rajkiyalive

(MIRAJ ) मिरजेत ठाकरे, शिंदे गटात राडा

(MIRAJ ) मिरजेत ठाकरे, शिंदे गटात राडा

(MIRAJ ) मिरजेत ठाकरे, शिंदे गटात राडा

(MIRAJ ) मिरजेत ठाकरे, शिंदे गटात राडा : मिरजेत उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यालय महापालिकेने केले जमीनदोस्त उबाठा आणि शिवसेना शिंदे गटात राडा

(MIRAJ ) मिरजेत ठाकरे, शिंदे गटात राडा

मिरज  : मार्केट येथील किल्लाभाग सेतू कार्यालयाशेजारी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने पक्ष कार्यालयासाठी म्हणून तेथे पत्र्याचे शेड मारण्याचे काम सुरू होते. त्यावेळी शिवसेना शिंदे गटाचे किरण राजपूत यांनी हस्तक्षेप घेत त्यांनी महापालिकेत हे शेड अतिक्रमण आहे. असा मुद्दा उपस्थित केल्यानंतर दोन गटात प्रचंड राडा झाला. शिंदे गटाने वरिष्ठ पातळीवरून महापालिकेवर दबाव आणून ते उबाठाचे कार्यालय काढण्यास लावले, असा आरोप उबाठाच्यावतीने करण्यात आला. त्यामुळे दोन्ही गटामध्ये प्रचंड तणाव निर्माण झाला. महिला पदाधिकारीही आक्रमक झाल्या होत्या. पोलिसांनी उबाठाच्या शिवसैनिकांना ताब्यात घेतले.

 

 

मिरज शहरातील किल्ला भाग जुना या ठिकाणी असणारी जागा 1989 साली पटवर्धन सरकार यांनी मिरज शहर शिवसेनेला भाडेतत्त्वावर दिली होती. उतार्‍यावर शिवसेना शहर प्रमुख म्हणून नोंद आहे. या उतार्‍याच्या आधारे उद्धव ठाकरे शिवसेना शहर प्रमुख चंद्रकांत मैंगुरे यांनी जागेवर हक्क बजावत पत्र्याचे शेड उभे करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जनसंपर्क कार्यालय उघडण्याचे काम सुरू केले.

पक्षाचे पोस्टर लावून कार्यालयाचे काम सुरू केले. अँगलला पत्रा मारण्याचे काम सुरू होते. त्यावेळी शिंदे गटाने महापालिकेला हे अतिक्रमण आहे ते काढलेच पाहिजे असा मुद्दा उपस्थित केला. उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे शहर अध्यक्ष चंद्रकांत मैगुरे यांनी आपल्याकडे पक्षाच्या नावावर जागा असल्याचे कागदपत्रे उपायुक्त स्मृती पाटील यांना दाखविली. महापालिकेचे नगरविकास विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

 

 

महापालिकेचे अधिकारी खोके काढण्यासाठी फौजफाटा आणला होता. जेसीबी तसेच पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला होता. दोन गटामध्ये जोरदार वादावादी सुरू झाली. ठाकरे गटाच्या कार्यालयाची जागा बेकायदेशीर ठरवत महापालिकेने जेसीबीच्या सहाय्याने ते पत्राचे शेड काढले. कार्यालयाच्या अतिक्रमण हटवण्यात विरोध करणार्या शिवसेनेचे मिरज शहर प्रमुख चंद्रकांत मैगुरे यांच्यासह सर्व कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

आणखी वाचा
(SANGLI NATYASAMELAN ) मुहूर्तमेढीची शोकांतिका
SANGLI : खासदार, पालकमंत्र्यांचे इलेक्शन टार्गे
वारणा उद्भव की चांदोली यासाठी सल्लागार
सांगली-मिरज रस्त्यावरील रेल्वे पूल धोकादायक
सांगलीत दररोज सात जणांना कुत्र्याचा चावा
उदगाव कुंजवन भगवान आनंद महोत्सव सोहळ्यास प्रारंभ
(sangli )रेल्वे पुलासाठी दिल्लीत धडक मारु

मैगुरे यांनी प्रशासनावर राजकीय दबाव असल्याने पालकमंत्र्यांच्या सांगण्यावरूनच ही कारवाई केल्याचा आरोप यावेळी सैनिकांनी केला.
यावेळी उबाठा गटाचे शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. महिला पदाधिकारी अक्षरश: धाय मोकून रडत होत्या. आमच्या सुडबुध्दीने अन्याय करत असल्याचे वारंवार बोलत होत्या. एका महिला कार्यकर्तीला भोवळ आल्याने त्यांना पाणी देण्यात आले.

 

 

आमचे शिवसेना खरी असल्याने येथे आमचेच कार्यालय सुरू करण्यासाठी शिंदे गटाचे किरण राजपूत यांनी महापालिका प्रशासनाकडे अर्ज केला होता. या कारणावरून उद्धव ठाकरे शिवसेनेचे शहर प्रमुख चंद्रकांत मैगुरे आणि शिंदे सेनेचे शहर प्रमुख किरण राजपूत यांच्या राडा झाला. यावेळी एकमेकांना असलेली शिवीगाळ करून एकमेकांना बघून घेण्याची धमकी देण्यात आली होती. या घटनेनंतर तणाव निर्माण झाला होता.

शिवसेना नेते प्रा.सिध्दार्थ जाधव

कार्यालयाच्या अतिक्रमण हटवण्यात विरोध करणार्‍या शिवसेनेचे मिरज शहर प्रमुख चंद्रकांत मैगुरे यांचा सर्व कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. प्रशासनावर राजकीय दबाव असल्याने पालकमंत्र्यांच्या सांगण्यावरूनच ही कारवाई केल्याचा आरोप यावेळी सैनिकांनी केला. खरी शिवसेना ही उध्दव बाळासाहेब ठाकरे यांचीच आहे. हे अख्या देशाला माहित आहे. राजकीय दबाव तंत्राचा वापर करून शिवसेनेचे पक्ष, चिन्ह चोरून आमचाच पक्ष आहे असे म्हणतात. त्यांना जनता धडा शिकविणारच आहे. मिरज शहरात अनेक वर्षापासून अनेक ठिकाणी अतिक्रमणे आहेत. ती महापालिका काढत नाही. उबाठाचे कार्यालय पाडण्याचा प्रकार हा राजकीय दबावातून केला आहे. याला योग्यवेळी उत्तर देवू.

 

 

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज