mukhyamantri ladki bahin yojna : ठरलं…लाडक्या बहिणींना फेबु्रवारीचा हप्ता या दिवशी मिळणार : फेबु्रवारी महिना संपला तरी अजून लाडक्या बहिणींना त्यांचा हप्ता मिळाला नव्हता. परंतु आता मंत्री अदिती तटकरेंनी मोठी माहिती दिली आहे. राज्यातील महिलांना महिला दिनी म्हणजेच 8 मार्च रोजी फेब्रुवारीचा 1500 रूपयाचा हप्ता मिळणार आहे.
mukhyamantri ladki bahin yojna : ठरलं…लाडक्या बहिणींना फेबु्रवारीचा हप्ता या दिवशी मिळणार
विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून राज्यातील लाखो महिलांना दरमहा 1500 रुपये देण्यास सुरुवात केली होती. मात्र फेब्रुवारी महिन्यात या योजनेचा हप्ता महिलांच्या खात्यात जमा न झाल्याने, तसेच योजनेसाठी पात्र आणि अपात्र महिलांची छाननी सुरू झाल्याने योजनेबाबत संभ्रम निर्माण झाला होता. मात्र आजपासून सुरू झालेल्या महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान, लाडकी बहीण योजनेबाबत राज्य सरकारने मोठी घोषणा केली आहे.
लाडकी बहीण योजनेबाबत राज्य सरकारकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार लाडकी बहीण योजनेचा रखडलेला फेब्रुवारी महिन्याचा हप्ता दिला जाणार आहे. या महिन्यांच्या 1500 रुपयांची रक्कम 8 मार्च रोजी म्हणजेच जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला या योजनेसाठी पात्र महिलांच्या खात्यात जमा होणार आहे. या संदर्भातील माहिती मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे.
mukhyamantri-ladki-bahin-yojna-its-decided-the-beloved-sisters-will-get-their-february-installment-on-this-day
अदिती तटकरे यांनी सांगितले की, 8 मार्च रोजी शनिवार असला तरी त्या दिवशी महिला दिनानिमित्त विधिमंडळाचं विशेष सत्र आयोजित करण्यात आलं आहे. तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांना फेब्रुवारी महिन्याचा सन्मान निधी महिला दिनाच्या पूर्वसंध्येला दिला जाणार आहे. यासाठी आवश्यक सर्व तांत्रिक बाबींची तयारी पूर्ण झाली असून महिला दिनाच्या पूर्वसंध्येला पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात सन्मान निधी जमा केला जाईल.
दरम्यान, फेब्रुवारी महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा करण्यासाठी वित्त विभागाकडून निधी महिला व बालविकास विभागाकडे वर्ग करण्यात आला होता. पण काही तांत्रिक कारणांमुळे लाडक्या बहिणींना पैसा देण्यास उशीर झाल्याची माहिती समोर आली होती. मात्र आता महिला दिनी दोन्ही हप्ते एकत्र मिळणार असल्याचे स्पष्ट झाल्याने फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याबाबत निर्माण झालेला संभ्रम दूर होण्याची शक्यता आहे.

Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.



