rajkiyalive

मौजे डिग्रजच्या मातीतील रांगडा स्वातंत्र्यसैनिक

15 ऑगस्ट निमित्त…
शीतल चव्हाण,  जयसिंगपूर…..

 

..रामचंद्र धोंडी कुंभार..यांना त्रिवार वंदन
     स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी मौजे डिग्रजच्या मातीला विसरून जमणार नाही.. कारण या मातीने सुद्धा एका स्वातंत्र्यसैनिकाला जन्म दिलेला आहे..साधारण 1901-1902 चा जन्म असेल रामभाऊंचा…लहान वयापासूनच पैलवानकीचा नाद…तरुणपणात तर हा नाद आणखीनच बळावला…हळूहळू खांद्यावर पटका आला…डोक्यावर फेटा आला…नजरेत राकटपणा… अन्यायाची प्रचंड चिड रगा रगात भरलेली..
कृष्णा खोऱ्यात स्वातंत्र्यलढ्याची मशाल पेटती ठेवली या बहाद्दरानी…*
तरुण वयात मात्र या सगळ्या रगारगावर प्रभाव पाडला तो नाना पाटलांनी…होय क्रांतिसिंह नाना पाटलानी… तिथून पुढचा काळ मात्र.…’ *नाना सांगतील तसं’.. संगतीला जी.डी.लाड…मग काय… कृष्णा खोऱ्यात स्वातंत्र्यलढ्याची मशाल पेटती ठेवली या बहाद्दरानी…*
 क्रांतिसिंह नाना पाटील म्हणजे स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासातील एक अजरामर नाव…जुलमी ब्रिटिश सरकारला हादरवून सोडणारं नाव म्हणजे क्रांतिसिंह नाना पाटील… ब्रिटिश राजवट झुगारून निरा काठ पासून कृष्णा, वारणा नद्यांच्या खोऱ्यात प्रतिसरकार अर्थात पत्री सरकारची स्थापना नानांनी केली..या पत्री सरकारमधीलच कृष्णा खोऱ्यातील एक सहकारी म्हणजे रामचंद्र धोंडी कुंभार…मौजे डिग्रज..

हेही  वाचा

ओबीसीसाठी मोदी आवास घरकुल योजना

या पत्री सरकारने निरा, वारणा,कृष्णा खोऱ्यात जवळपास 1500 गावात आपलं स्वतःचं स्वराज्य घोषित केलं..
भूमिगत चळवळीच्या माध्यमातून ब्रिटिश सरकारसमोर प्रतिसरकारने मोठं आव्हान उभं केलं…या पत्री सरकारने निरा, वारणा,कृष्णा खोऱ्यात जवळपास 1500 गावात आपलं स्वतःचं स्वराज्य घोषित केलं… *क्रांतिवीर नागनाथआण्णा नायकवडी… क्रांतीअग्रणी जीडी लाड… किसन वीर ..पांडुरंग पाटील आणि यांच्याच तालमीत तयार झालेले आपले मौजे डिग्रजचे रामचंद्र कुंभार…रामभाऊ…*
पण शेवटपर्यंत सापडले नाहीत….फरारच राहिले..
ब्रिटिश सरकारने फर्मान काढलं यांना पकडायचं… पण शेवटपर्यंत सापडले नाहीत….फरारच राहिले…. गावात राजे म्हणून ओळखले जाणारे रामभाऊ नाना पाटलांचे अतिशय जवळचे आणि खंदे सहकारी होते…नाना त्यांना रामभाऊ म्हणायचे… गावासाठी राजे असणाऱ्या रामभाऊना *वसंतदादा मात्र त्यांच्या खास शैलीत राजं म्हणायचे.* ..एखाद्या स्टेजवर भाषण असलं की वसंतदादा आवर्जून बोलवून घ्यायचे.. ‘राजं या वरती मंचावर’ …तसा आजूबाजूच्या गावात दरारा पण होता त्यावेळी रामभाऊंचा…
आरं सिकला असतास तर कुठंबी चिकटवला असता तुला.
नाना पाटलांचं एक वाक्य मात्र रामभाऊंच्या सारखं मनात घोळ घालत होतं… आरं सिकला असतास तर कुठंबी चिकटवला असता तुला.…हेच वाक्य डोक्यात ठेवून रामभाऊंनी पुढे जाऊन आपल्या मुलांना मात्र चांगलं शिक्षण दिलं… चार मुलं… विश्वनाथ.. महादेव.. शंकर आणि शिवाजी… त्यापैकी महादेव कुंभार हे टेलिफोन खात्यात… तर शंकर कुंभार व शिवाजी कुंभार हे शिक्षक झाले…. विश्वनाथ कुंभार यांनी मात्र घरची शेतीच पुढं चालू ठेवली..आयुष्यभर स्वराज्यासाठी वाहून घेतलेल्या या ध्येयवेड्या स्वातंत्र्यसैनिकास जवळपास 85 वर्षाचं आयुष्य लाभलं.. *पुढं 1986 साली मौजे डिग्रजच्या या राजेंची प्राणज्योत मालवली…*
 खरंतर मौजे डिग्रजच्या मातीला पडलेलं हे एक सुंदर स्वप्न आहे.
 खरंतर मौजे डिग्रजच्या मातीला पडलेलं हे एक सुंदर स्वप्न आहे… पण काही स्वप्न ही विसरली जातात…शेवटी इतिहास देखील मोठ्यांच्याच पायाशी बांधलेला….. *आज 15 ऑगस्टनिमित्त मौजे डिग्रजच्या मातीतील या स्वातंत्र्य सैनिकाला मानाचा मनापासून आणि मनाचा मनापासून मुजरा….*           आमच्या मुलींच्या शाळेत कधीही आलात…तर ध्वजस्तंभाच्या कट्ट्यावर आपणास या नावाची पाटी आदरपूर्वक दिसेल… *रामचंद्र धोंडे कुंभार… स्वातंत्र्यसैनिक… मौजे डिग्रज..*
Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज