले होते. अचानक आज दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास अचानक वादळी वारे सुरू झाले. गारासह पावसाने सुरुवात केली.

पाऊस सुरूझाल्यानंतर यामध्ये वादळी वार्याचे प्रमाण जास्त होते.

मेघगर्जनेसह पावसाने सुरुवात केली. तासभर पडलेल्या पावसाने शहरातील सखल भागात पाणीच पाणी केले. लक्ष्मी मार्केट, दत्त चौक, कुंभार खण, एस.टी.स्टॅन्ड, वखारभाग आदि भागात पाणीच पाणी झाले होते.

मिशन हॉस्पिटल चौकात झाडीखाली असलेल्या संभाी ब्रिगेट रिक्षा स्टॅप आहे.

त्या स्टॉपवर तीनरिक्षा लावल्या होत्या.वादळी वार्यामुळे भल्यामोठ्या झाड्याच्या फांद्या उभा असलेल्या तीन रिक्षांवर पडल्याने मोठे नुकसान झाले. तर लोंढे , पंढरपूर रोड, शिवाजीचौकास आदि भागात झाडाच्या फांद्या तुटून वीजेचा प्रवाह बंद झाला. तसेच लाईटचे वायर तुटून पडल्या होत्या. शहरातील बर्याच भागातील वीज प्रवाह खंडीत करण्यात आला.

रिक्षाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले

मिशन हॉस्पिटल चौकामध्ये असलेल्या रिक्षा स्टॉप वर तीन रिक्षा थांबल्या होत्या त्या रिक्षा रिक्षांवर झाडाचे भली मोठी फांदी पडून त्या रिक्षाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. लोंढे कॉलनी येथील एका नगरसेविका सलगर यांच्या दारातच असलेले भले मोठे झाड उन्मळून पडले. झाडाच्या फांद्या वीजेच्या खांबावर, तसेच उद्यानाच्या कंपाऊंडवर पडल्याने मोठे नुकसान झाले. सिव्हिल हॉस्पिटल जवळ असलेल्या खाद्यांचे स्टॉल उन्मळून पडले. तर काहींच्या घराच्या छत्रावरील पत्रेही उडून गेले. मिरज ग्रामीण भागातही पाऊसाने तुरळक हजेरी लावली आहे. दुपारी पडलेल्या पाऊसाने काहीअंशी तापमानात घट झाली आहे. त्यामुळे नागरीकांना दिलासा मिळाला आहे.

=======================================

रेल्वेतून पडून एकाचा मृत्यू

बेळगाव ते मिरज जाणारे रेल्वेमधुन म्हैसाळ गावचे हद्दीत विजयनगर रेल्वे गेट पासुन दक्षिणेस मीटर अंतरावर रेल्वेतून पडून उपचारादरम्यान मयत झाला आहे. मृत्युपुर्वी त्यांचे आपले व नाव प्रभाकर वय 38 वर्षे रा सिध्दापूर असे सांगीतले आहे. मिरज ग्रामीण पोलिस त्याच्या नातेवाईकाचा शोध घेत आहेत.

मिरज पोलिस ठाण्याच्या हद्दीत एक अनोळखी व्यक्ती रेल्वेतन पडून गंभीर जखमी झाला होता.

अंदाजे. उंची 5 फुट 5 इंच असून बांधा मध्यम, रंग सावळा, डोक्याचे केस अर्ध टक्कल पडलेले, नाक सरळ, मिशी राखत, दाडी काळी, नेसणीस एक फुल बाह्यांचा राखडी रंगाचा पट्या पट्यांचा शर्ट व निळ्या रंगाची जिन्स पॅन्ट, ओळखचिन्ह छातीवर डाव्या बाजुस इंग्रजीमधील । (आय) अक्षर गोंदलेले आहे.

या व्यक्तीचा उपचारादरम्यान त्याने आपले नाव प्रभाकर असून सिध्दापूर येथे राहणार असल्याचे सांगितले होते.उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज